सुटला हरामखोर ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 December, 2015 - 17:15

सुटला हरामखोर.. निर्भया प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगार.. आता पुन्हा काही मोर्चे निघतील मग कदाचित सारे काही थंड.. बातम्यात तिच्या आईला पाहिले.. बघवत नव्हते.. फाशीपेक्षाही काही जास्तीची शिक्षा असेल तर ती तिला त्या लोकांना द्यावीशी वाटत असेल .. पण प्रत्यक्षात मात्र गुन्हा सिद्ध होऊनही एक जण आज सुटत आहे.. याला जबाबदार कोण.. आपण की कायदा.. आमच्या शेजारच्या बाईने जो संताप व्यक्त केला.. क्षणभर माझा थरकाप उडाला.. सोळा अठरा वर्षांची मुलगी आहे तिला.. म्हणाली इसको बाहर निकलतेही मार देना चाहीये.. कल हमारी बेटी घर के बाहर जाती है, उसको थोडा लेट होता है तो हमको डर लगा रहता है.. ऐसे लोगो को ये खुला कैसे छोड सकते है... कायदा हातात घेऊ नये या मताचा असलो तरी शप्पथ असे काही झाले तर चांगलेच वाटेल.. कायद्याचा नाही तर निदान हा वचक तरी राहील.. असे काही पब्लिक फोरमवर लिहिणे चूक की बरोबर माहीत नाही.. पण भावना अश्याच आहेत

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शक्यता तीच वाटते आहे, त्याला केजरीवाल सरकार जरी मदत देऊन सोडतेय, मला वाटतं, कायदा हातात घेणारं पब्लिक भावनेच्या भरात किंवा ठरवून त्याला बदडणार... किंवा पॉलीटिकल पार्टी त्याला धुणार (आणि मग तो मुस्लीम होता, म्हणून त्याला मारले असं म्हणून पुन्हा चिखलफेक होणार...) सर्व टोकाच्या शक्यता मी विचारात घेतल्या, पण यापेक्षा वेगळं झालं, तरी रुखरूख लागलेली असेलच, की तो मोकाट का (सलमानच्या बाबतीत लोक काही करू शकत नाहीत तसंच... पण, याच्याकडे पैसे नसतील तेवढे स्वतःला वाचवायला...)

या प्रकरणात निकाल लवकर लागला पण कायदा निट नाही त्यामुळे सुटला. त्यासाठी कायदा बदलायला हवा. पण "बच्चे है बच्चोसे गलतिया हो जाती है " अशी विचारसरणि असलेली लोक कायदा बनवायला विरोध करत आहेत. त्यात मेनका गांधी सारखे लोक देखिल लहान मुलाना न्याय मिळणार नाही ह्याची चिंता व्यक्त करतात. (१६ वर्षाचा मुलाना पण अश्या अपराधासाठी शिक्षा द्यायचा कायदा लोकसभेत १६ मे २०१५ ला पास झाला आहे). पण हा कायदा राज्यसभेत अडकुन पडला आहे आणि तिकडे बहुमत नाही. १६ मे २०१५ ला शशी थरुर ची चिव चिव (tweet)

“Attempts2inject humanity into JuvenileJusticeBill crushed by Govt's brute majority in LokSabha. To kids, suit-boot sarkar=brute-jhoot sarkar.”

अधिक माहितीसाठी
http://www.thehindu.com/news/national/lok-sabha-passes-uvenile-justice-c...

आपणच ह्या लोकाना निवडुन देतो आणि त्यानी हा कायदा केला म्हणजे आपणच हा न्याय दिला असा होतो. ह्या सगळ्या गोष्टीचा राग येतो पण काय करु शकत नाही.

अमेरिकेत पण मुलगी बाहेर जाते त्या गोष्टीची भिती वाटते पण असे काही झाले तर गुन्हेगाराला शिक्षा होते. आणि अश्या मोठ्या अपराधाला बर्याच स्टेट मध्ये मुलाना देखिल adult treat केले जाते.

हा मुलगा बहुधा महिन्याभरात मरेल. तो सुरक्षित राहावा म्हणून खर्च केला जाऊ लागला तर लोकं आणखीनच भडकतील. कुठूनतरी बातमी फुटेल तो कुठे आहे ह्याची आणि मग हल्ला होऊन त्यात तो मारला जाईल असे वाटते.

