व्हॉट्सपवरील अंधश्रद्धाप्रसार आणि या अंधश्रद्धा फॉरवर्ड करणारे म्हणजे पसरवणारे

Submitted by Rajesh Kulkarni on 15 December, 2015 - 09:05

व्हॉट्सपवरील अंधश्रद्धाप्रसार आणि या अंधश्रद्धा फॉरवर्ड करणारे म्हणजे पसरवणारे
.

व्हॉट्सअपवरील अनेक मेसेज किती मूर्खपणाचे असतात व काही लोक कसे निर्बुद्धपणे हे फॉरवर्ड करत असतात हे आपण नेहमीच पाहतो. कोणी घाबरून फॉरवर्ड करतात, कोणी केले तर काय हरकत आहे म्हणून. कोणी हे हिंदू धर्माशी संबंधित आहे, तर मग फॉरवर्ड करायला काय हरकत आहे से समजतात. पण हा असा तद्दन मूर्खपणा फॉरवर्ड करण्याच्या आपल्या बेजबाबदारपणामुळे आपण दुस-यांचे नुकसान करत असतो हेदेखील आपल्या लक्षात येत नाही.

सतत चुंबकीय, उर्जा, शास्त्रीय कारण आणि वैज्ञानिक आधार असे शब्द वापरून लोकांना मूर्ख बनवले जाते. मंदिरात दर्शनाला का जावे? या मागचा मूर्खपणाचा पसारा वाचून झाल्यावर एकजात सगळे पुजारी तपासून पहावेत. ही उर्जा दिसते तरी कशी? पुजा-याच्या चेह-यावर तेज दिसावे? की त्याच्या बुद्धीत काही जबरदस्त फरक पडलेला दिसावा? की त्याला स्पर्श केला तर आपल्याचा शॉक बसावा? त्या उर्जेमुळे सकारात्मकता वाढते म्हणे. तो पुजारी पैसे टाकले तर नारळ किंवा प्रसाद देतो म्हणू शकतो हीच त्या उर्जेतली सकारात्मकता असावी बहुतेक. तेव्हा असे काही होत नसते. किती बेअकलीपणा करावा याला काहीतरी मर्यादा हवी.

मूर्खपणा २ मध्येही हद्द केलेली आहे. बायकांनी तुळस का तोडू नये? तर तुळस हे सौभाग्याचे प्रतिक आहे म्हणून म्हणे.

देवांच्या मूर्ती किंवा फोटो एकमेकांकडे तोंड करून का नसाव्यात, विष्णूला वाहिलेले फूल आपण आपल्या डोक्यावर का ठेवू नये, असे अनेक धन्य प्रश्न आहेत व त्यांची तेवढीच हसूनहसून पोट दुखेल अशी विनोदी उत्तरे.

अमुक याचे प्रतिक आहे व तमुक त्याचे प्रतिक आहे असे म्हणून अंधश्रद्धा पसरवण्याचे हे धंदे आहेत. या अंधश्रद्धा फेकून द्या व त्या पसरवणा-यांच्या नादाला लागू नका. शक्य झाल्यास तसे करणा-यांना दोन शब्द सुनवा.

++++++++++++++++++++++++++++++
हा मूर्खपणा पसरवणे बंद करा.

मूर्खपणा १:

