रात्रीच्या शांत काळोखात तुम्ही कधी 'धडाम्' असा आवाज ऐकला आहे काय? झोपेत असतानाही हा आवाज कधी कधी ऐकू येतो. मी जिथे राहतो तिथून जवळूनच एक हायवे गेलाय. आणि असे आवाज आम्हाला नेहमी ऐकायला येतात. थरकाप उडतो. तो नक्की ट्रक, टेम्पो, लक्झरी की अजून काही. मी एका झोपड्यात राहतो. झाडी तशी बरीच आहे. आणि हायवे इथून फारसा लांब नाहीये. कधी आवाज आलाच तर मी झोपड्याबाहेर येऊन दुरुनच कानोसा घेतो. आवाज तसा लहानच असतो. पण कधी कधी जमीन हादरते. आणि पुन्हा सगळे चिडीचूप. शांत. भयाण काळोख. आणि मग पुन्हा 'सायरन'चे आवाज. रात्रभर.
त्या दिवशी असाच आवाज आला 'धडाम... खळ्ळळ्ळ' . हा तसा बऱ्यापैकी मोठा आवाज. मी झोपड्यातून लगबगीनं बाहेर आलो आणि हायवेकडं नीट निरखून बघितलं. वाहनं जास्त नव्हती. पण कुठे काही मागमूस लागेना. मग माळरानावर एका ऊंच जागेवर चढून जमेल तितका हायवे डोळ्याखालून घातला. कुठेच काही गडबड वाटत नव्हती. हा भास तर नव्हता. मी स्कुटर काढून तडक हायवेवर निघालो. डिव्हायडर ओलाडून स्लो लेन मध्ये घुसलो. रस्त्यावर ना कोठे गर्दी ना कोठे ट्राफीक जाम. सरळ जातच राहीलो. पाच-सहा कि.मी. वर मला एक टेम्पो आढळला. फरफटत गेलेला. झुडपात. बहुतेक रुळ ओलांडत असताना त्याची चाकं अडकली असतील.
आमच्या इथुन एक रेल्वेचा ट्रॅकपण जातो. फाटक असणारा. म्हणजे रेल्वेने टेम्पोला धडक मारली असणार. रेल्वेचे डबेही त्या माळरानावर विखुरलेले.
मी नंबर डायल केला. 2000 माईल्स हाय, अराऊंड 3 लॅक किमी पर सेकंद, सिग्नल गोज डाऊन अगेन, अॅन्ड रिंग्ज द फोन.
"हैलो"
"हा"
"ईमरजन्सी, कम फास्ट"
तातडीचं संभाषण आम्ही इंग्लिशमध्येच करतो. लॉरी घेऊन 'सत्या' आला. लगेच. याला दम निघत नाही. चैन पडत नाही. हातात 'फावडं' घेऊन खाली ऊतरला. याच्या हातात कायम फावडं असतं. त्याचा तो स्टेटस सिंबॉल आहे.
रेल्वेच्या डब्यांतून काही ठिकाणी धुर निघत होता. कुठे ठिणग्या, तर कुठे आग पण लागली होती.
"किती गेले असतील रे, दिडशे तर नक्कीच" सभोवतालावर नजर फिरवून सत्या म्हणाला.
"ते बघ तिकडून दोन पळतायत, धर त्यांना" सत्या पुढं होत फावडं घेऊन त्यांच्या मागं राक्षसासारखा धावू लागला.
"वेट अ मिनीट, पण मला काहितरी खटकतयं" चित्रगुप्तानं शेवटी तोंड उघडलं. मघाचपासून समोरच्या खुर्चीवर बसून मी एकटाच बडबडत होतो.
" ट्रॅक कसा काय आला?, हायवेवर रेल्वेचा ट्रॅक कसा काय आला. तो ही फाटक असलेला. हे जरा विसंगत वाटतय. संशयाला जागा राहतेय. आय थिंक यू हॅव नॉट प्रिपेयर्ड वेल. कॅन्सल धिस प्लॅन, थिंक समथिंग डिफरंट ."
चित्रगुप्त एखादाच पॉइंट टाकतो, पण सॉल्लिड काढतो, त्याच्यामुळं सगळा प्लॅनच फिसकाटतो.
" डिलीवरी तर अर्जंट आहे, ती ही दिडशेची, नाऊ व्हाट वुई हॅव टू डू?"
"डू युवर बेस्ट, क्लायंट इज ओव्हर माय हेड" साला हा तर वैतागला.
बराच वेळ शांततेत गेला. एकदोन ची केस असती तर ठीक. पण एवढी मोठी अॉर्डर पुर्ण करायची म्हणजे प्लॅनिंग फुलप्रुफ पाहीजे. आणि ती क्लायंट समोर प्रेझेंट करताना संशयाला कोणतीही जागा नको. चित्रगुप्त माझ्याकडून अगोदरच सगळं वदवून घ्यायचा.
