आपली विंडोज्, आपलं जीमेल

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मी गेल्या वर्षी जेव्हा 'एचपी प्रेझारिओ व्ही३७००' लॅपटॉप घेतला तेव्हा त्यावर विंडोज् व्हिस्टा होम बेसिक ओएस् डीफॉल्ट इंग्लिश भाषेत बसवून मिळाली होती (भारतासारख्या १०० कोटी गिर्‍हाइकांच्या देशावर हे लोक परक्यांच्या भाषा का थापतात कोण जाणे?!). त्यावेळेला मला विंडोज् ओएस् मराठी तोंडवळ्यात कशी आणायची याबद्दल नेमकी माहिती सापडली नाही. पण नुकतंच यावर उत्तर गवसलं - विंडोज् व्हिस्टा भाषा इंटरफेस पॅक (विंडोज् व्हिस्टा Language Interface Pack अर्थात LIP).

हा मराठी इंटरफेस पॅक बसवल्यावर विंडोज् व्हिस्टा ओएशीचा तोंडवळा - स्टार्ट मेनू, कंट्रोल पॅनेल, विंडोज् एक्स्प्लोरर, इंटरनेट एक्स्प्लोरर, इतकंच काय विंडोज् पेंट वगैरे सॉफ्टवेअरांचा तोंडवळा देवनागरी मराठीत दिसतो.

विंडोज् एक्स्प्लोरर :

इंटरनेट एक्स्प्लोरर :

नियंत्रण पॅनेल (कंट्रोल पॅनेल) :

'जीमेल' हे लोकप्रिय ईमेल सेवादातेही आता संपूर्ण तोंडवळा देवनागरी मराठीत देतात. त्याकरता जीमेलाच्या 'सेटिंग्ज' मेनूमध्ये 'साधारण>>भाषा' या ड्रॉपडाऊन बॉक्सातून 'मराठी' हा पर्याय निवडा. आपलं जीमेल आपल्या भाषेत असं दिसेल :

जीमेल 'सेटिंग्ज' >> 'साधारण' टॅब :

जीमेल इनबॉक्साचा मराठी तोंडवळा :

सध्यातरी विंडोज् व्हिस्टा आणि जीमेलाच्या मराठी तोंडवळ्यातलं मराठी काहीसं धेडगुजरी आहे. पण तरीही या सुविधांचा वापर वाढल्याशिवाय यात सुधारणा घडणार नाहीत. गूगल (आणि अस्तित्त्वात असेल तर, मायक्रोसॉफ्ट) डेव्हलपर कम्युनिट्यांमधल्या त्या-त्या भाषांतरावर, स्थानिकीकरणावर (लोकलायझेशन) काम करणार्‍या स्वयंसेवक कम्युनिट्यांमध्ये सहभागी होऊन तुम्ही यांचं मराठीकरण सुधारू शकता.

प्रकार: 

फ अतिशय उपयुक्त माहीती दिली आहेत तुम्ही. धन्यवाद.

स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी कुठे संपर्क साधावा लागतो हे तुला ठाऊक आहे का?

व्वा! आता किमान जीमेल तरी देवनागरीत करुन बघतो! Happy
छान माहिती
...;
आपला, लिम्बुटिम्बु