प्रत्येकाने एकदा वाचा...
मंदिरात का जावे?
देवपूजा का करावी?
या मागचे शास्त्रीय कारण काय?
भारतीय मंदिरे एक उर्जेचा स्त्रोत आहेत कि अंधश्रद्धा याचा शास्त्रीय दृष्टीकोनातून शोधघेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ......
अनादी काळा पासून मनुष्य ईश्वर व ईश्वरी शक्तींच्या शोधात आहे.आता या ईश्वरी शक्ती म्हणजे काय? किंवा त्या आपले अस्तित्व कोठे दाखवतात हे पाहणे खूप महत्वाचे ठरेल.
सर्वात आधी आपण शक्ती म्हणजे काय ते पाहू. शक्ती म्हणजे चुंबकीय क्षेत्र आपल्या दैनंदिन जीवनात आपण शक्ती (power) चुंबकीय क्षेत्र निर्माण करून उत्पन्न करतो उदा: इलेक्ट्रिक मोटर यात आपण विजेच्या सहायाने चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो ,त्यात शक्ती निर्माण होते व मोटर कार्य करू लागते. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांना मानवी शक्तींचा शोध लागला तो या चुंबकीय शक्ती मधूनच. त्यांनी ओळखले कि मानवाने जर स्वत:मध्ये चुंबकीय (क्षेत्र) शक्ती निर्माण केल्या तर त्यास सर्व प्रकारच्या शक्ती व सामर्थ्य प्राप्त होऊ शकते.त्यालाच आपण ईश्वरी शक्ती म्हणतो. आणि या शक्ती निर्माण करण्यासाठी एक माध्यम हवे होते जसे मोटारीला वीज हे मध्यम आहे. आणि हे माध्यम होते पिर्रॅमीड.
पिर्रॅमीड ज्या विशिष्ट कोनात बांधला जातो त्या प्रकारच्या रचनेत मोठ्या प्रमाणात चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हेआपल्या पूर्वजांनी सखोल संशोधनातून ओळखले होते. म्हणूनच आपल्या संस्कृतीतील सर्व नामांकित मंदिरेहि या पिर्रॅमिडच्या आकाराची बांधली आहेत.मंदिराचा कळस हा एक पिर्रॅमिडचा भाग आहे. म्हणून भारतातील सर्व मंदिरांचा कळस हा मुख्य भाग मानला जातो. तसेच ही सर्वमंदिरे उंच डोंगरावर बांधली गेली आहेत. उदा -तिरुपती बालाजी मंदिर, वैष्णवी माता मंदिर, अमरनाथ मंदिर. पूर्ण भारतात अशाच प्रकारे वेगवेगळ्या आकाराची , उंचीची हजारो मंदिरे विविध प्रांतात डोंगर माथ्यावरच बांधलेली आढळून येतात व हि सर्व मंदिरे वैदिक शास्त्रानुसार बांधली गेली आहेत (किंवा डोंगरावर बांधली नसली तरी पिर्रॅमिडाच्या आकाराची बांधली गेली आहेत) आणि फक्त हिंदू संस्कृतीतच नव्हे तर मुस्लीम, ख्रिश्चन या संस्कृती मध्ये सुद्धा याच तंत्र ज्ञानाचा बेमालूम वापर केला गेला आहे.
ही मंदिरे प्रामुख्याने डोंगर माथ्यावर बांधण्याचे प्रमुख कारण काय तर अशा जागेवर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सर्वाधिक आहे. या मागचे शास्त्रीय कारण काय असू शकते? तुम्ही जर नीट निरीक्षण केलेत तर तुमच्या लगेच लक्षात येईल की डोंगर हा पिर्रॅमीडचाच एक नैसर्गिक उत्तमप्रकार आहे. आणि या डोंगराच्या सर्वोत्तम शिखरावर सर्वात जास्त चुंबकीय क्षेत्र अस्तित्वात असते. मुख्यतः अशा जागेवर मंदिरे बांधल्याने त्या मंदिराच्या गाभार्यात चुंबकीय व विदुयत तरंग हे उत्तर व दक्षिण दिशेच्या मध्यावर एकत्रित होतात. व याच कारणाने मुख्यमूर्ती ही देवळाच्या मध्यभागी स्थापित केली जाते, त्याला "गर्भगृह" किवा "मूलस्थान" असे म्हटले जाते. खरेतर प्रथम मूर्तीची स्थापना करून मग मंदिर उभारले जाते. हा "गाभारा "म्हणजे ज्या ठिकाणी पृथ्वीचे सर्वाधिक चुंबकीय क्षेत्र असलेली जागा.
