अभिनयाची जुगलबंदी !

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 December, 2015 - 12:21

चित्रपट शक्ती. अभिनयातील एक शहनशाह आणि एक बादशाह आमनेसामने. कोणी म्हणते अमिताभने दिलीपकुमार खाऊन टाकला, तर कोणी म्हणत दिलीपसाबनी बच्चनला खाऊन टाकला. एक ट्रॅजेडी किंग तर एक अ‍ॅंग्री यंग मॅन. दोघांना साजेसा रोल. कोणी कोणाला खाऊन टाकला हे ठरवणे थोडे अवघडच. पण इथेच खरी तुलनेची मजा असते.

हल्लीच्या काळातील एक चित्रपट.. मोहोब्बते! इथे पुन्हा तोच अ‍ॅंग्री यंग मॅन, जो बिग बी म्हणून ओळखू जाऊ लागलाय. तर आता त्याच्या समोर आहे किंग ऑफ रोमान्स शाहरूख खान. दोन सुपर्रस्टार आमनेसामने. ईतरही कित्येक चित्रपटांत या दोघांनी एकत्र काम केले आहे. पण जुगलबंदी म्हणावी अशी या एकाच चित्रपटात. शाहरूख त्याच्या होमपीच वर बॅटींग करतोय, तर अमिताभ समोरून डायलॉग डिलीव्हरी. दोघांचेही चाहते पुन्हा कोणी कोणाला खाऊन टाकला या चर्चेत.

नायकप्रधान चित्रपटांच्या संस्कृतीत दोन नायिका आमने सामने क्वचितच येतात. पण येतात तेव्हा चर्चा होतेच. त्यातही नृत्य असेल तर हमखास होते.
चित्रपट दिल तो पागल है. माधुरी दिक्षित आणि करिष्मा कपूर.
चित्रपट देवदास - पुन्हा एकदा माधुरी दिक्षित आणि ऐश्वर्या राय.
या दोन्ही चित्रपटांत माधुरी दिक्षितला अनुक्रमे करिष्मा आणि ऐश्वर्या राय यांनी मात दिली अश्या वावड्या उठलेल्या. माझा या दोन्हींवर विश्वास नाही.

नुकत्याच आलेल्या पिंगा गाण्यात दिपिका-प्रियांका चर्चेऐवजी वेगळाच वाद रंगला ती गोष्ट वेगळी. पण हाती आलेल्या परीक्षणांनुसार दिसण्यात दिपिका प्रियांकापेक्षा तर अभिनयात प्रियांका दिपिकापेक्षा सरस ठरलीय. खरे खोटे चित्रपट बघूनच ठरवावे लागेल.

कधीकधी असे अभिनयाचे सामने जुगलबंदी न राहता सरळसरळ खाऊन टाकला प्रकारात मोडतात. एक चटकन आठवणारे उदाहरण दामिनी.
खरे तर हा स्त्रीप्रधान चित्रपट. ऋषी कपूरचा रोल असाही चिरकूटच होता. दामिनी झालेली मीनाक्षी क्षेषाद्री डोळे झाकून त्याला सरस ठरत होती. पण अचानक मध्यंतरानंतर सनी देओल कुठून उगवला आणि त्याने दामिनीसकट चित्रपट खाऊन टाकला.

पण या पापाची फळे त्याला डर चित्रपटात भोगावी लागली. ज्यात तो हिरो होता. हे आता म्हणायलाही कसेतरीच वाटतेय. पण खरेच तो हिरो होता. आणि तेव्हा नवोदितच असलेल्या शाहरूखने निगेटीव्ह भुमिका अशी काही साकारली की सनी देओल, जुही चावला आणि ईतर छोट्या मोठ्या कलाकारांसह तो अखंड पिक्चरच खाऊन टाकला.

