" शापित गड "

Submitted by श्रीमत् on 17 May, 2014 - 09:16

आज शुक्रवार असल्यामुळे कामं तशी कमीच होती. त्यात दुपारचा लंच आज जरा जास्तच हेवी झाल्यामुळे डोळ्यांवर पेंग येत होती. बॉसने आज ऑफ घेतल्यामुळे मीही रीलॅक्स होतो. आजुबाजुला पाहील तर सार ऑफिस आज रिकामी वाटत होतं. मार्केटिंगवाले केव्हाच पसार झाले होते. बाजुला परेराकडे पाहीले तर तोही फेसबुकवर ईमानेइतबारे लागला होता. मी सहजच त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो कोणत्यातरी ट्रेकचे फोटो शेअर करताना दिसला. मी न रहावुन विचारलेच,"अरे परेरा किधर गया था? वो भी ट्रेक के लिये साले ऑफिस की चार मंजीले चढते चढते तेरी फट जाती है. और ये पहाड तु खुद चढ गया? और बिच मे ही ये ट्रेक बिक का भुत कहा से सवार हो गया तेरे सिर पर. साले लास्ट टाईम जब हमारे ऑफिस की पिकनिक माथेरान जा रही थी तब तुनेही कहा था " क्या लोग पागल जैसे जंगलो मे भटकने जाते है. कुछ रिसॉर्ट विसॉर्ट की पिकनिक अरेंन्ज करो थोडी दारु शारु हो जाय तो पिकनिक का मजा है. ये क्या पहाड बिहाड चढना.

यावर परेराने लगेचच प्रतीक्रिया दिली, " अरे यार जाना तो मै भी नही चाहता था पर क्या करु गर्लफ्रेन्ड के ऑफिस का ग्रुप था. उपर से हमारी मॅडम ठान के बैठी तुम्हे आना ही पडेगा. मैने हर तरह से ना जाने के बहाने बनाये. लेकिन अंत मे मुझे जाना ही पडा. हा थोडी तकलीफ हुई चढते उतरते वक्त, पर एक अनोखा कॉन्फिडंस मिला, इन शॉर्ट आय रीअली इंन्जॉयड इट. वो एक दुसरे के साथ डिसीप्लीन मे चलना, कोई पिछे रह गया तो उसके लिये वेट करना, कठनाई वालो रास्तोपे एकदुसरे की मदद करना. और ये सब कश्मकश मे जब तुम चोटी पर पहुंच जाते हो तब एक अनोखा एहसास होने लगता है. कुछ ऐसा सुख मिलता है जो हम शब्दो मै बयान नही कर सकते.
मला काही क्षण आस्था चैनल समोर बसलो आहोत असं वाटु लागलं आणि समोरील व्यक्ती परेरा नसुन परम पुज्य परेराबापु बसले आहेत अस वाटु लागले.

परेरा पुढे बोलु लागला. "i suggest, you should also plan for a trek, "i assure, it will give you a nice experiance & help you out, to come up with new traits & capabilities that hidden inside you.
मी सहज मस्करीतच परेराला बोलला. तेरी गर्लफ्रेंन्ड सॉलीड है यार! अच्छा हुआ उसने माऊंट एव्हरेस्ट का प्लान नही किया नही तो मजाक मजाक मे वो भी तु चढ जाता वो भी विदाउट ऑक्सीजन. आणि मीच स्वतः फिदीफिदी हसायला लागलो. यावर परेरा फक्त दोनच शब्द बोलला. पी.जे.