आपल्याला माहित आहे का, ताम्रपटावर काही वैदिक मंत्र लिहून त्या मुख्यमूर्तीच्या पाया खाली पुरल्या जात असत. ते ताम्रपट म्हणजे नक्की काय असते? तर हे ताम्रपट म्हणजे देव किवा पुजारी यांना श्लोक आठवून देण्यासाठी ठेवलेली पत्र नव्हेत. तर ताम्रपात्र पृथ्वीतील चुंबकीय शक्ती खेचून घेवून त्या सभोवतालच्या वातावरणात पसरवत असतात.
मंदिरात प्रदक्षिणा का घालतात? याचेही उत्तर यातच दडलेले आहे. प्रदक्षिणा म्हणजे काय तर मुळ गाभार्यातील मूर्ती भोवती एक चक्कर मारणे. म्हणजेच चुंबकीय क्षेत्र भोवती चक्कर मारणे होय. जसे इलेक्ट्रिक मोटर मध्ये शाफ्ट व रोटरच्या फिरण्याने त्या मोटर मध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्याच प्रमाणे गाभार्यात मूर्ती भोवती फिरण्याने मानवी शरीरात चुंबकीय शक्तींचा स्त्रोत निर्माण होऊन मानवास चुंबकीय शक्तींची प्राप्ती होते ज्यास आपण ईश्वरी शक्ती मानतो.
म्हणूनच जी व्यक्ती दररोज मंदिरात येते व मुख्य मूर्तीच्या प्रदक्षिणा करतेत्या व्यक्तीचे शरीर वातावरणातील चुंबकीय तरंग शोषून घेते. ही सगळी प्रक्रिया खूप सावकाश होत असते आणि दररोज केलेली प्रदक्षिणा ह्या सर्व सकारात्मक शक्ती शरीराला ग्रहण करण्यास मदत करते. शास्त्रीयदृष्ट्या ह्या सर्व सकारात्मक चुंबकीय शक्ती आपल्या निरोगी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असतात त्या आपणास मंदिरातूनच प्राप्त होतात.
मंदिरात ध्यान केल्याने किंवा नुसते शांत बसल्याने सुद्धा आपणास या सर्व शक्ती खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात. मंदिरात होणारा घंटानाद व मंत्रोचार यातून निघणार्या ध्वनी कंपनामधून मानवाच्या मेंदूतील अन्तरपटलावर या शक्तीचा परिणाम वाढतो व मनावरील ताण तणावकमी होण्यास मदत होते. मंदिरात होणारी पूजा,आरती भक्तांना त्यांचे ताण-तणाव व खाजगी प्रश्नांना (दुःख्) विसरायला मदत करते. फुलाचा सुगंध आणि कापूर व धूप या मुळे मंदिराचे वातावरण प्रसन होते. ह्या सगळ्या गोष्टी मंदिरातील सकारात्मक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
मंदिरातील “तीर्थ“ म्हणजे काय? मंदिरातील गाभार्यात असणार्या देवतेला विशिष्ट मिश्रणाने स्नान घातले जाते. हे मिश्रण म्हणजेच पाणी,दुध, मध,दही, वेलचीपूड, कापूर ,केशर, लवंग तेल, तूप, तुळशी पाने यांचे मिश्रण असते. जेव्हा ह्या मिश्रणाने मूर्तीला अभिषेक केला जातो तेव्हा मूर्ती मधील चुंबकीय शक्ती त्या मिश्रणात मिसळतात व हे मिश्रण चुंबकीय शक्तीने भरून जाते यालाच आपण तीर्थ असे म्हणतो. हे मिश्रण "तीर्थ” प्रत्येक भक्ताला प्रसाद म्हणून वाटले जाते. हे “तीर्थ” चुंबकीय शक्तीचे स्तोत्र असते. ह्या तीर्थात असलेल्या गोष्टी मुळे लवंग तेल दातदुखी कमी करते, केशर व तुळशी पाने सर्दी व खोकला या पासून संरक्षण करते आणि कापूर श्वासदुर्गंधीं नाहीशी करतो.
चुंबकीय शक्तीने भरलेले हे “तीर्थ” रक्तशुद्धी करते. हे प्रयोगावरून सिद्ध झाले आहे. म्हणूनच हे “तीर्थ“ भक्तांना प्रसाद म्हणून दिले जातं.
+++++++++++++++++