सलमान खान आणि अभिनय हे एका वाक्यात लिहायचे दोन शब्द नाहीत. अगदी `हम आपके है कौन' मध्ये तो कितीही गोड गोजिरवाणा वाटला असला तरी माधुरीने तो चित्रपट सहजपणे आपल्या पदरात घेतला होता. पण अश्याच काही अपेक्षा ठेवून मी `प्यार किया तो डरना क्या?' बघायला गेलेलो तर तिथे उलटेच झाले. काजोलने आपल्यातर्फे काहीही कसर ठेवली नव्हती, आणि तिची भुमिकाही तोडीस तोड होती. तरी तो चित्रपट मला सलमानचाच `वन मॅन शो' वाटला होता. पण त्यानंतर त्यातला तो तसा सलमान फार क्वचितच दिसला.

शाहरूख खान आणि आमीर खान या दोघांची जुगलबंदी बघायची फार्रफार इच्छा आहे. एक आतली खबर लागली आहे की २०१७ ला ती पुर्ण होण्याची शक्यता आहे. अभिनय तसेच स्टारडमच्या जुगलबंदीबरोबर काही बॉक्स ऑफिस रेकॉर्डही तुटलेले बघायला मिळतील.. पण भविष्याचे बाजूला राहू द्या, तुर्तास भूत-वर्तमानातच राहूया..

धागा सुरू करायला ईतके पुरेसे आहे, नंतर भर टाकतो ...
जुन्या चित्रपटांमध्येही अभिनयाची जुगलबंदी वगैरे रंगत असतील तर येऊ द्या ..
मी जुन्यातील काही आठवायला गेलो तर सौदागर मधील जय वीरू, आणि तिरंग्यातील नाना पाटेकर आणि राजकुमार यांच्या आधीचे काही आठवत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललिता प्रिती चित्रपट शक्ती Proud

'सिलसिला'मधल्या जया-रेखा (हे नाहीये ना धाग्याच्या हेडरमधे?) >>> नाही.. त्या डोला रे डोला किंवा पिंगा रे पिंगा किंवा गेला बाजार चाक दूम दूम करत नाचल्या असत्या तर आल्या असत्या Happy

बेफिकीर यांनी दिलेल्या यादीत सुधारणा :-

१९. शम्मी कपूर - राजेश खन्ना (बहुधा सफर)

हे काही कळलं नाही. कारण हे दोघे अंदाज मध्ये होते परंतु एकमेकांसमोर आले नाहीत आणि सफर मध्ये राजेश खन्ना आणि फिरोज खान होते पण तेही समोरासमोर आल्याचं आठवत नाही.

सर्वात बेस्ट जुगलबंदी.

अमर अकबर अँन्थोनी मधील. अमिताभची आरश्या बरोबर झालेली जुगलबंदी. साला कित्ता मारा तेरेकु कित्ता मारा. अभी अपून तेरे को दवा लगाता है. थोडा जलन होएंगा पर सहनैका. कया..