साडे पाच वाजले तसे घाई घाईतच शट डाऊन केलं, बॅग उचलली आणि कलटी मारली. ऑटोने स्टेशन ला जाताना डोक्यात परेराचेच शब्द घोळत होते. मग विचार केला दोन दिवस सुट्टी आहे याव जाऊन कुठेतरी. नाहीतर पेपरमध्ये ट्रेकर्सच्या जाहीराती येत असतातच. जाउया एखाद्या ग्रुप बरोबर. त्यात एखादी मुलगी वैगरे असली तर तेवढाच टाईम पास. पुढे काही जमले तर दुग्धशर्करा योग. विचार करत करतच घरी पोहचलो. आई जेवणात गुंतली होती. तर अन्ना राज्याचा हाल हवाला घेण्यासाठी फेरफटका मारण्यास गेले होते. तसा रिटायरमेंटनंतरचा हा त्यांचा आवडता छंद होता. आईला चहा टाकण्यास सांगुन मी माझ्या रुम मध्ये गेलो आणि माझी जुनी डायरी शोधु लागलो. पण काही केल्या ती मिळेना. इतक्यात आई चहा घेऊन आत आली तेव्हा तिनेच विचारलं, "काय रे काय शोधतोयस? आल्या आल्या? "जरा फ्रेश वैगरे व्हायच तर बसला पसारा काढायला. आधी चहा घे तो म्हणत ती निघुन गेली. माझ काही तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. इतक्यात सोफ्याखालच्या जागेत मला ती अंग चोरुन बसलेली दिसली. मला जोरात "युरेका..."युरेका ओरडावेसे वाटले. पण मी भावनांना आवर घातला. हळुच तिला बाहेर काढले. जराशी धुळ बसली होती ती हातानेच झटकली. आणि पटापटा पाने चाळु लागलो. शेवटी एकदाचा नंबर भेटला. मला मगाशीच ट्रेन मध्ये आठवल होतं की गेल्यावर्षी मी पेपर मधुन एका ट्रेकर्स ग्रुपचा नंबर घेतला होता. पण त्याच्या दुसरयाच दिवशी माझी बाईक स्किड झाल्यामुळे मी ट्रेक ला जाऊ शकलो नव्हतो. त्यात मी एकुलता एक असल्यामुळे आईने धसकाच घेतला होता. त्यांमुळे खबरदारी म्हणुन मी यावेळी तिला काहीच सांगायच नाही असं ठरवले.
चहा पिताच मी डायरीच पान उघडलं आणि पटकन तो नंबर डायल केला परंतु ना रिंग वाजेना ना कसला आवाज. सुरवातीस वाटले बंद झाला असावा बहुतेक पण एक शेवटचा ट्राय करुया म्हणुन पुन्हा डायल केला यावेळेला मात्र समोरुन आवाज आला. ह्या नंबरवरील सेवा अस्थायी वेळेकरीता स्थगित करण्यात आलेली आहे. आता मात्र माझा मुड ऑफ झाला

मी मोबाईल तसाच बेडवर फेकला आणि फ्रेश व्हायला निघुन गेलो. फ्रेश होता होताच डोक्यात पटकन काहीतरी क्लिक झालं आणि आपल्याला हे पहिलं का नाही सुचल म्हणुन स्वतालाच दोष दिला. मी ओल्या अंगानेच बाहेर आलो. आणि तडक बेडरुम मध्ये घुसलो. पटापट आवरा आवर केली आणि लॅपटॉप ऑन केला, डोंगल कनेक्ट केला आणि गुगल वर एक दिवसात करता येईल अशा ट्रेकची माहीती शोधु लागलो, गुगल नेही इमानेइतबारे बर्यापैकी नावे सुचवली पण त्या सर्वात एक नावं माझ्या डोळ्यासमोर ऊठुन दिसत होतं, "शापित गड" मी स्वताशीच तात्या विंचु सारख तोंड करुन ते नाव पुन्हा उच्चारल "शापित गड" आयला शापित गंधर्व ऐकला होता पण हे गड प्रकरण जरा ईंट्रेस्टींग वाटतय म्हणुन मी त्या लिंकवर क्लिक केलं नेट थोडा स्लो असल्यामुळे बहुतेक साईट ओपण व्हायला वेळ लागत होता. इतक्यात आईने जोरात आवाज दिला," अरे भास्करा केस तरी कोरडे कर आधी, पाणी डोक्यात मुरल तर सर्दी व्हायची लगेच. मी न रहावुन सार्‍या रुमभर नजर फिरवली मनात आलं हीने बिग बॉस सारखे कॅमेरे तर नाही ना बसवलेत माझ्या रुम मध्ये? मला ति काढा घेऊन यायच्या आत टॉवेल घेणं जास्त पर्याप्त वाटलं. मी केस कोरडे करे पर्यंत शापित गडाचा विकीपिडीया समोर खुणावत होतां. वरतीच गडाचा ईतिहास दिला होता तो पुढील प्रमाणे.

