मालवणाक जावचो बेत असा - माहिती हवी

Submitted by सौमित्र साळुंके on 18 December, 2015 - 05:21

माबोकर मंडळी,
२५ जानेवारीला कुडाळ किंवा कणकवलीला पोहोचायचे नक्की झाले आहे. सोबत पत्नी आणि मुलगा (वय वर्षे २) आहे. ट्रेकिंग आणि कामाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर कोकण, नाशिक परिसर फिरलो आहे. मात्र दक्षिण कोकणात आणि तेही कुटुंबासोबत जाण्याची हि पहिली वेळ आहे.
हातात ३० तारखेपर्यंत वेळ आहे. किमान ३ दिवस मालवण व दोन दिवस रत्नागिरी परिसर पाहण्याची इच्छा आहे. (यात बदल सुचवू शकत असाल तर अगदी हक्काने सांगावे) स्वतःचे वाहन रत्नागिरीत मिळेल.
सर्वात महत्वाचे म्हणजे मिपावर मानस यांच्या धाग्यावर गवि यांचा अप्रतिम प्रतिसाद पाहिला आहे. त्यामुळे कोणती स्थळे आणि परिसर पहायचा आहे याचा अभ्यास झाला आहे. त्यांना व्यनीकरून काही महत्वाच्या नोंदीसुद्धा घेतल्या आहेत.
मात्र आपणाकडे राहण्याची उत्तम व्यवस्था असलेली (स्वतः अनुभवलेले) हॉटेल्स, गाडीवाले यांचे संपर्क, खाण्यासाठीची व फिरण्यासाठीची ठिकाणे तसेच काही सूचना असल्यास कृपया माहिती द्यावी (इथे अथवा व्यनीद्वारे).

धन्यवाद,
सौमित्र

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.maayboli.com/node/16690?page=24

http://emagazine.sakalsaptahik.com/SakalSaptahik/20Sep2015/Enlarge/page4...

http://www.sindhudurgparyatan.com/sindhudurgmap.html

सौमित्र ह्या वरल्या लिन्क बघा.

आणी हा बाफ पण वाचा, भरपूर माहिती मिळेल.

http://www.maayboli.com/node/54459

रत्नागिरीमधील गणपतीपूळेच्या भक्त निवासमध्ये नक्की राहा. खूप छान आहे.
भक्त निवासचा नंबर - ०२३५७-२३५७५४/७५५ अगोदर तिथे बुकिंग होत नाही पण कंन्फर्म करू शकता रूम्स अ‍ॅव्हलेबल आहेत की नाही.