  1. चलती का नाम गाडी - अशोक कुमार / किशोर कुमार (अनुपकुमार यांना फारसे स्थान नाही)
  2. हाफ टिकेट - किशोरकुमार / प्राण
  3. पडोसन - किशोरकुमार / मेहमूद (नायक असुनही सुनिल दत्त यांना फारसा वाव नाही)
  4. कांटे - अमिताभ बच्चन / संजय दत्त / महेश मांजरेकर (अनपेक्षित रीत्या शेवटी कुमार गौरव बाजी मारून जातात)
  5. बुलंदी - राजकुमार / डॅनी डँझोप्पा
  6. गिरफ्तार - अमिताभ / कमल हसन / रजनीकांत
  7. शक्ती - दिलीपकुमार / अमिताभ / अनिल कपूर {जाहिरात अशी केली की सुपरस्टार कालचा, आजचा आणि उद्याचा; प्रत्यक्षात अनिल कपूर यांना काहीच वाव नव्हता}
  8. विजय - अनिल कपूर / अनुपम खेर / राजेश खन्ना (या तिघांपुढे ऋषी कपुर यांना काहीच प्रभाव पाडता आला नाही)
  9. इन्सानियत - देव आनंद / दिलीप कुमार {देव आनंद ज्युनिअर असुनही नायिका गटवतात)
  10. छुपा रुस्तम आणि तेरे मेरे सपने - विजय आनंद / देव आनंद {विजय आनंद दिग्दर्शक असून महत्त्वाची भूमिका देव आनंद यांची आहे}
  11. मुनिमजी व जॉनी मेरा नाम - देव आनंद / प्राण
  12. देस परदेस - देव आनंद / प्राण / डॉ. श्रीराम लागु
  13. तमाशा - देव आनंद / अशोक कुमार / बिपिन गुप्ता / किशोर कुमार
  14. ज्वेल थिफ - देव आनंद / अशोक कुमार / नाझिर हुसैन
  15. प्रेम पुजारी - देव आनंद / शत्रुघ्न सिन्हा / नाझिर हुसैन
  16. गॅम्बलर - देव आनंद / शत्रुघ्न सिन्हा (अगदी शेवटी न्यायालयातले दृश्य)
  17. वॉरंट - देव आनंद / प्राण / अजित
  18. लुटमार - देव आनंद / मेहमूद
  19. मनपसंद - देव आनंद / मेहमूद / गिरीश कर्नाड
  20. सौ करोड - देव आनंद / नसिरुद्दीन शाह {देव आनंद दिग्दर्शक असून महत्त्वाची भूमिका नसिरुद्दीन शाह यांची आहे आणि हे जगातल्या सातही आश्चर्यांना मागे टाकावं इतकं महत्त्वाचं आश्चर्य आहे.}
  21. अव्वल नंबर - देव आनंद / अमिर खान / आदित्य पांचोली (देव आनंद यांच्या हातात चित्रपटाची सर्व सूत्रे असल्याने त्यांनी इतरांच्या भूमिका कापत स्वतःला अवास्तव महत्त्व दिल्याची अमिर खान यांची टीका)
  22. दोस्ताना - अमिताभ / शत्रुघ्न सिन्हा
  23. कभी कभी - अमिताभ / शशी कपूर (अनपेक्षित रीत्या शेवटी शशी कपूर बाजी मारून जातात)
  24. धडकन - सुनील शेट्टी / अक्षय कुमार
  25. अजनबी - अक्षय कुमार / बॉबी देओल

अभिनयाच्या जुगलबंदीत राजेंद्रकुमार - सुनील शेट्टी-अक्षयकुमार- बॉबी देओल आले. देव आनंदचे सगळे सिनेमे आले.
आता सुडोमि(टावे) झालं.

अभिनयाच्या जुगलबंदीत दोन व्यक्तिरेखांपैकी एक वरचढ ठरणं, विजयी होणं अपेक्षित नाही, तर दोन्ही अभिनेत्यांनी तोडीस तोड अभिनय करणं अपेक्षित आहे. म्हणजे एका पात्राने दुसर्‍याच्या थोबाडीत मारली तर दुसर्‍याने उलटून थोबाडीत मारणं नव्हे तर दुसरे पात्र साकारणार्‍या अभिनेत्याचा थोबाडीत खाण्याचा अभिनय थोबाडीत मारणार्‍याच्या तोडीस तोड हवा.

लाल पत्थर पाहिलाय. हेमामालिनीची वेगळीच भूमिका. राखीने तिला खाल्लं असेल तर तिला अजिबात पचलेलं नाही पुढच्या अख्ख्या कारकीर्दीत.

अहाहा, बिपीनचंद्र,
किती छान मुद्देसूद आणि क्रमयान्वये लिहीलीय यादी!
अगदी परीक्षेचं उत्तर लिहिल्यासारखं वाटतंय.

राजेंद्रकुमार आणि अभिनयाची जुगलबंदी?
मुळात त्याचा अभिनयाशी संबंध काय?