हा गड इसवी सन पुर्व १२०० पुर्वीचा असुन याचे काम राजा भ्रमर वर्मा याच्या कारकिर्दीत पुर्ण झाले. तो वेताळाचा मोठा ऊपासक होता. त्याच्या दरबारी नाना प्रकारचे अवलिये होते. त्याने उभ्या आयुष्यात एकही लढाई हरली नाही त्याचं कारण नही तसच रंजक आहे वेताळाला प्रसन्न करुन त्याने पिशाच्यांना आपल्या वश मध्ये केलं होतं आणि ही पिशाच्च राजा साठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतं याचच कारण म्हणजे राजा अजात शत्रु झाला होतां त्याला कोणाचच भय उरल नव्हत. आणि ज्यांनी त्याच्या सिंहासनाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वंशासहीत राजाने त्यांना संपवुन टाकलं.राजा पिशाच्चांना प्रसन्न करण्यासाठी दर पित्री आमावस्येला जंगालात निघुन जाई आणि पुर्ण नग्न होऊन वेताळाची उपासना करुन होमकुंडात स्वताला झोकुन देई. त्यामुळे वेताळ त्याला प्रसन्न होऊन सामर्थ्य पुरवत असे. पण सत्तेच्या हव्यासापायी त्याच्या आठव्या राणीने, (राजाच्या जनान खान्यात तीस राण्या होत्या) एका अमावस्येला त्याच्या पुजेत विघ्न आले परिणामी राजा होम कुंडात होरपळुन मेला, पण मरता मरता त्याने आक्रोशाने शाप दिला की ज्या साम्राज्यासाठी तुम्ही हे सर्व केलंत ते तुम्हाला कधीच उपभोगु देणार नाही..............! काळाच्या ओघात सर्व गेलं पण राजा भ्रम्रर वर्मा आजही त्या गडावर वास्तव्य करुन आहे पिशाच्च बनुन.मला थोड्यावेळासाठी मी चांदोबा वाचतोय असं वाटुन गेलं.

