Submitted by मार्तंड on 24 December, 2015 - 01:34
लग्नसंभारंभाच्या फोटोग्राफीसाठी सध्याचा ट्रेंड कोणता आहे? प्रि वेडींग व्हिडिओ आणि फोटोशुट करावे का?
या सगळ्याचे एकंदरीत बजेट काय आणि कसे? मायबोलीवर असे कोणी फोटोग्राफर आहे काय?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रि वेडींग फोटोशुट करायची
प्रि वेडींग फोटोशुट करायची इच्छा आहे. माझ्या एका मित्राचे पाहिलेले फेसबूकवर. बघून जळालेली माझी. कारण प्रत्यक्षात मी त्याच्या चारपट स्मार्ट आहे पण त्यात तो माझ्या आठपट स्मार्ट दिसत होता.
तर नातवंडांना दाखवायला की तुमची आजी आजोबा कसे हिरोहिरोईनवाणी होते म्हणून करायचे आहे.
तर काय कुठे कसे करायचे हे मला सध्या माहीत नाही पण तुमची इच्छा असेल तर कराच. इथून पुढे गेलात आयुष्यात तर मागे फिरता येत नाही.
प्रि वेडींग व्हिडिओ आणि
प्रि वेडींग व्हिडिओ आणि फोटोशुट करावे का? >> हौस असेल तर नक्की करा. मस्त वाटतं एकदम. माझा भाऊ फोटोग्राफर आहे तो करतो त्यामुळे मी बरेच पाहिलेले आहेत.
प्रोफेशनल फोटोग्राफरला भेटा ते सर्व व्यवस्थित मॅनेज करतात.
मार्तंड माझ्या मैत्रिणीचा
मार्तंड
माझ्या मैत्रिणीचा मुलगा वेडिन्ग फोटो शूट उत्तम करतो.
तुम्हाला हवं असल्यास त्याचा कॉन्टॅक्ट देईन.सध्या प्री वेडिन्ग फोटो व विडिओचा फारच ट्रेन्ड आहे.
कॉन्टॅक्ट नं असल्यास विपूत
कॉन्टॅक्ट नं असल्यास विपूत कळवलात किंवा ईमेल करा.
कोणी ह्या क्षेत्रातलं असेल तर आणखी वाचून घ्यायला नक्की आवडेल.
धन्यवाद
मार्तंड
मार्तंड विपु पहा.
मार्तंड
विपु पहा.
लग्नसंभारंभाच्या फोटोग्राफी
लग्नसंभारंभाच्या फोटोग्राफी फोटोग्राफरकडून करवणं हा एक भंपकपणा आहे.त्याचे व्हिडीओ स्वत: नवरानवी तरी बघतात का शंका आहे.या सिडींवर जे बॅकग्राउंड म्युझिक असते ते नंतर काढता/बदलता येत नाही.एक चचांगली गोष्ट म्हणजे नंतर येणाय्रा पाहुण्यांना पळवण्यासाठी याचा उपयोग होतो."जेवणासाठी थांब तोपर्यंत बब्या/बबलीच्या लग्नाची सीडी पहा."यात ९०टक्के कॅम्राचा फेकस धडाडणाय्रा होमावरच असतो १० टक्के वधुच्या न दिसणाय्रा चेहय्रावर.
खरंच एस आर डी सहमत, भावाच्या
खरंच एस आर डी सहमत, भावाच्या आणि स्वतःच्या लग्नाचा व्हिडीओ(स्वतःच्या लग्नाचा होता की नाही तेही आठवत नाही.) कधी पाहिल्याचे आठवत नाही.
मी तर म्हणते भराभार मोठा जड आल्बम पण बनवू नये, प्रत्येक विधीचा एक आणि गिफ्ट देणार्या प्रत्येक कुटुंबाचा एक इतके फोटो काढले तरी पुरे.
आता लग्नाचे फोटो पाहिले की रिग्रेट जास्त वाटतात, ब्युटीशियणीने किती फाउंडेशन मारुन भूत बनवले होते, साडीवरचा ब्लाउज थोडा अजून ट्रेंडी करता आला असता, हेअर स्टाईल किती बावळट सारखी केली आहे असे वाटते हल्लीची लग्ने पाहिल्यावर.
