व्हॅक्क्युम क्लिनर कोणता घ्यावा?

Submitted by प्राचीस on 15 December, 2015 - 09:43

व्हॅक्क्युम क्लिनर घ्यायचा आहे. हँडी हवा आहे, जड, हलवा-हलव करायला सोपा असेल असा. आई कडे जुन्या प्रकारचा Eureka Forbes चा होता. वर्षातुन २ वेळा वापरला जायचा. इतर वेळ माळ्यावर. असा बिलकुल नको.
मला अडचणीच्या ठिकाणी सहज जाणारा आणि महिन्यातुन १-२ वापरता येणारा हवा आहे. खरं तर sliding च्या खिडक्यांसाठी आणि खिडक्यांच्या जाळीवर साचणार्या धुळीसाठी हवा आहे.

हा आवडला आहे. पण इथे विचारल्याशिवाय घेउ वाटत नाही आहे.
http://www.amazon.in/Eureka-Forbes-Easy-Clean-Plus/dp/B00F3ABT48/ref=sr_...

इतर चांगले पर्याय ही सुचवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घ्या बिनधास्त. दोन्ही कामं मस्त करेल. माझा युरोक्लीन बुलेट आहे. त्यात आणिक्षयात मेन युनीटचा आकार, रंग सोडला तर बाकी सेम.

Search for Zibo duster on amazon? It is more handy for Dusting. Vaccume cleaner is another necessary important purchase ☺ I have both ☺

Eureka Forbes चांगली कंपनी वाटते.. आमच्या घरी Eureka Forbes Euroclean Wet and Dry Vacuum Cleaner (http://www.amazon.in/Eureka-Forbes-Euroclean-Vacuum-Cleaner/dp/B00GNZH6E...) आहे. २ वर्षांपासून अगदी दररोज वापरला जातोय पण काहीच प्रोब्लेम नाही आलेला ...

धन्यवाद!
Zibo duster बद्दल पाहिलं, interesting आहे.
आता व्हॅक्क्युम क्लिनर घ्यायला काही हरकत नाही.
नवराही आजकाल म्हणतो, मायबोलीवर बघ ना लोक काय म्हणतात ते.