गडाच्या पायथ्याशीच एक हरवलं गाव आहे. आयला गावाच नाव पण काय तर हरवलं गावं म्हणजे सापडायची पंचाईत मी स्वताःशीच हसत बोललो. गडावर जायला दोन वाटा आहेत. एक गावातुन जाते तर दुसरी गावाला वळसा मारुन मागच्या जंगलातुन जाते. ते कुप्रसिध्द मंदीरही त्याच वाटेवर आहे.गडावर सध्या बघण्यासाठी राजाच्या वाड्याचे अवषेश पाच पाण्याची तळी आणी उध्वस्त झालेले बुरुज आहेत. आणि एक गुप्त दरवाजा जो राज्याच्या वाड्यातुन सरळ त्या वेताळाच्या मंदीरापाशी निघतो. मला एकंदर हे सगळ प्रकरण गंमतशीर वाटायला लागलं. मी तिथे जाण्यासाठी लागणारी आवश्यक ती माहीती लिहुन घेतली. हरवलं गावाला जाण्यासाठी सरळ कोणतीही बस सेवा नाहीये. तुम्हाला खापरवाडीला जाणारी गाडी पकडावी लागेल. जी तुम्हाला हरवलं फाट्यावर सोडेल तिथुन तुम्ही गावात पाच कि.मी. आत पायी जाऊ शकता अथवा गावातल एखाद स्थानिक वाहन मिळु शकेल. आनि खापरवाडीला सकाळी आणि संध्याकाळी दोनच एसटी जातात व तिथेच अर्धा तास थांबुन परत फिरतात. त्यामुळे संध्याकाळची एस.टी जर चुकली तर दुसर्‍या दिवशी सकाळीच यावं लागेल. गडाच्या पसार्‍याचा मला स्वतालाच समजेल असा मॅप काढला आणि शट डाउन केलं. एव्हाना घडाळ्यात १० वाजले होते. टि.व्ही. वरच्या "आजचा सवालाच्या आवाजामुळे" अण्णा घरी आल्याची वर्दी मिळाली होती. एवढ्यात मातोश्रींनी जेवणाची पानं हॉलमध्ये मांडली. जेवताना सुध्द्दा वर्माचा भुंगा काय डोक्यातुन जात नव्हता. तसा आजच्या विज्ञाननिष्ठ युगात असल्या अमानवीय गोष्टींवर विश्वास ठेवायचा म्हणजे जरा अतीच, परंतु विश्वास पानीपतात मेल्यामुळे नवीन विश्वास ठेवण्यास हरकत नाही, मी मनाशीच आयला आजकाल मी जास्तच पीजे मारायला शिकलोय, साला परेरा बरोबर बोलला दुपारी म्हणत ताटावरुन उठलो. जेवताना आई मात्र संशयित नजरेणे माझ्याकडे पाहात होती. तिला एव्हाना कल्पणा आली होती की बेणं नक्कीच काहीतरी उपदव्याप करायला निघाल असणार तर अण्णा मात्र पुढचा सवाल त्यांनाच विचारणार आहेत या पावित्र्यात बसले होते. मी पटकण ताट उचललं आणि बेसिनकडे धावलो. हात धुतला आणि आईच्या प्रश्नांची उत्तरे टाळण्यासाठी तोंडात मुठभर "बडी" सौफ कोंबली आणि तसाच बेडरुमकडे वळलो.आत गेल्या गेल्या पहिला मामे भाऊ कम मित्र ज्यादा सात्विक उर्फ पंडीतला फोन लावला. सात्विकला पंडीत हे नाव देण्यामागे काही विषेश कारण नाही. लहाणपणी त्याने शाळेतल्या नाटकात भटाचा रोल केला होता. तेव्हा पासुन आम्ही त्याला पंडीत याच नावाने संबोधतो.

