कानी कुंडल - कृतीसह (पाकृ नव्हे)

Submitted by टीना on 25 December, 2015 - 07:05

मागच्या धाग्यावर खुप गर्दी झाली म्हणून म्हटलं नवीन धागा, भाग २ वगैरे काढावा..

सद्ध्या बरीच लग्न, कार्यक्रम झालेत घरी आणि गणगोतात त्यामुळे प्रत्येकवेळी ह्या ड्रेस वर मॅचिंग, त्या साडीवर मॅचिंग मूळे त्रासुन गेली Proud .. बर हरबार मनासारख मिळेल तर शप्पथ.. ज्वेलरी मधे फक्त कानात घालायला काय ते आवडत त्यातही नविन काही फॅशन आवडतच नव्हती म्हणून ये रे माझ्या मागल्या म्हणत सुरु झालेला कुंडल / झुमका प्रवासाची हि झलक तुमच्यासोबत शेअर करतेय..

अजुनही म्हणावं तसं विक्री बाबत सिरिअस नै आहे मी पण हरवेळी घरी जाते तर किट सोबत ठेवते साहित्याची आणि याला त्याला दाखवत सुद्धा असते म्हणून माझ्या माम्या, मावश्या, बहिणी असे ज्यांना ज्यावर जसे हवे तसे बनवून विकले तेवढाच काय तो अनुभव.. माझीही बनवायची हौस फिटून जाते आणि तयार केलेले झुमके सुद्धा खपून जातात तर तेवढेच पैसे सुद्धा मिळतात.. आता नोकरीवर असलेल्या याच गणगोतांची मित्रमंडळी सुद्धा मागणी करुन राहिली आहेत.. बघु कुठवर चालतोय हा प्रपंच ते..

कानातले बनवताना वापरत असलेल्या साहित्यावरुन त्याची किंमत ठरवते मी.. आणि हो समोरच्याशी किती गटगट आहे त्यावरही विकलेत म्हणा Wink .. असो..

स्काईप वर शिकवाव म्हणत होते पण माझं नेट आणि वेळ सगळ्यांची सांगड बसता बसत नै आहे म्हणुन येथेच स्टेप बाय स्टेप कृती देते म्हटलं.. जमवुन घ्या , निभावून घ्या ..
अडला व्हिडीयो, फोटोचे पाय धरी असं झालयं..

काही मागील धाग्यावर टाकलेले सुद्धा इथं देतेय. इतर सर्व नवे आहेत..

तर पहिले कृती देते. तुम्ही सुद्धा करुन पाहिल्यास मजा येईल.. बाकी तर सर्व आवडीप्रमाणे आहे म्हणा Happy

लागणारे साहित्य :

यात स्टूड (ठेपीच्या कानातल्यांसाठी लागणारा बेस) ला ग्लु गन च्या साहाय्याने अर्धा मोती चिपवून घ्यावा आणि त्याच्या बाजुने क्विलींग पेपर ने गोल करुन घ्यावा. त्यात तारेची गोल रिंग टाकून घ्यावी.

टोपाला चेन लावण्यापूर्वी आतल्या बाजुने पेपर वारनिश चे निदान दोन थर द्यावेत. त्यानी तो आकार फिक्स राहण्याकरिता मदत होते.
बॉलचेन टोपाला चिटकवण्यासाठी मी फेविकॉलचं रु. ३०/- ला मिळणार ऑल फिक्स वापरलय.

टोप / डोम तयार करण्यासाठी चा फोटो जालावरुन इथ डकवलाय..

खाली दिल्याप्रमाणे तारामधे सगळ्या गोष्टी अरेंज कराव्या..

प्लायर्स च्या मदतीने तार वळवून घ्या आणि तयार केलेल्या स्टूड मधे फिक्स करा. सरतेशेवटी पेपर वारनिश चे दोन हात त्यावरुन मारल्याने ते वॉटप्रुफ होतात (जहर खानेसे आदमी मरता है इसका मतलब ये तो नही के उसे खाया हि जाए Wink क्या समझे.. ) .

हे फायनल प्रॉडक्ट :

हे नवे जुने बनवलेले काही..

यापूढे बनवले तर फोटो टाकेल शायद..
लाईट्वेट असल्यामूळे तसेच हॅण्डमेड असल्यामूळे सुद्धा या प्रकारच्या ज्वेलरीला भरपुर मागणी आहे अन ते हि भरपुर किमतीत.. बघु साईड बिझनेस चा विचार करुन.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वापरते ती बिडचेन पेपर बेस वर चिटकवण्यासाठी फेविकॉल ऑल फिक्स वापरते आणि स्टूड वर चिटकवायला ग्लु गन.. लिहिलय ना मी वर Happy

बापरे... चरणकमल आणा टीनाबै... सुरेखच आहेत हे.
व्यावसायिक तत्वावर सुरू करणार असशिल तर इथे त्याचे डिटेल्स द्यायला विसरू नकोस गं.

Pages