वर लग्नातले सूक्ष्म मानापमान, दोन कुटुंबाच्या विचारातले मिसमॅच इ.इ. पाहून 'लग्न आणि पहिल्या वर्षातले सर्व सणवार आणि त्यात दोन्ही बाजूंच्या इंटर अॅक्शन थोड्या कमी झाल्यावर सुखाचे आयुष्य जगणे चालू झाले' असे वाटते.
(माझे लग्न चारचौघांसारखेच व्यवस्थित दोन्ही बाजूच्या राजीखुशीने झालेय तरीही.)
आता लग्नाचे फोटो पाहिले की
आता लग्नाचे फोटो पाहिले की रिग्रेट जास्त वाटतात, ब्युटीशियणीने किती फाउंडेशन मारुन भूत बनवले होते, साडीवरचा ब्लाउज थोडा अजून ट्रेंडी करता आला असता, हेअर स्टाईल किती बावळट सारखी केली आहे असे वाटते हल्लीची लग्ने पाहिल्यावर.
वर लग्नातले सूक्ष्म मानापमान, दोन कुटुंबाच्या विचारातले मिसमॅच इ.इ. पाहून 'लग्न आणि पहिल्या वर्षातले सर्व सणवार आणि त्यात दोन्ही बाजूंच्या इंटर अॅक्शन थोड्या कमी झाल्यावर सुखाचे आयुष्य जगणे चालू झाले' असे वाटते.
(माझे लग्न चारचौघांसारखेच व्यवस्थित दोन्ही बाजूच्या राजीखुशीने झालेय तरीही.) +१
कधी कधी डॅाक्युमेंट्रीत
कधी कधी डॅाक्युमेंट्रीत दाखवतात अमुक लोकांत लग्न कशी होतात ते .चाळीस मिनीटांचा व्हिडिओत एका जोडप्याचे दोन्हीकडचे छोटे छोटे क्लिप्स अगदी बोलणी,ओळख,तयारी -नवरा नवरीची हेअर मेकप वगैरे,दोघे लग्नाअगोदर त्यांच्या मित्रांबरोबर शोवटची बॅचलर पार्टी करतात ते,इवेंट मॅनेजरची धावपळ,कपडे कुठे शिवतात,पाहुणे,डान्स सर्व कॅामेंट्रीसह दाखवतात असं पाहिजे.
त्याचे व्हिडीओ स्वत: नवरानवरी
त्याचे व्हिडीओ स्वत: नवरानवरी तरी बघतात का शंका आहे.
>>>
आयुष्याला वैतागले की रिवाईंड करून बघत असतील ..
रिवाईंड करून बघत असतील .. <<
रिवाईंड करून बघत असतील .. << त्यासाठी आताच्या जमान्यात व्हिसीआर कुठे भाड्याने मिळेल ?
एसआरडी, सुखद आठवणी असतात
एसआरडी, सुखद आठवणी असतात त्या. लग्न एंजाॅय केलं तर सर्वच भारी वाटतं. आणि आत्ताची पिढी तेच करतेय की. त्या आठवणी पुन्हा पुन्हा पहाव्याशा वाटण्याजोग्या जतन केल्या त्याला भंपकपणा का म्हणावं?
पूर्वीची फोटोग्राफी आणि शुटींगच्या शाॅट्सची कन्सेप्ट आता पुर्णपणे बदललेली आहे. त्यामुळे आत्ताच्या या सीडी वा अल्बम अजिबातच कंटाळवाण्या होत नाहीत.
बरोबर आहे पण आपलाच कॅम्रा
बरोबर आहे पण आपलाच कॅम्रा वापरून सर्व घटनांचे दोनतीन मिनीटांच्या क्लिप्स काढून वीस मिनीटस च्या दोन व्हिडिओ स्टोरी बनवली तर मजा येईल.नुस्ताच होम आणि सप्तपदी वगैरेचे शुटींग कंटाळवाणे होते असं म्हणतो.तंत्र सुखद व्हायला पाहिजे.
प्रि वेडींग व्हिडिओ आणि
प्रि वेडींग व्हिडिओ आणि फोटोशुट करावे का ?>>>>>>>>>>>>
आपण लग्नामधे हौस म्हणून कित्येक लाख रुपये खर्च करतो. त्यात हि पण एक हौस!