अभिनयाच्या जुगलबंचीचं एक पटकन आठवणारं उदाहरण म्हणजे सामनामधले डॉ. लागू आणि निळू फुले!

सुनिल दत्त, राजेंद्रकुमार आ़णि सनी देओल यांचा उल्लेख आधीच्या याद्यांमधे असल्याने अभिनयाच्या जुगलबंदीत मी दिलेली इतर नावे (सुनिल शेट्टी, अक्षयकुमार, बॉबी देओल) अप्रस्तुत ठरू नयेत.

शक्ती - दिलीपकुमार / अमिताभ / अनिल कपूर {जाहिरात अशी केली की सुपरस्टार कालचा, आजचा आणि उद्याचा; प्रत्यक्षात अनिल कपूर यांना काहीच वाव नव्हता}

>>>>

अनिल कपूर आणि दिलीपकुमार यांची जुगलबंदी मशालमध्ये होती. आवडीच्या चित्रपटांपैकी एक..

कर्मा मध्ये पण मस्त एकेक जुगलबंद्या रंगलेल्या. भले तो लाऊड मसालापट असला तरीही. नासीर दिलीपवर भडकतो तो शॉट पण मस्त..

१. मेरे अपने - विनोद खन्ना / शाॅटगन
२. अमर, अकबर, ॲंथनी - अमिताभ / विनोद खन्ना (फाइट सीन)
३. शराबी - अमिताभ / प्राण
४. पिकु - अमिताभ / इर्फान खान
५. सरकार - अमिताभ / के के मेनन / अभिषेक
६. मकबुल - पंकज कपुर / इर्फान खान
...

सामना या सिनेमाच्या वेळी लागूंचं नटसम्राट मुळे नाव झालेलं होतं. नटसम्राट करायला मिळणे म्हणजे त्याच्य अभिनयक्षमतेची पावती अशी एक ओळख त्या नाटकाची निर्माण झाली होती. तर निळूभाऊंच्या नैसर्गिक अभिनयाला तोड नव्हती. या दोघांच्या क्षमतेचा पूर्ण वापर जब्बार पटेल यांनी सामना मध्ये केला. लागूंचा अभिनय हा अत्यंत सकस आणि बारकावे टिपणारा होता. तरी देखील निळूभाऊ भाव खाऊन जातात या सिनेमात. नाजुका किंवा पुढचं पाऊल मधल्या निळूभाउंच्या भूमिका पाहील्या तर त्याचं उत्तर सापडतं. जगाच्या शाळेत अभिनयाचे धडे गिरवलेला हा कलाकार होता. यात डॉ लागूंना कुठेही कमी लेखण्याचा प्रयत्न नाही. ते माझे आवडते कलाकार आहेत.

सागर मधे ऋषीकपूरने चांगला अभिनय केलाय. पण त्याचंही डॉ लागूंसारखंच झालंय, कारण समोर कमल हसनच्या ताकदीचा अभिनेता होता. ऋषीने काहीच वाइट अभिनय केला नाही. कमलच्या वाट्याला सहानुभूती आली म्हणून नव्हे त्याची ताकदच अफाट आहे.

आनंद, नमक हराम , चुपके चुपके, मिली, सौदागर मधला अमिताभ जंजीर पासून हरवत गेला. आजही लोकांना सलीम जावेद छाप सिनेमातलाच अमिताभ आवडतो. पण त्याची ताकद त्याच्या पूर्वीच्या सिनेमात दिसली होती. दीवार पासून तो शैलीदार अभिनेत्यात बदलत गेला. त्याचा दिलीपकुमार झाला.
मात्र शैलीदार अभिनेता ही ओळख कायम ठेवूनही दिलीपसाबचा डोळ्यातील सूक्ष्म अभिनय, कायिक वाचिक अभिनय इ. च्या जवळपासही अमिताभ बच्चन फिरकू शकत नाही.

धरम करमच्या वेळी राज कपूरने रणधीरला दिलीपकुमार च्या अभिनयाचं उदाहरण दिलं होतं असं रणधीरने त्याच्या मुलाखतीत सांगितलं होतं.