मूर्खपणा २:

देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?
उत्तर :-ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.

स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये ?
उत्तर :- ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.

देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ?
उत्तर :- ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी.

शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी
उत्तर :- शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात. त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.

एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?
उत्तर :-प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून

गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?
उत्तर :-हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून ....

शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत ?
उत्तर :- शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून ..
.

निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये ??
उत्तर :- तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर तम तत्व वाढेल . राक्षसी संकटे येतील म्हणून .

देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का
करू नयेत ?
उत्तर:- त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून ...

विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये ?
उत्तर :-फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून ..
शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये ?
उत्तर :-शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून...
सर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते . सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन...
देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो . शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही . ती हिरण्यगर्भा आहे . ती प्रसूति वैराग्य आहे ..

आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये ?
उत्तर:- त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते . ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो .....

देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे
उत्तर :- हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत .
अंगठा -आत्मा/
तर्जनी -पितर/
मध्यमा-स्वतः/अनामिका -देव/करंगळी -ऋषी /
म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे...

समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत.
उत्तर :-विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून......

अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये.
उत्तर :-पितराना दोष लागतो म्हणून .

उंब-यावर बसून का शिंकू नये ?
उंबरा हा मुळात बसण्यासाठी नाही. तेथे सर्वतिर्थे बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते. शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून..... घडल्यास पाणी शिंपडावे......

निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये.
उत्तर :- झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून ..

मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये
उत्तर :- प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून ..

रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुस-यास का देवू नयेत ?
उत्तर :- याच्यात करणीतत्व आहेत. आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून ....

सायंकाळी केर का काढु नये ?
उत्तर :- लक्ष्मीला आवडत नाही. लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते...

रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा.
उत्तर :- शव= शिव म्हणून नमस्कार करावा....

कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे ?
उत्तर :-येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते...

एका हाताने देवाला नमस्कार का करू नये.
उत्तर :- दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो . पंचतत्त्वाचा नाही ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वॉट्सॅपवर फक्त जोक्स वाचते. आणि जे मनापासून आवडतील ते शेअर करते. बाकी ह्या मूर्ख फॉर्वर्ड्सकरता वेळ घालवण्याची इच्छा नसल्याने वाचायची तसदी घेत नाही. लोकांना हे असलं काही शेअर करू नका सांगायची सोयही नसते. त्यामुळे माझ्यापुरता मार्ग मी काढलेला आहे. लाईफैजह्यापी.

१. वेल्कम टू सनातपर्भात.ऑर्ग : ह्या सगळ्या धार्मिकतेचा हा मूलस्रोत आहे.
२. माबोवर व्हॉट्सॅप फॉर्वर्ड्स डकवण्यासाठी धागा काढायची आयडिया छाने Wink
३.
>>>
मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये
उत्तर :- प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून ..
<<<
ओलांडून देणे = त्याला हाती धरून पलीकडे नेणे.(make the cat do it) ते स्वतः उडी मारून जात असेल तर अडकाठी करणे असा अर्थ अभि'प्रेत' असेल, तर ओलांडू देऊ नये (don't let the cat do it) असा शब्दप्रयोग हवा.

काही सोपे वाक्यात प्रयोग :

आंधळ्या व्यक्तीला रस्ता ओलांडून द्यावा.
मूर्खांना ज्ञानसागर ओलांडू देऊ नये. Wink

(..)विच्छेदन क्र. २.
प्रेत प्रेतच राहते. व कायम राहील. आत्मा योनी बदलतो. प्रेत जाळले, पुरले, फेकून दिले इ. जाते.

बाकी मोक्ष म्हणजे काय?

काही लोक कसे निर्बुद्धपणे हे फॉरवर्ड करत असतात >> इतक्यातच पाहीलेय.

मी पंधरा दिवसातून वगैरे एकदा पाहतो व्हॉअ‍ॅ. आधी एकच ग्रुप होता सोसायटीचा. आता शाळेच्या मित्रांनी, कॉलेजच्या मित्रांनी ग्रुपात घेतलंय. कुणीतरी इंडीया नावाच्या ग्रुपात घेतलं होतं. बस इतकेच. सोसायटीतले लोक वाचला का माझा मेसेज म्हणून विचारायचे.. त्यांना नाही म्हटलं की फार आश्चर्य वाटायचं. एकदा सरळच स्वतःचे लिखाण असेल तर(च) पोस्ट करा असा मेसेज टाकल्यापासून कुणी काही विचारत नाही.

<<आंधळ्या व्यक्तीला रस्ता ओलांडून द्यावा.
मूर्खांना ज्ञानसागर ओलांडू देऊ नये. डोळा मारा>>
----- आन्धळ्या व्यक्तीला त्याच्या डोळ्यान्च्या मर्यादा माहिती असतात. दुसर्‍या कुणालाही त्याला सान्गायची आणि तसे पटवुन देण्याची अवशक्ता नसते. तसेच एकमत ज्ञानसागर ओलान्डताना दिसल्यास वादच होणार नाहीत.

उदय,
मूर्ख (व्यक्ती) ज्ञानसागरात बुडी मारण्याऐवजी त्याला ओलांडायचा प्रयत्न करीत असतात, ही करोलरी आहे.