लग्नामधले कपडे, डेकोरेशन यामधे किती तरी खर्च होतोच कि. त्यात अ़जून ३० ते ४० हजार फोटोग्राफीचे वाढतात.
आपण ते फोटोज फेसबूक वर शेअर करतो. लोकं (करायच्या म्हणून) कमेंट करतात, लाईक करतात.
आपण आल्यागेल्या नातेवाईकांना/ मित्रांना ते फोटो (त्यांना बघायचे नसतात तरी) दाखवतो, ते कौतुक करतात.
आपल्याला उगीचच भारी वाटतं, आपला ईगो सुखावतो.
पण मी अनू आणि एसाआरडी हे म्हणतात ते खरे. कोणतीही जनरेशन असो, किती पण भारी मेक अप करुन, भारीतल्या भारी फोटोग्राफर कडून फोटोज जरी काढून घेतले तरी ते चार सहा महिन्यानी जुनेच होतात.
माझे, माझ्या भरपुर मित्रांची लग्ने मागच्या चार ते पाच वर्षात झाली. सगळ्यांचे अल्बम धूळ खात पडले आहेत..... कधीतरी बाय चान्स उघडले गेले तरी बायका त्यांच्या तेव्हाच्या बारिक असण्यावरुन, आणि नवरे टि शर्ट च्या आत लपणार्या पोटाकडे बघुन उसासे टाकत बंद करतात.
काही फुकट (भोचक) सल्ले
१. लग्नामधे मुलाकडून एक आणि मुलीकडून एक असे दोन फोटोग्राफर असतात. त्यापेक्षा ठरवताना दोघांनी मिळून एकच ठरवायचा. वाचलेला पैसा प्री वेडींग फोटोशूट साठी वापरायचा.
२. फोटोशूट केला तरी अल्बम करू नका. एक डिजीटल फोटोफ्रेम घ्या.
३. ( तुमच्या कडे एसएलाआर नसेल असे गृहित धरुन) प्री वेडींग फोटोशूट वर पैसे खर्च न करता एक एसएलआर घ्या (भेटल्याची/प्रपोज केल्याची अॅनिवर्सरी असले) काहीतरी निमित्त काढुन बायकोला द्या, तिलापण भारी वाटेल. काही दिवसातच जरा छान फोटो जमतील. एकमेकांचे छान छान फोटोज आयुष्यभर काढता येईल. काही वर्षांनी घरात बाळराजांचे आगमन झाले कि अजून फोटोज काढयला अजून मजा येईल. मस्त मेमरीज राहतील. व्हॅल्यू फॉर मनी.....
अतरंगी छान सल्ले दिलेत
अतरंगी छान सल्ले दिलेत
www.vivahphotos.com/ Mahesh
www.vivahphotos.com/
Mahesh Bhor :976-695-2969
Nowadays best photographer in pune area
फेसबूक वर कॅमकॅचेस या नावाने
फेसबूक वर कॅमकॅचेस या नावाने सौरभ दळवी यांचे पेज पहा. बरे आहेत फोटो.
contact@camcatches.com
अजून सेल्फी लग्नसमारंभात का
अजून सेल्फी लग्नसमारंभात का नाही आले?
Trio Wed-in Photography,
Trio Wed-in Photography, Pune
9673141773/7506403432
एका मायबोलीकरणीच्या लग्नाचं शूट यांनी केलं आहे. सुपर्ब!
प्रि वेडींग व्हिडिओ आणि
प्रि वेडींग व्हिडिओ आणि फोटोशुट करावे का ?>>>>>>>>>>>>
नक्की करावे
कारण त्यानंतर आपण कधीच हे करणार नसतो .
आठवणीना एक मुर्त रूप मिळते. त्यामुळे ते क्षण परत परत जगणे शक्य होते.
लग्नाचं शूट पण करावे . आपणच नाही तर आपले जवळचे नातेवाईक , मित्र ह्याच्या आठवणी त्यात येतात.
कदाचित त्या प्रसंग नंतर ४-५ वर्षात त्याची किमत नाही कळत पण तुम्हाला तुमच्या लहानपणीचा मित्र मैत्रिणीशी खेळतानाचा video मिळाला तर किती आनंद मिळेल.