फ : विंडोज् एक्सपी वर सुद्धा आपण जीमेल इनबॉक्स चा तोंडवळा मराठी मध्ये बदलू शकतोय रे. आत्ताच हापिसात ट्राय करून बघितलं ........ Happy

~~~~~~~~~~~~~~
शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक, घडू नये ते घडले

गजा, गूगलेचा स्थानिकीकरणाचा 'गूगल इन युअर लँग्वेज' नावाचा उपक्रम आहे. यात पिकासा, गूगल ग्रुप्स वगैरे इतर सेवांच्या स्थानिकीकरणाकरता लोकांना सहभागी होता येतं. मराठीमध्ये सध्या गूगल ग्रुप्स यूआय, सहाय्यपाने, पिकासा वगैरेंच्या स्थानिकीकरणाचे प्रकल्प चालू आहेत. मायक्रोसॉफ्ट डेव्ह कम्युनिटीबद्दल मात्र सध्या सापडलं नाही रे.. मागाहून काही सापडलं तर इकडे लिहीन.

>>विंडोज् एक्सपी वर सुद्धा आपण जीमेल इनबॉक्स चा तोंडवळा मराठी मध्ये बदलू शकतोय रे.
अरुण : जीमेलाचा तोंडवळा तू कुठल्याही ओएशीवर बदलू शकतोस.. ओएस् विंडोज् एक्सपी असण्याचा त्याच्याशी थेट संबंध नाही. उबंटू/मँड्रेक इ. कुठल्याही डिस्ट्रिब्यूशनाचं लिनक्स, ऍपल मॅकिंटॉश या युनिकोड-अनुकूल कुठल्याही प्रणाल्यांमध्येदेखील तू मराठी जीमेल वापरू शकतोस.
मात्र तुझी विंडोज् ओएस् देवनागरी मराठी तोंडवळ्याची करण्याकरता सध्या मराठी एलआयपी बसवावं लागेल; कारण विंडोज् एक्सपी/ व्हिस्टा यांच्या अस्सल मराठी आवृत्त्या मायक्रोसॉफ्टेने अजूनतरी काढल्या नाहीत (मराठीतली ओएस् पैसे देऊन विकत घ्यायला आणि वापरायला मराठी माणूस पुढे येणार नाही याची त्यांना खात्री वाटत असावी. :फिदी:).
विंडोज् एक्सपीकरता मराठी एलआयपी इकडे मिळेल.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

फ, gmail वरचे सगळे menu तरी देवनागरीत दिसतात.. जश्या प्रकारे orkut वर देवनागरीत टंकन करता येते तसे पण करता येते का??
==================
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो

वा फारचं छान माहितीं. मीही प्रयत्न करुन पहातो.

वर हिमकुलचे पोष्ट वाचून मला विचारावेसे वाटते-

मी जेंव्हा केंव्हा याहू, जीमेल, ऑर्कुट वरील माझ्या मित्रांना देवनागरीतून संदेश पाटवितो तेंव्हा तो संदेश आधी मी मायबोलिवर टंकीत करतो आणि मग तो संदेश मला जिथे हवा आहे तिथे आणतो. मला ही पद्धत कधीकधी फार वेळखाऊ वाटते. खुद्द याहू, जीमेल, ऑर्कुटच्या आतच जर देवनागरी टंकीत करता आलेत अर किती बरे होईल. यावर जर कुणाला काही उपाय माहिती असेल तर सांगा.

बी मी स्वतः बरहा वापरतो याहू, जीमेल, जीटॉक इ. साठी. ही प्रणाली मुळात कन्नड आहे. पण युनीकोड वर आधारित असल्याने बर्‍याच भाषांमधे वापरता येते. इन्स्टॉल केल्यानंतर डिफॉल्ट भाषा बदलून मराठी करावी लागेल.

BarahaIME

IME = Input Method Editor
-योगेश

हिम्या, बी : विंडोज् ओएस् असेल तर (आपल्याला सवय असलेल्या) नेहमीच्या लिप्यंतराने (ट्रान्सलिटरेशनाने) लिहिण्याकरता योग्याने सुचवलेलं बरहा जास्त उपयोगी आहे. नाहीतर अख्ख्या विंडोज् ओएशीतच मराठी भाषा 'डीफॉल्ट इनपुट भाषा' म्हणून वापरायची असेल तर Control Panel >> Regional & Language Settings >> Keyboard and languages >> Change Keyboard येथे जाऊन मराठी ही कीबोर्ड इनपुट भाषा म्हणून निवडावी. तसं केलं तर विंडोज् प्रणालीत तुला कुठेही मराठी देवनागरीत टंकता येतं. पण या पर्यायाचा तोटा एवढाच आहे की त्याचा कीबोर्ड लेआउट निराळा असल्यानं, नेहमीची लिप्यंतराची सवय असलेल्यांना नवीन कीबोर्ड लेआउट आधी 'हातात बसवावा लागतो'. Happy

ऑर्कुटावर देवनागरी लिहायचा दुसरा कुठला पर्याय मला माहिती नाही रे.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

फायरफॉक्स साठी Indic Input Extension 1.1 मिळते. ते वापरुन फायरफॉक्सवर कोणत्याही टेक्स्टबॉक्स मधे मराठी लिहिता येते. साधारणपणे मायबोलीवर लिहिण्यासारखेच आहे काही काही अक्षरांकडे लक्श द्यावे लागते. आणि मराठीमधुन इंग्रजीमधे लिलया जाउ शकतो.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

फ, छानच. हे मला आधीपासुन माहीती होते. जपानी व ईंग्रजी ईंटरफेस लागत असल्या कारणाने लँग्वेज पॅक विषयी माहीती होतीच. XP मधेही ही सुविधा आहे. असो. तू ही माहीती दिलीस त्याबद्दल धन्यवाद. :)पॅक टाकले की Office चा पण चेहरामोहरा (मेन्यु) बदलुन जातो. MultiLingual Pack बहुतेक XP नंतर लाँच केले.

~~~~~~~~~~~~
हल्ली मांजरापेक्षाही माणसेच जास्ती आडवी जातात. Happy
~~~~~~~~~~~~