धागा लेखकाशी व प्रतिपाद्य विषयाशी पूर्णतः असहमत.

काही गोष्टी चुकीच्या वा अतिरन्जित असतीलही व्हाट्सॅप वर, पण सरळ हिन्दू धर्मावर व पारम्पारिक समजुती /रूढीवर घसरण्याचे कारण नाही

राकुभाय आपल्यालेखनात अति-उत्साहीपणा आहे , त्यालाच अ‍ॅटिट्युड अथवा गावठी भाषेत "अति-शहाण पणा" असे म्हणतात... त्याचे काय परिणाम होतो ,ह्याचा अनुभव आपण स्वतः दुसर्या एका प्रसिद्ध मराठी संस्थळावर घेतलेला आहेच

असो

सु वे सां न ल

काही गोष्टी चुकीच्या वा अतिरन्जित असतीलही व्हाट्सॅप वर, पण सरळ हिन्दू धर्मावर व पारम्पारिक समजुती /रूढीवर घसरण्याचे कारण नाही
>>

हायला, ही सध्याची तोप फ्याशन आहे, असे मी समजत होतो Wink

पण धागा केवळ व्हॉट्सपवर आलेले मेसेज आहेत हो, तेव्हा, तेवढच महत्व राहू देत.

तशाही हिंदू धर्म आणि पारंपारिक समजुती पाळत कोण आजकाल Proud

हे दोन धागेही वाचून घ्या वेळ होईल तेव्हा कुलकर्णी:

http://www.maayboli.com/node/54821

http://www.maayboli.com/node/52042

तुमचा धागा वाचला. भर लक्ष्मीपूजनाच्या सांयकाळीचे फटाके वाजून संपल्यानंतर तुळशीच्या लग्नाला तुरळक एखादा लवंगी उडतो तसा वाटला.

टीप - वरील लक्ष्मीपूजन, लवंगी वगैरे विधान 'माझाच धागा भारी' वगैरे भ्रमातून आलेले नाही. तुमच्याच आधीच्या धाग्यांवर जे तुंबळ झालेले होते ते ह्या धाग्यावर होणे थोडे असंभव वाटले म्हणून लिहिले.

बाकी काये त्याबद्दल बोलणे नलगे. पण एका गोष्टीबद्दल सान्गावेसे वाटते. सन्ध्याकाळी म्हणजे लक्ष्मी यायच्या वेळी झाडु नये याच एक कारण आहे. फार पूर्वी तेलाचेच दिवे असायचे ( घरातल्या वीजेचा शोध लागला नव्हता) त्या काळात दुपारनन्तर म्हणजे सन्ध्यासमयी घरातली एखादी मौल्यवान वस्तु, दागिना ( चमकी, नथ, कानातले वगैरे) हरवले तर ती लगेच सापडेल याची शाश्वती नसायची. आणी समजा झाडताना ती वस्तु जर चुकुन कचर्‍यात गेली तर मिळणे कठिण. पण समजा सन्ध्याकाळी झाडलेच नाही, आणी दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर झाडताना दिवसाच्या लख्ख उजेडात ती ( वस्तु) सापडेल या आशेने झाडत नव्हते. आता तसे नाहीये. ही पूर्वापार समजूत लोकानी तिचा सम्बन्ध लक्ष्मीशी लावुन तसा सान्गीतला.

मी पामर, अतिअति अत्यल्प ज्ञानाचा कण अर्जित केलेला सामान्य माणूस आद्य मायबोलीचार्य मायबोलीमहंत् मायबोलीकर्मठ्शास्त्री श्री श्री श्री लिंबवेंद्रम्चारी यांना कृपया वरील अंधश्रध्देबाबतच्या अज्ञानाच्या मृतसागरात ज्ञानगंगेचे अमृत मिसळून सागरातील अज्ञानारुपी अंधाराचा अंध:कार दुर सारण्याचे उत्तुंग कार्य सिध्दीस तडीस घेऊन जाण्यास विनंतीपुर्वक मनपुर्वक मनधरनी विचारणा करत आहे.

बेफिकीर,
तुमच्या दोन्ही पोस्ट पाहिल्या.
प्रश्न सुतळी की लवंगीचा नाही, अंधश्रद्धांपासून दूरच राहिले पाहिजे हा आहे. तुम्ही व्हॉट्सअपच्या दोन्ही बाजू चांगल्या सांगितल्या आहेत.