मी पाठीमागच्या काही नोंदी तपासायला घेतल्या. चित्रगुप्तही डोकं खपवत होताच आणि तेवढ्यात,
2000 माईल्स हाय, अराऊंड 3 लॅक किमी पर सेकंद, सिग्नल कमस् अप & अप अॅन्ड रिंग्ज माय फोन.
"हा बोल सत्या"
"टँकर, फुल अॉफ पेट्रोलियम गॅस, कमिंग ओव्हर हायवे लेन 6, इन आवर एरिया, लॉक द स्टेअरींग, फास्ट"
"कॉपी" आता मला तंत्रखातं सांभाळावे लागणार. मी डोळे मिचकावून चित्रगुप्ताकडे पाहीले.
"अॅप्रुव्हड" मंद हसत तो म्हणाला.
साला आता क्लायंटला लॉक झालेल्या स्टेअरींगची कारणं देत बसावी लागणार.
रेल्वे, विमान यांचा कोटा
रेल्वे, विमान यांचा कोटा संपला वगैरे उल्लेख हवा कुठेतरी तर या १५० साठीच्या कुटाण्याला काहीतरी आधार मिळेल
भन्नाट..
भन्नाट..
हर्पेन | 29 December, 2015 -
हर्पेन | 29 December, 2015 - 09:06
रेल्वे, विमान यांचा कोटा संपला वगैरे उल्लेख हवा कुठेतरी तर या १५० साठीच्या कुटाण्याला काहीतरी आधार मिळेल>>>>>>
प्रत्येकाचा एरीया विभागून दिला आहे. कथानायकाच्या एरीयात हायवेचा काही भाग येतो. विमान वगैरे हवाई एरिया ईतरांचा. त्या त्या एरियातली वेगवेगळी अॉर्डर!
वरती एक ऊल्लेख आहे "इन आवर एरिया" म्हणून. आणि अर्जन्सीच्या वेळेस शॉर्टकट निवडण्याची पद्धत असते.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद हर्पेन आणि हिम्सकूल!
भारी!
भारी!
आय लाईक द वे युअर ब्रेन
आय लाईक द वे युअर ब्रेन वर्क्स.
कीप इट अप.
कथा आवडली.
कथा आवडली.
भारीच.! मस्त जमली आहे. खूप
भारीच.! मस्त जमली आहे. खूप आवडली.
पु.ले.शु.
भारी....
भारी....
मस्त
मस्त
जव्हेरगंज.... मस्त च !!! भारी
जव्हेरगंज....
मस्त च !!! भारी आवडले हे आपल्याला
छानच जमलीय.
छानच जमलीय.
मस्त जमलिये
मस्त जमलिये
प्रत्येकाचा एरीया विभागून
प्रत्येकाचा एरीया विभागून दिला आहे. कथानायकाच्या एरीयात हायवेचा काही भाग येतो. विमान वगैरे हवाई एरिया ईतरांचा. त्या त्या एरियातली वेगवेगळी अॉर्डर!
वरती एक ऊल्लेख आहे "इन आवर एरिया" म्हणून. आणि अर्जन्सीच्या वेळेस शॉर्टकट निवडण्याची पद्धत असते.
हे सगळे निदान मलातरी कथेमधून प्रतित झालंय असे वाटत नाही तरीपण
आय लाईक द वे युअर ब्रेन वर्क्स.
कीप इट अप. +१
भारीये हे.
भारीये हे.
मस्तच !
मस्तच !
आय लाईक द वे युअर ब्रेन
आय लाईक द वे युअर ब्रेन वर्क्स.
कीप इट अप. +१
मस्त!
मस्त!
मस्तच! वेगळीच कथा.
मस्तच! वेगळीच कथा.
मस्तच
मस्तच
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
मला पुन्हा एकदा वाचावी लागेल.
मला पुन्हा एकदा वाचावी लागेल.
हटके आयडिया आहे! मस्त!
हटके आयडिया आहे!
मस्त!
खूप धन्यवाद !
खूप धन्यवाद !
कथा मस्त आहे जव्हेरगंज परत
कथा मस्त आहे
जव्हेरगंज परत एकदा लिहुन बघा. अजून आवळली जाईल. ३-४ ठिकाणी धागे सुटले आहे.
क्लाईंट शब्द खटकतोय.
मस्त आहे. सत्या म्हणजे कोण ते
मस्त आहे.
सत्या म्हणजे कोण ते नाही कळले.
सहीये !
सहीये !
@ जयंत.१ नक्कीच प्रयत्न
@ जयंत.१
नक्कीच प्रयत्न करेन,
३-४ ठिकाणी धागे सुटले आहे.>>>> कोणते हे समजल्यास फार बरे होईल.
क्लायंट= हा स्वर्ग किंवा नरकाचा इंचार्ज असे गृहीत धरु शकता.
@माधव, सत्या हा कथानायकाचा असिस्टंट आहे
धन्यवाद सर्वांचे.
डबल पोस्ट
डबल पोस्ट
भारीये. सह्हीच कल्पना.
भारीये. सह्हीच कल्पना.
मला काहीच नाही समजलं
मला काहीच नाही समजलं
Pages