"हॅलो...., "हॅलो........., पंडीत.. हा भास्क्या बोल," बोल काय ऐक आता! "तु तुझी कपड्यांची बॅग भरुन तयार रहा. उद्या पहाटे आपण निघतोय! "अरे पण कुठे? इति पंडित. ते तुला काय करायचयं? दादा बोलला ना मग नो प्रश्न नो उत्तर ओके. जशी आपली आज्ञा पण घरी काय सांगु? अरे सांग ना भास्कर बरोबर त्याच्या मित्राच्या गावी चाललोय आणि मी घरी सांगतो मी सात्विक बरोबर चाललोय म्हणुन मी म्हणालो. अरे पण खोट का सांगतोय आपण? पंडीत कळकळीने बोलला. अरे आता खरंखरं सागितल तर आईच्या सतराशे साठ प्रश्नांना उत्तर द्यावी लागतील. तिला वाटतं कि तिचा लेक अजुनही शाळेत जाणारा छबडुच आहे. अजुनही मी ऑफिसला जायला निघालो की, बबडी पास घेतलास? बबडी बाईकची चावी घेतलीस? बबडी बॅगेत एक्ट्रा बिस्कीटं ठेवलीयेत वेळ काढुन खा जरा तब्येत बघ कशी रोडावत चाल्ली आहे ते. हे रोज- रोज ऐकुन शेजारच्या जाधव काकुंच्या पोरी हल्ली माझ्याकडे बघुन फिसफिस करतात नुसत्या असो.... तु तयार रहा, सकाळी ठिक पाच वाजता एस.टी. डेपोत भेट आणि प्लीज लेट करु नकोस. त्याने ओके बॉस म्हणुन फोन ठेवला. स्वारी उंडगायचं म्ह्टल की एकदम खुश. तसे आम्ही लहान पणापासुन एकत्र भरपुर फिरलेलो अगदी शाळेच्या सहली पासुन ते गावच्या यात्रे पर्यंत, भांडलो ही तितकेच पण त्या भांडणातही प्रेम होतं. मी हळुच बेडरुमच्या दरवाजा पर्यंत गेलो. आई किचन मधला पसारा काढत होती तर अण्णा सेट मॅक्स वर "आखरी बदला" बगत बसले होते. मी मुद्दाम एकदिवशी अण्णांना विचारलं होतं अण्णा हा पिच्चर याच चॅनेल वर हफ्त्यातुन एकदा तरी लागतोच आणि तुह्मी ही तो न चुकता बगता. नक्की चॅनेल प्रेक्षकांवर बदला घेतय की एक प्रेक्षक म्हणुन तुम्ही आमच्यावर बदला घेताय. मला अण्णांना " अखेर चॅनेल बदला " असं ओरडुन सांगावस वाटत होतं पणं अर्थात मी ते टाळलं. मी हळुच आईजवळ गेलो आणि तिला सांगितल की मी सात्विक बरोबर त्याच्या मित्राच्या गावी चाललोय इथेच जवळ आहे चार पाच तासाच्या अंतरावर रात्री किंवा परवा सकाळी येइन. हातातलं ग्लास तिने समोरच्या शेल्फ वर ठेवत आधी माझ्याकडे थंड नजरेने पाहिलं आणि नंतर म्हणाली, "अरे पण दोन दिवस सुट्टी आहे तर आराम करायचा कशाला उगाच ऊना तान्हात भटकता. त्यात बाईक नेत असशील तर जायाचं नाही. गेले सहा महीने झाले चांगला फोटो काढं म्हणुन मागे लागली आहे, लग्नासाठी स्थळ येताएत, परवाच साठे काकु त्यांच्या गौरी साठी विचारत होत्या? पण ऐकशील तर तु भास्कर कसला? हा एक गुण मात्र तु आपल्या बापाकडुन आयता उचलायस आई अण्णांना ऐकु जाईल अश्या आवाजात बोलली. आई हे बघ मी उद्या चाललोय तेही ए.सटीने, पण परवा आलो की मी नक्की तुला आवडेल त्या पोझ मध्ये फोटो काढेनं प्रॉमीस. सोशल साईटस आणि स्मार्ट फोनच्या जमान्यात या माऊलीची मी फोटो काढुन घेण्यासाठी चाललेली तगमग पाहुन तिच्या भाबड्या प्रेमाचे कौतुक वाटलं. मी तडक तिथुन माझ्या रुममध्ये आलो. हळुच दरवाजा लावला आणि बॅग आवरायला घेतली. मॅन वर्सेस वाईल्ड मधल्या बिअर ग्रिल चा माझ्यावर विषेश प्रभाव असल्यामुळे मी त्याचासारखेच कपडे, शुज, टॉर्च आणि चाकु ऑनलाईन खरेदी केला होता. कपडे घालण्यासाठी हुकस्टॅंड ला अडकवले तर पाण्याची बाटली व ईतर साहीत्य बॅग मध्ये भरलं. आता झोप काही येत नव्हती म्हणुन मी तसाच गादीवर आडवा झालो. इतक्यात पंडीतचा व्हॉट्स ऍप वर मेसेज आला. गुड नाईट स्लीप टाईट, डेपोत भेटु ऑल राईट. मी उग्र स्माईली बरोबर एक ठोसा पाठवुन त्याला झोपवला. आणि भ्रमर वर्मा चा विचार करत स्वताही झोपी गेलो..........