आता सध्या तरी लोकांचा राग निर्भयाचे काय झाले ह्यापेक्षा हा मुलगासुद्धा सुटू शकतो ह्यावर अधिक दिसत आहे.

अरे! तुमच्या शेजारणीला अजून कळलेले दिसत नाही की या देशात मुलगी म्हणून जन्माला येणे किंवा तुमच्या पोटी मुलगी जन्माला येणे हा फार मोठा गुन्हा आहे...किंवा पूर्वजन्मीच्या पापाची सजा म्हणू आपण त्याला!

निर्भयाच्या या बलात्कार्‍याला केजरीवालांनी १०,००० रुपये व नवीन आयडेन्टिटी देऊन सोडले आहे. आता तो कोण हे कधीच कळणार नाही व तो कधीच हाती लागणार नाही. या बलात्कार्‍याविषयी देशात भरपूर सहानुभूती आहे. अगदी मायबोलीवरही त्याच्या समर्थनाच्या पोस्ट्स बघितल्या आहेत. आता तो दिवस फार दूर नाही जेव्हा बलात्कार व त्यातून होणारे खून हे गुन्हे नाहीतच, तो पुरुषांचा हक्कच आहे असाही कायदा येईल.भारताला 'बलात्काराची जागतिक राजधानी' म्हणतात ते काही उगाच नाही. भारतात अगदी कीडामुंगी म्हणून जन्माला यावे पण मुलगी म्हणून जन्माला येऊ नये. आणि संतती प्राप्त झाली नाही तरी उत्तम पण मुलगी जन्माला घालू नये.

तो पण असेच हाल होऊन मेलेला बरा. कारण त्या चार गुन्हेगारान्मध्ये वयाने लहान असुनही त्यानेच आधी निर्भयाचे हाल करुन तिला मारले. अशाना फाशी सुद्धा कमी पडेल. एक कणाचीही सहानुभुती नाहीये असलया लोकान्बद्दल. तो लोकान्च्या हातुन मारला गेला की मग कळेल जनतेचा सन्ताप काय असतो ते. परवा एका साधुला गावकर्‍यानी मारुन टाकले कारण त्याने एका लहान मुलाचा खून केला होता, आणी ज्याचा खुन केला त्याच्याच आजोबान्च्या आश्रयाला रहात होता.

असली घाण समाजातुन नाहिशी झालेलीच बरी.

हा मुलगा बहुधा महिन्याभरात मरेल. तो सुरक्षित राहावा म्हणून खर्च केला जाऊ लागला तर लोकं आणखीनच भडकतील. कुठूनतरी बातमी फुटेल तो कुठे आहे ह्याची आणि मग हल्ला होऊन त्यात तो मारला जाईल असे वाटते.

>>
to mulga samjun lokkanni bhalatyach mulala marale tar?

निर्भयाच्या या बलात्कार्‍याला केजरीवालांनी १०,००० रुपये व नवीन आयडेन्टिटी देऊन सोडले आहे. >>
जरा माहीती घेऊन मग बोलावे. तसा कायदा आहे त्या कायद्यानुसार राज्यसरकारला वागावे लागते. हे सगळ्या बालगुन्हेगारांना मिळते. उगाच काहीही बोलायचे म्हणून बोलू नये.
राहीले त्या गुन्हेगाराविषयी. तर सरकारने त्याचा फोटो पेपरांमधे देऊन त्याची ओळख जाहीर करावी. मग तो जिवंत राहो अथवा न राहो. कायद्याला काहीही वाटणार नाही

आज बातमी वाचली तेव्हा मनातली रिअ‍ॅक्शन याच शिवीसकट हीच होती.
पण या नालायकाबद्दल एक्सेप्शन होऊन निदान मोठी शिक्षा मिळेल असं वाटत होतं.
बालगुन्हेगारांबद्दल असा कायदा असेल तर कायदा सरकारने पाळला. नवी आयडेंटिटी देणं हा नियम असेल तर कोणाही अनोळखी सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा सिक्युरीटीला ठेवताना प्रचंड भीती वाटेल.

आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. ( हा अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत का केला नाही ? ) त्याची सुटका करण्यापुर्वी, त्याची एका स्वयंसेवी संस्थेतर्फे मानसिक तपासणी व्हावी अशी मागणी आहे. ( तसा कायदाही आहे, असे काल एन डी टी व्ही वरच्या चर्चेत कळले )

<<राहीले त्या गुन्हेगाराविषयी. तर सरकारने त्याचा फोटो पेपरांमधे देऊन त्याची ओळख जाहीर करावी. मग तो जिवंत राहो अथवा न राहो. कायद्याला काहीही वाटणार नाही>>
------ सरकारला त्याचे नाव जाहिर करता येणार नाही.... त्याला वेगळे नाव आणि आयडेटटी मिळेल, कुठेतरी तो नव्या आयुष्याची सुरवात करेल...

त्याने गुन्हा केला, अत्यन्त गन्भिर गुन्हा केलेला आहे... कायद्यानुसार त्याला शिक्षा मिळालेली आहे. कायद्यानुसार त्याला मिळालेली शिक्षा त्याने भोगलेली आहे. सम्पुर्ण शिक्षा भोगुन तो आज बाहेर येत आहे... एकाच गुन्ह्यासाठी दोन वेळा त्याला शिक्षा होणे कायद्यानुसार शक्य नाही... आज जरी कायदा बदलला तरी त्याला नव्या कायद्यानुसार शिक्षा होणे अशक्य आहे, कायदा बॅकडेटेड लागू होत नसतो.

मला निर्भया बद्दल सहानुभुती आहे आणि तिच्यावर झालेला अत्याचार माणुसकीला शरम आणणारा आहे, अत्यन्त चिड आणणारा आहे...

हे सर्व बघणे म्हणजे निर्भयाच्या परिवाराला जबर शिक्षा आहे... Sad

एकाच गुन्ह्यासाठी दोन वेळा त्याला शिक्षा होणे कायद्यानुसार आहे... आज जरी कायदा बदलला तरी त्याला नव्या कायद्यानुसार शिक्षा होणे अशक्य आहे, कायदा बॅकडेटेड लागू होत नसतो.>> बरोबर म्हणून त्याची ओळख जाहीर करण्यात यावी. सरकारचे हात कायद्याने बांधले गेले आहे ते नाही करू शकत तर इतरांनी जसे एनजीओ वगैरे यांनी त्याची ओळख जाहीर करावी.

काल शांततापुर्वक प्रदर्शन करणार्‍या निर्भयाच्या पालकांना पोलिसांनी अटक केली. हे ही चुकिचे आहे. ज्या केसवर देशभरात असंतोष निर्माण करून सत्ता काबीज केली त्यांनी सत्ताप्राप्तीनंतर रंग दाखवले

या नालायकाबद्दल एक्सेप्शन होऊन निदान मोठी शिक्षा मिळेल असं वाटत होतं.> +१.
गतिमंद मुलांच जसं बौद्धिक वय वेगळं काढतात , तसच या गुन्हेगाराचं विकृत वाढीचं वय वेगळं काढून याला बाल म्हणून बाद करून शिक्षा व्हावी.

सर्वोच्च न्यायालयाने Delhi Commission for Women चा अर्ज फेटाळला... आणि हे होणे अपेक्षित होते. कायद्याला भावना नसतात... Sad

काल शांततापुर्वक प्रदर्शन करणार्‍या निर्भयाच्या पालकांना पोलिसांनी अटक केली. हे ही चुकिचे आहे. ज्या केसवर देशभरात असंतोष निर्माण करून सत्ता काबीज केली त्यांनी सत्ताप्राप्तीनंतर रंग दाखवले
<<

रामलीला मैदानावर प्रदर्शन करायला निर्भयाच्या पालकांना, दिल्ली सरकार किंव्हा पोलिसांनी कसलीही आडकाठी केली नव्हती, पण हि लोक प्रदर्शन करायला जेंव्हा इंडीया गेट समोर आली तेंव्हाच निर्भयाच्या पालकांना पोलिसांनी अटक केली व लगेच सोडून देण्यात आले. इंडीया गेट समोर कोणत्याही प्रकारचे प्रर्दशन करण्याला कायद्याने मनाई आहे.