_तात्या_,
ह्या व अशाच गोष्टी म्हणजे हिंदू धर्म आहे हे ठासवले जात आहे. आमची श्रद्धा आहे न, मग तिच्या आड यायचे नाही, प्रश्न विचारायचे नाहीत असे सांगितले जात आहे.

<<अंधश्रद्धांपासून दूरच राहिले पाहिजे हा आहे.>>
----- याबद्दल वादच नाही. या वाक्याला प्रत्येक वाचणारा अनुमोदन देणार आहे. मुख्य प्रश्न अन्धश्रद्धा कशाला म्हणावे येथे येतो....

लिम्बुटिम्बु असतील तेथुन धावत या आणि येथे हजेरी लावा...

>>>> लिम्बुटिम्बु असतील तेथुन धावत या आणि येथे हजेरी लावा... <<<<< आलो... Happy

बरे झाले इतकी सविस्तर माहिती एका जागीच मिळाली... वाचुन थोडी रिव्हिजनही झाली... Proud
नैतर काये ना कि हल्ली वाढत्या वयोमानाप्रमाणे लक्षात नै रहात गोष्टी....
इथे ही माहिती एकत्रितरित्या दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

>>>>>> मुख्य प्रश्न अन्धश्रद्धा कशाला म्हणावे येथे येतो.... <<<<<
उदय, माझ्या विपु/प्रोफाईलच्या वर एक वाक्य डकवुन ठेवलय, ते इथे पुन्हा देतो.
संकटकाळात (वा एरवीही) अधिक संकट येऊ नये म्हणून मी नारळ फोडला काय किंवा देवाला हाकारले काय, तर ज्यांच्या व्याख्येप्रमाणे/विवेचनाप्रमाणे मी अशाप्रकारे देवाला हाकारणे/आळवणे ही अंधश्रद्धाच ठरते त्या अन्निसवाल्यान्नी तत्काळ आपल्या संस्थेचे "अंधश्रद्धा निर्मुलन समिती" हे नाव बदलून "(हिंदूधर्म)श्रद्धा निर्मुलन समिती" असे करवून घ्यावे कारण जे "देवच" मानत नाहीत त्यांचे करता कसल्या श्रद्धा अन कसल्या अंधश्रद्धा? श्रद्धा व अंधश्रद्धा यातिल फरकाची वास्तपुस्तही घेण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही.

अगदी अगदी नैतिक अधिकार आहे की नाही हे ठरवायचा अधिकार फक्त तुम्हालाच दिलेला आहे.
याच प्रमाणे इतर धर्मांविरुध्द ब्रिगेडींविरुध्द लिहिण्याचा सुध्दा आपणास "नैतिक" अधिकार नाही असे म्हणता येईल

>>>>> याच प्रमाणे इतर धर्मांविरुध्द ब्रिगेडींविरुध्द लिहिण्याचा सुध्दा आपणास "नैतिक" अधिकार नाही असे म्हणता येईल <<<<<
माझ्या आजवरच्या मायबोलीवरिल लिखाणात आजवर मी एकही शब्द, कोणत्याही धर्माच्या रुढी/परंपरा/उपासना पद्धती या विरुद्ध लिहीलेला नाहीये. असेल तर दाखवुन द्या. ब्रिगेडींचे तत्वज्ञानाबद्दलही मी कधीच काहीही लिहीले नाहीये.
मात्र ब्रिगेडी व तत्सम " ब्राह्मणांचा (व अंती हिंदुंचा) वंशविच्छेद व्हावा / तसा करण्याची इच्छा लोकांचे मनात उत्पन्न व्हावी "अशा प्रकारचे लिखाण्/प्रचार्/कृती करु लागले तर/तेव्हा मला स्वसंरक्षणात्मकरित्या स्वजातीच्या/स्वधर्माच्या हिताकरता त्या विरुद्ध लिहिण्याचा, बोलण्याचा, व्यक्त होण्याचा, त्याविरुद्ध जागरुकता निर्माण करण्याचा नैतिक व कायदेशीर अधिकार आहे. Happy

