२०१५ या वर्षात मायबोलीवर प्रसिद्ध झालेली कोणती कथा / कादंबरी आवडली?

Submitted by हर्पेन on 19 December, 2015 - 02:16

२०१५ सरत आले.

या वर्षभरात मायबोलीवर प्रसिद्ध झालेल्या कथा कादंबरीं मधून आपल्याला आवडलेली रचना, नाव व दुव्यासकट इथे एका प्रतिसादात एक अशी लिहा.

अन्यत्र पुर्व प्रकाशित रचना इथे पुनर्प्रकाशित होतात त्या विचारार्थ घ्याव्या की नाही हे देखिल सुचवा.

इथे सर्वांनीच आपापले आवडते धागे प्रतिसादात मांडावेत अशी कल्पना आहे.

ही स्पर्धा नाही. जितके जास्त + (+ आकडे म्हणजेच अनुमोदन) तितक्या लोकांना तो धागा आवडला असे होईल (च) पण वाचकाने केलेली शिफारस असे(च) ह्याकडे बघावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोशल नेटवर्किंग भाग १ ते ८ - लाडू

भाग १: http://www.maayboli.com/node/56176
भाग २: http://www.maayboli.com/node/56188
भाग ३: http://www.maayboli.com/node/56200
भाग ४: http://www.maayboli.com/node/56221
भाग ५: http://www.maayboli.com/node/56234
भाग ६: http://www.maayboli.com/node/56249
भाग ७: http://www.maayboli.com/node/56264
भाग ८ http://www.maayboli.com/node/56285

ट्रॅप - स्पार्टाकस (?)

लि़ंक उपलब्ध नाही. लिखाणाबद्दल बरेच आक्षेप असले तरी कथा खिळवून टाकणारी होती हे नक्की.

वत्सला ला अनुमोदन. कठीण विषय असूनही, माहितीचा ओव्हरडोस न देता अगदी रंजक पद्धतीने कथा लिहिल्यात त्यांनी.

ट्रॅप - स्पार्टाकस (?)

लि़ंक उपलब्ध नाही. लिखाणाबद्दल बरेच आक्षेप असले तरी कथा खिळवून टाकणारी होती हे नक्की. >>>>>>>>>> + १०००००००००० .

सगळ्याच गोष्टी आत्ता आठवत नाहीयेत पण सोन्याबापू, जव्हेरगंज यांच्या गोष्टी. डॉ. शिंदे यांच्या वैद्यकीय कथाही पुन्हा पुन्हा वाचण्यासारख्या. ट्रॅपने खिळवून ठेवलं होतं हे खरं आहे पण त्यामागचं सत्य बाहेर आल्याबरोबर ट्रॅप आणि त्याचे लेखक मनातून कायमचे उतरले.