त्यामुळं जुलगबंदी म्हटलं की चटकन सामनाच आठवतो.
बाकी संजीव - जया ही जोडी भन्नाटच होती. त्यांचा आणखी एक सिनेमा होता, नौकर.

अरे संसार संसार - रंजना, अशोक सराफ
ज्या वयात हा चित्रपट पाहिला तेंव्हा फार काही कळत नव्हतं. पण अशोक सराफ चा खलनायक आणि त्याला पुरुन उरणारी रंजना भारी वाटले होते. अशोक सराफ ला कधी खलनायकी भुमिकेत पाहिलं नव्हतं त्यामुळे तो लक्षात राहिला आणि त्याला झुंज देणारी रंजना पण. हे झालं कथानकाबाबत, ज्यांनी जाणत्याला वयात पाहिला आहे त्यांनी अभिनयाबाबत प्रकाश टाकावा. कारण हा चित्रपट परत कधीच पाहिला नाही.

मस्त धागा. वर उल्लेख झालेल्या बर्‍याच जबरदस्त.

काही अजुन,
सदमा - नावांची गरज नाही, नाही?
हमदोनो - नाना, ऋषीकपूर
कौन - मनोज वाजपेयी, उर्मिला
सिलसिला मधला सीन ज्यात बच्चन जयाला सोडुन जाणार सांगतो तो त्याचा मोठा संवाद व त्यावर जयाचे उत्तर.

सध्या इतकेच.

शोले व सौदागर मधे गोंधळ होतो असे म्हणुन कु.ऋ. यांनी जवळ्जवळ पापच केले. Happy

अरेच्य्या
अंदाज अपना अपना या चित्रपटाचा कोणीच कसा उल्लेख केला नाही

एक से एक जुगलबंदी होती.
अमर - प्रेम
भल्ला - रॉबर्ट
बजाज - तेजा

एक से एक होते मास्तरपिस

शाहरूख आणि परमीत यांची अभिनयाची वा अदाकारीची जुगलबंदी असे काही वाटले नाही त्यात.. कुठे शाहरूख कुठे परमीत..

शाहरूखचा विषय निघालाच आहे तर त्याची नसीरुद्दीन शहा बरोबरची 'चमत्कार' मधील जुगलबंदी मस्त वाटते. अर्थात नासीर अभिनयातला बाप माणूस आणि त्यातील भुताची भुमिका पिक्चर खाऊन टाकणारी.. समोर नवोदीत कलाकार सो कॉलड नायकाच्या भुमिकेत असून दुर्लक्षलाच गेला असता.. मात्र शाहरूखने ततपप करत जान आणलेली.. त्यातील देवेन वर्माही सहीच!

शाहरूखचा विषय निघालाच आहे तर त्याची नसीरुद्दीन शहा बरोबरची 'चमत्कार' मधील जुगलबंदी मस्त वाटते.> हो हो म्हणजे काय? अर्थातच.

सस्मित, हे आपण मस्करीच्या टोनमध्ये लिहिलेय की सिरीअसली... कारण खरंच तसे होते. बरेच जण पूर्वीचा शाहरूख म्हणताना डर, बाजीगर, कभी हा कभी ना ची नावे घेतात.. पण मला त्याचबरोबर चमत्कार आणि राजू बन गया जंटलमॅनमधील त्याचा रोल खूप आवडतो.. एखाद्या प्रसंगाची रिपीट वॅल्यू वाढवणे, पुन्हा पुन्हा बघावासा वाटणे ही ताकद आहे त्याच्या अभिनयात. राजू बन गया जंटलमॅनमध्येही त्याचे आणि नानाची जुगलबंदी व्हावी असे सीन फारसे आले नाहीत. पण आले असते तर ते ही कमाल झाले असते. नानाचा बोलीबच्चन रोलही मस्त आहे त्यात.

Pages