नवी आयडेंटिटी देणं हा नियम असेल तर कोणाही अनोळखी सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा सिक्युरीटीला ठेवताना प्रचंड भीती वाटेल.
>>>
या नवी आयडेंटीटी बद्दल मी अजून सविस्तर वाचले नाही पण योग्य मुद्दा आहे हा.
तुमचा कायदा गंडलेला असल्याने शिक्षेतून सुट मिळाली हा नाईलाज झाला. पण या बालकांना(!) सुधारण्याची आणि नवीन आयुष्य सुरू करण्याची संधी देण्यास अशीही तरतूद कायद्यात असेल तर आपण म्हणता तसे हे घातकच आहे. आणि याची ग्यारंटी कोण घेणार?

त्याची सुटका करण्यापुर्वी, त्याची एका स्वयंसेवी संस्थेतर्फे मानसिक तपासणी व्हावी अशी मागणी आहे. ( तसा कायदाही आहे, असे काल एन डी टी व्ही वरच्या चर्चेत कळले )>>>>

What are the rules of running the child reforms center? By name it is supposed to reform the children and develop them towards a balanced life. Is there any regular assessment done of the children? If yes then what was the output of such assessments for the convict in Nirbhaya case? If he was found reformed then what happened today is fine.
Sunday issue Maharashtra Times carry article on juvenile criminals. The writer talked about the psychological growth of children. The writer appear to be against a generalised laws to consider juveniles at par with adult criminals. Before reading the article even my feelings were strong against the criminal in Nirbhaya case. But now I feel more forgiving. And yet I'm definitely against allowing the boy to get a new identity. It will be unsafe as pointed out by mi_anu and runmesh. I feel somehow the society should keep a watch on him, encourage him to stay away from criminal ways.
I'm torn between strong feelings of injustice for both Nirbhaya and the juvenile (giving him doubt of lack of psychological growth). Sad

http://maharashtratimes.indiatimes.com/edit/samwad/balagunhegari-growing...

मुलांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी तो कायदा आहे .
भावनेच्या भरात येवून टोकाची भूमिका घेणे हे पण चुकीचं आहे.
लहान वयात त्यांना कोण्ही कायद्याच्या कचाट्यात अडकवू नये म्हणून ते कायद्या चे संरक्षण आहे.
गंभीर गुन्ह्यात अपवादात्मक स्थिती मध्ये एकाध्य बालगुन्हेार ला शिक्षा दिली जावी जसे निर्भया कांड.
पण सर्रास नाही.
कायद्या चे संरक्षण काढणे चुकीचं आहे.

कायदेशीर वय ही एक गाईडलाईन असावी. प्रत्यक्षात प्रत्येकाला अक्कल येण्याचे वय वेगळे असते. एखादा वीस वर्षाचाही बावळट वा अपरिपक्व असू शकतो. तर एखादा पंधरा सोळा वर्षाचाही क्रिमिनल माईण्ड असू शकतो. नवी जनरेशन स्मार्ट होतेय, लवकर अक्कल येते असे आपण म्हणतो ते ईथेही लागू...
असो... मूळ प्रश्न अश्या घटनांची संख्या कमीत कमी कशी होईल हाच आहे. दुर्दैवाने ती वाढलीच आहे

काल निर्भयाच्या आईची मुलाखत दाखवत होते. तसेच त्या आरोपींच्या आईवडीलांनाही विचारायला हवं.... कुठलेच आईवडील आपल्या मुलांवर असे संस्कार करत असतील किंवा प्रोत्साहित करत असतील .... त्या आईवडीलांनी समोर येऊन म्हणायला हवं .... आमची मुलं चुकीची वागली, असे कृत्य कुठल्याही मुलाने करु नये...

तसेच त्या आरोपींच्या आईवडीलांनाही विचारायला हवं....>>>

सहमत.... त्यांनाही प्रसिद्ध करायला हवे, त्यांना काय वाटते कळायला हवे. हैद्राबादच्या घटनेत गुन्हेगारांच्या पालकांनी स्वतःच्या मुलांचा धिक्कार केला होता.

असे गुन्हे कमी / नाहीसे व्हायला हवेत असे सगळ्यांना ढीग वाटत असले तरी प्रत्यक्षात गुन्हे वाढताहेत. गुन्हे करणाऱ्यांवर व कुटुंबियांवर सोशल बहिष्कार हा एक उपाय लोकांनी वापरावा. यामध्ये कुटुंबावर अन्याय होणार हे मान्य आहे पण आपल्यामुळे/नंतर आपल्या जवळच्याना त्रास भोगावा लागणार ही भावना गुन्हे करण्यापासून काही जणांनातरी परावृत्त करेल.