सकाळ असल्यामुळे स्टॅंडवर जरा कमीच गर्दी होती. डेपोत मिळुन चार पाच गाड्या उभ्या होत्या त्यातल्या तीन साध्या लाल डब्बा तर एक एशियाड बस होती. डेपोच्या डाव्या बाजुलाच फलाट नं एक व दोन ला लागुनच एक भली मोठी मुतारी आहे तर फलाट क्र. तेरा ला लागुन असलेल्या टी स्टॉल वरुन छान ऊकळत्या चहाचा सुगंध येत होता. काही लोक वाफाळत्या चहाचा कप हातात घेऊन "चाय पे चर्चा" झाडत होते तर खाकी वर्दीतल्या चालक आणि वाहकांची नियंत्रन कक्षात लगबग चालु होती. बाजुच्याच बाकड्यावर एक भिकारी हात पाय टाकुन अस्ताव्यस्त पसरला होता. तर त्याच्याच बाजुला एक अर्धा सफेद अर्धा राखाडी रंगाचा कुत्रा जीभ बाहेर व पुढचे पाय ताठ ठेऊन मागच्या पायावर शेपटी हालवत बसला होता. स्टॅंडच्या मधोमध एक पेपरवाला पेपरचे गठ्ठे सोडवुन व्यवस्थित लावत होता. इतक्यात गाडी नंबर एम एच ०४- ८०८५ मुंबई सेंन्ट्रल ते सातारा व्हाया मेगा हायवे फलाट क्र. ३ वरुन निघत आहे अशी घोषना झाली. तशी त्या गाडीच्या कंडक्टर ने जोरात शिटी मारली. गाडी सुटेल या भितीने एक दोघे प्रवासी बाजुच्याच शौचालयातुन चैन लावत पळतच बाहेर आले व त्यांनी चालकाला हात दाखवत गाडीत उड्या टाकल्या तसा कंडक्टर ने गाडीचा दरवाजा धाडकनं आदळून घेतला. गाडी धुरळा उडवत समोरच्या गेटमधुन डेपोच्या बाहेर पडली. पंडीत अजुनही आला नव्हता. साल्याचा फोन सुद्धा लागेना. इतक्यात मागुन भास्क्या ए भास्कर...असा आवाज देत तोच माझ्या जवळ आला. कुठे होतास रे इतका वेळ मी विचारलं. यावर तो म्हणाला मी वेळेवरच आलोय फक्त मागच्या गेटवर ऊभा होतो...............

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा मस्तं लिहिलीय.
फक्तं शीर्षकात ती अवांतर टींबे आल्याने उगाच नवशिक्याने कथा लिहीली आहे असे वाटतेय.
जमल्यास शीर्षक बदला.

अंजली_१२, विनिता, तेजस्विनी, व्रुषाली, निल्सन आणि साती तुमच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
@साती लेखणात तसा मी अजुन नवशिखाच आहे. Happy

मी न रहावुन सार्‍या रुमभर नजर फिरवली मनात आलं हीने बिग बॉस सारखे कॅमेरे तर नाही ना बसवलेत माझ्या रुम मध्ये? >>> Biggrin
लैच ब्वा लाडोबा तुम्ही. आम्हाला नाही असा चहा हातात मिळत . संध्याकाळचा तर नाहीच
राजा विक्रमादित्याने पण अशीच हरसिद्धी मातेची उपासना करून वेताळाला वश करण्याची विद्या साध्य केली होती ना . असो. अवांतर नको . पुढचा भाग पटकन टाका . उत्सुकता लागलीय .

Rani, mohini, nilesh tumchya pratisadabaddal dhanyawad. Pudhacha bhag udya taktoy.
Happy