आपल्या मागे उभी असलेली मावशी, आजी यांचे शूट बघताना पैसे वसूल होतात. कधी कधी हि लोक आपल्या आयुष्यातून निघून पण गेलेली असतात.
तुम्ही यांच्याशी संपर्क करू
तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता
http://www.vividmoments.in/
Phone- 9028216555
शुटिंगची सिडी मिक्सिंगमध्ये
शुटिंगची सिडी मिक्सिंगमध्ये शक्यतो नका करू. आवड असेल तर गोष्ट वेगळी. पण भलत्च काहीतरी करतात ते लोक. माझ्या नणंदेच्या लग्नात बिजली गिरी च गाण टाकून तिच्या फोटोवर बिजली दाखवलीहोति. माझ्या भावाच्या कॅसेटमध्ये सगळे हिरो हिरॉईन्स आल्या होत्या लग्नात असे दाखवलेले. आमच्या लग्नाची कॅसेट नशीब ओरिजनल ठेवली त्याने. तरीही कुठेतरी डोंगरात वगैरे सुट आणि शालूवर फेरफटका मारायला नेलाच त्यांनी. मला आपले ओरिजनल काय असेल ते चांगले वाटते.
डायरेक्ट वीज पाडली म्हणजे
डायरेक्ट वीज पाडली म्हणजे अतीच.
यावरुन आठवलं आमच्या घराला लागून एका कार्यालयाचे स्टेज आहे. मागच्या आठवड्यात तिथे रात्रीच्या लग्ना आधी इन्स्ट्रुमेंटल म्हणून सगळी दु:खी गाणी वाजवत होते. चिठ्ठी न कोई संदेस, हमसे का भूल हुई, जिंदगी ख्वाब है आणि बरीच काही. पण गाणी वाजवली मात्र अप्रतिम होती.
अजून तरी घराला लागून कार्यालयाचे स्टेज आणि स्पीकर असल्याचा पश्च्चात्ताप झालेला नाही, आता मे मध्ये बघू लग्नांच्या सीझन मध्ये.
प्री वेडिंग फोटो/व्हिडियो शुट
प्री वेडिंग फोटो/व्हिडियो शुट म्हणजे काय?
लोक आजकाल शुटिंगची सिडी करतच
लोक आजकाल शुटिंगची सिडी करतच नाही. ५ ते १० मिनिटाचा व्हिडिओ करतात फक्त.आता हे प्रकरण खर्चिक असणारच पण बघायला छान वाटत आणि कंटाळवाण होत नाही.
प्री वेडिंग फोटो एक दोन
प्री वेडिंग फोटो एक दोन जणांचे पाहिले. त्यात लग्नाच्या तारखेच्या पाट्या धरुन (डोन्ट मिस द डेट असे लिहीलेल्या) दोघे छान दिसतील असे फोटो काढले होते. आणी नुसतेच दोघांचे एकमेकांबरोबर असे पण. फोटो मस्त आले होते.
४ लग्नांचे पाहिले.
प्री वेडिंग फोटो/व्हिडियो शुट
प्री वेडिंग फोटो/व्हिडियो शुट म्हणजे काय? >> लग्नाच्या थोडे दिवसआधी दोघ मिळून छान छान फोटो काढतात किंवा एखादी थीम धरून व्हिडियो बनवतात.
प्री वेडिंग फोटो/व्हिडियो शुट
प्री वेडिंग फोटो/व्हिडियो शुट म्हणजे काय?
मी जे बघितले त्यात अगदी picture मधल्या सारखे शुटींग केले होते फिल्मी गाण्यावर बसवलेले होते. २-३ गाणी होती. पण अगदी प्रो काम केले होते सगळ्यांनी . शुटिंग, मेक अप , कपडे खरच एखाद्या हिंदी फिल्म सारखे केले होते . लवासा, ताम्हिणी घाटात शूट केले होते.
बरं...आमच्यावेळी असले नव्हते
बरं...आमच्यावेळी असले नव्हते
मग करायचे की प्री वेडिंग आणि लग्नाचे व्हिडियी शूटींग दोन्ही करायचे. आता लग्नात खर्च करतोच मग काही हजार इकडे तिकडे..ही काय परत परत करायची गोष्ट आहे का (सामान्य माणसासाठी).