>>>>> देवाला हाकारणे/आळवणे ही अंन्निसला अंधश्रद्धा वाटते हीच तुमची अंधश्रद्धा आहे लिंबु. <<<<
अमान्य. देवधर्मबिर्म सब झूठ, देवधर्म मानवाचे निर्मित, देवास रिटायर करा इत्यादी तत्वज्ञाने पाजळल्यावरही अन्निसवाले "मर्यादित कक्षेत धर्म मानतात व देवास आळविने त्यास श्रद्धा वाटते, अंधश्रद्धा नव्हे" असे तुमचे मत असेल, तर बा भ्रमरा, तुमचा तुमच्याच अन्निसी विचारधारेचा अभ्यास कमी पडतोय असे सांगावेसे वाटतय. Happy

स्वसंरक्षणात्मकरित्या त्या विरुद्ध लिहिण्याचा, बोलण्याचा, व्यक्त होण्याचा नैतिक व कायदेशीर अधिकार आहे. >> तसेच इतरांना सुध्दा व्यक्त होण्याचा लिहिण्याचा बोलण्याचा नैतिक कायदेशीर अधिकार आहे लिंबुभाउ. उगाच स्वतःला सोईस्कर वाक्य लिहू नये.

>>>>> तसेच इतरांना सुध्दा व्यक्त होण्याचा लिहिण्याचा बोलण्याचा नैतिक कायदेशीर अधिकार आहे लिंबुभाउ. <<<<
मग? होताहेतच की ते व्यक्त, आजवर म्या पामराने कुठे अडवलय त्यांना? अडवलय का कुठे? Proud

>>>> उगाच न्यायाधिशासारखे स्वतःला सोईस्कर वाक्य लिहू नये. <<<<
बघा, आता तुम्हाला माझ्यात न्यायाधीशाचा भास होऊ लागला म्हणजे अवघड आहे...... होय, तुमचेच अवघड आहे... Wink
असे भास होणे चांगले नै हो... ! Proud

<<ब्रिगेडी म्हणजे काय?>>
----- तुम्ही गेली चार वर्षे लिम्बुटिम्बु यान्च्या सर्व पोस्टी मिसल्या.

सम्भाजी ब्रिगेड... लिम्बुटिम्बु च्या दर दोन पोस्ट मागे एक वेळा ब्रिगेड्चा उल्लेख असतो.

श्रद्धा व अंधश्रद्धा यातिल फरकाची वास्तपुस्तही घेण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. >> हे जे वाक्य आहे तो ही लिहिण्याचा नैतिक अधिकार नाही आहे आपणास Wink

>>>> श्रद्धा व अंधश्रद्धा यातिल फरकाची वास्तपुस्तही घेण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. >> हे जे वाक्य आहे तो ही लिहिण्याचा नैतिक अधिकार नाही आहे आपणास डोळा मारा <<<<
हे तुमचे मत असू शकेल, माझे नाही असे मत.
तुम्ही समाजात काही एक विचारांचा प्रसार करु पहाता, त्यानिमित्ते समाजाला वेठीला धरु पहाता, समाजाची अक्कल जागोजाग काढीत त्यांना त्यांचेसमोरच मूर्ख ठरवू पहाता, असे झाल्यास तुमच्या विचारांचा शब्दातुनचा "प्रतिवाद" करण्याचा नैतिक हक्क आपोआप प्राप्त होतो. अन्निसवाले (व ब्रिगेडीदेखिल) त्यांच्या घरात बसुन हिंदु धर्म/ब्राह्मण कसे नालायक आहेत याचा त्यांच्या अक्कलेनुसार कितीका जप करेनात, मला काय त्याचे?
पण ज्या क्षणी ते सार्वजनिक व्यासपीठावर येऊन "जनहिताच्या नावाखाली" त्याचे जाहिर निवेदन करतात, त्याक्षणीच त्याचा प्रतिवाद होणेही गृहितच अस्ते. अन त्याच प्रतिवाद करण्याच्या कायदेशीर हक्काला तुम्ही "नैतिक अधिकार" नाही असे म्हणताय, आश्चर्य आहे.
कम्युनिझम कम्युनिझम म्हणतात, तो याहुन वेगळा असत नाही.

जे आहेत मुर्ख त्यांना शहाणे म्हणता येणार नाही Wink अर्थात काहींना या बद्दल वाईट वाटू शकते त्यास नाइलाज आहे Rofl
आणि हो जनहिताच्याच नावाखाली कित्येक वाईट रुढी परंपरा बदलायला लावल्या आहे. आणि तुम्ही कितीही आदळआपट केली तरी हे सुरुच राहणार Wink

Pages