कवितेवर केलेल्या चारोळ्या

Submitted by कविता क्षीरसागर on 1 January, 2016 - 08:31

कवितेवर केलेल्या चारोळ्या ....

कवितेत माझ्या मीच वसते
शब्दातून मी होते व्यक्त
कधी प्रेमाने बहरून जाते
कधी शब्दातून गळते रक्त …. १

माझ्या शब्दांचं चांदणं
तुझ्या डोळ्याचं आभाळ
आणि त्याचं प्रतिबिंब
एक कविता वेल्हाळ …. २

कवितेत सामावले
माझे अस्तित्वच आहे
आहे नावात कविता
मनातही तीच राहे …… ३

अनावर दु:ख जेव्हा
उचंबळे -हदयात
माय माउली कविता
घेते पदराच्या आत … ४

कवितेचा जन्म झाला
अशा लेखणीमधून
आसवांची जिची शाई
पहा झरते अजून …… ५

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users