ती ओढ तो जिव्हाळा नुरला कुणात आता
कोणीच येत नाही माझ्या घरात आता
सगळीकडेच हल्ली आहेत भाव एकच
ना घासघीस करती कोणी दरात आता
करतात साजरे सण सारेच आजही पण
उत्साह राहिला ना तैसा जनात आता
नुसतेच गर्जती अन जाती निघून सारे
अवसान राहिले ना इथल्या घनात आता
सरकारची म्हणे ही सेवा जलद गतीची
देताच लाच होती कामे क्षणात आता
होतात मोकळे ते देऊन ई-शुभेच्छा
गुंतायचे कुणाला नाही कुणात आता
आशा तुला कशी रे फेडेल पांग तो सारे
तू राहतोस 'इस्रो' कुठल्या युगात आता ?
-नाहिद नालबंद 'इस्रो'
[९९२१ १०४ ६३०]
===================================
तरहीच्या (कोणीच येत नाही माझ्या घरात आता) याच ओळीवर हजल लिहण्याचा पहिलाच प्रयत्नः
कुत्र्यास बांधले जी मी अंगणात आता
कोणीच येत नाही माझ्या घरात आता
थोबाड ते तिचे पण मी चेहरा म्हणालो
ती मानते स्वतःला सुंदर जगात आता
भेटीत हाय पहिल्या पडली पसंत त्याला
पाण्यात म्हैस जैसी बसली मनात आता
मागून मेल भासे निघते फिमेल पुढुनी
उरला फरक न काही मुलगी मुलात आता
आयुष्यभर तयांचा संसार काटकसरी
दोघात एक कवळी कलत्या वयात आता
-नाहिद नालबंद 'इस्रो'
[९९२१ १०४ ६३०]
लै भारी! आवडले! <<भेटीत हाय
लै भारी! आवडले!
<<भेटीत हाय पहिल्या पडली पसंत त्याला
पाण्यात म्हैस जैसी बसली मनात आता>>
ही द्वीपदी तर क्लास आवडली!!
गझल स्वच्छ झाली आहे. मतला,
गझल स्वच्छ झाली आहे. मतला, दरात, घनात आणि कुणात हे शेर आवडले. 'फेडेल पांग तो सारे' मध्ये दोन मात्रा अधिक होत आहेत.
हझलेबाबतः
>>>मागून मेल भासे निघते फिमेल पुढुनी<<<
क्या बात है नाहिद जी। खूप
क्या बात है नाहिद जी। खूप छान.लाखत एक! वां !
छान
छान
हजल जास्त आवडली!
हजल जास्त आवडली!

वाव्वा...खासंच!
वाव्वा...खासंच!
तरही ची पण एक वेगळीच मजा असते
तरही ची पण एक वेगळीच मजा असते ...
प्रत्येक जण किती वेगवेगळ्या तर्हेने व्यक्त होतो ना ... त्याच मीटर मधे ...
खुप छान ... दोन्ही आवडल्या ...
आपणा सर्वांच्या भरभरुन
आपणा सर्वांच्या भरभरुन प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!
बेफिकीरजी, तखलुस (शब्द बरोबर लिहिलाय ना ?) बद्दल मायबोलीवर वाचले होते. तसे वापरायचा प्रयत्न केला आहे. बरोबर आहे ना ? नसल्यास बदल करुन घेतो. धन्यवाद.