नवीन धागा काढताना One time password आवश्यक केले तर

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 23 December, 2015 - 06:05

सध्या माबोवर वादविवादाचे असंख्य धागे निघत आहेत, बहुतेक धाग्यावर वाद होत आहेत, फेक आयडीचे प्रमाणही वाढले आहे तेव्हा असे सुचवावेसे वाटते की एखादा धागा उघडायचा तर One time password घेऊन उघडणे सक्तीचे केले तर बोगस धागे निघणे कमी होईल. तुम्हाला काय वाटते??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महिन्याला ७ ???????????
आव्वरा !!!!
महिन्याला ४, आणि एखादा आय.डी. धुमाकूळ घालत असेल तर २ च Wink

काय को इतना टेन्शन और खर्चा...ज्याला जे धागे उघडायचे उघडू देत. बहुतांश जनतेला आवडले नाहीत तर ते आपोआप मागे पडावे.
(एकाच सदस्याचे भरपूर धागे दिसून बाकी चांगले लेख मागच्या पानावर जातात हे मान्य,पण 'ओटीपी' हा एकाने दुसर्‍याच्या आयडी हॅक करुन खोटे लेख आणि प्रतीसाद लिहू नये यासाठी उपयोगी पडेल, भाराभार लिहू नये म्हणून उपयोग होणार नाही.)
भरपूर वादविवाद झाल्याने 'प्रशासकीय अनुमती' लेखांना ठेवायला लागून त्यामुळे हळूहळू बर्‍याच जुन्या सदस्यांनी सोडलेले एक गुणी संकेतस्थळ आठवले.ते अजूनही चांगले चालू आहे, फक्त जुना सेट ऑफ लोकाज नाही तिथे.

महिन्याला ७ ???????????
आव्वरा !!!! >> महिन्याला ७ ठिकच आहेत की. Happy एकच आयडी दिवसाला ५ धागे विणतो त्या मानाने.

<<माझ्यामते महिन्याला ७ धागे ही मर्यादा योग्य राहील.>> ऋन्मेऽऽ षा म्हणजे तुला ३-४-५ आयडी घेऊन ३५ धागे महिन्याला काढायला मिळतील ना ? मज्जा आहे बुवा एका माणसाची Happy

नाही, मी फार विचारपूर्वक आकडेमोड करत ७ हा आकडा आणलाय.

माझा सदस्य कालावधी - १ वर्षे २४ आठवडे = ३६५ + २४ * ७ = ५३३ दिवस
माझे आतापर्यंत धागे = १३२ (लोकांना उगाचच हजार झाल्यासारखे वाटतात Happy )

एवरेज ४.०४ दिवसांमागे एक धागा

जर ३१ दिवसांचा महिना पकडला तर ७.६८ धागे महिन्याला फक्त.

यातही गेल्या काही महिन्यांचा पॅटर्न पाहता मी फार च विचारपूर्वक धागे काढू लागलो आहोत हे आपल्याही लक्षात येईल च.
त्यामुळे खरे तर महिन्याला ६ सुद्धा पुरतील, तरी सेफ साईड ७ ठेवलेय कारण शिल्लक कॅरी फॉर्वर्ड नाही होणार..

यातही गेल्या काही महिन्यांचा पॅटर्न पाहता मी फार च विचारपूर्वक धागे काढू लागलो आहोत हे आपल्याही लक्षात येईल च.
>>> Rofl प्रसन्न वाचतोयंस ना रे बाबा.

माबो प्रशासनाने प्रत्येक धाग्यामागे जोरदार चार्ज लावावा. माबोलाही फायदा आणि आम्हाला सुद्धा.

यातही गेल्या काही महिन्यांचा पॅटर्न पाहता मी फार च विचारपूर्वक धागे काढू लागलो आहोत हे आपल्याही लक्षात येईल च
>>

ह्यास अनुमोदन !!

<<<<<<<त्यापेक्षा सदस्याला एका धाग्यावर चोवीस तासात जास्तीतजास्त (उदाहरणार्थ) तीनच प्रतिसाद देता येतील असे काहीतरी करावे.>>>>>>>>

बेफी : त्या आधी एका सदस्याला एका दिवसात एका पेक्षा जास्त धागे काढता येणार नाहीत असे काहीतरी करायला पाहिजे. प्रतिसादाचे नंतर बघु. इथे आफ्रीदीपेक्षा जास्त वेगात शतकाकडे वाटचाल चालू आहे.

एक - दोन आयडींना तर आयडींना तर आठवड्यात एकच धागा काढायची परवानगी दिली पाहिजे.

धाग्यांचे दोन प्रकार ठेवावेत. शहाणा धागा आणि वेडा धागा! वेड्या धाग्यासाठी चार्ज ठेवावा. कोणता धागा कोणत्या सदरात मोडतो ते ठरवण्यासाठी एक त्रिसदस्यीय समीती नेमावी. राकु, ऋन्मेष आणि विशाल म्हस्के ह्यांची! पगारेंना एक्स्टर्नल कन्सल्टंट म्हणून नेमावे.

अजून एक आयडिया... एक धागा काढला की धागाकर्त्याला १०० फटके द्यावेत माबो प्रशासनाने.
जितके धागे जास्त तितके फटके जास्त.
काहीं काही धागाकर्त्यांना फटके देताना १० देऊन एक मोजावा Proud

जसे सार्वजनिक व ग्रूपपुरता मर्यादीत असे दोन प्रकार आहेत तसा एक 'स्वतःपुरता मर्यादीत' असा प्रकार काढावा व रोज निघणारे धागे आपोआप त्यात कोंबले जावेत. त्यात धागाकर्त्याशिवाय कोणालाही अ‍ॅक्सेस नसावा.

अजून एक आयडिया... एक धागा काढला की धागाकर्त्याला १०० फटके द्यावेत माबो प्रशासनाने.
>>>
काही कमी नाही होणार का ताई? द्यायचं बोला .. ९० ला मी तयार आहे Happy

@ दक्षीणा,
तुम्ही धागाकर्त्यांना (सॉरी धागा काढत्यांना) चांगलीच "दक्षीणा" देवु करताय.

Pages