Top 100 Indian celebrity - सर्वोच्च १०० भारतीय प्रसिद्ध व्यक्ती

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 December, 2015 - 11:31

फोर्ब्सची या वर्षीची टॉप १०० भारतीय सेलिब्रेटींची यादी जाहीर झाली आहे.
गुणांकन पद्धतीनुसार त्या सेलिब्रेटींचे वर्षातील उत्पन्न आणि प्रसिद्दी बघितली जाते. आता प्रसिद्धीला किती वेटेज आणि पैश्याच्या कमाईला किती हे त्यांनाच ठाऊक.
पण हे निकष लावता बॉलीवूडचा बादशाह सुपर्रस्टार शाहरुख खान याने अपेक्षेप्रमाणे अव्वल स्थान पटकावले आहे.

लोकसत्तातील बातमी - http://www.loksatta.com/manoranjan-news/shah-rukh-khan-tops-2015-forbes-...

फोर्ब्सची संपुर्ण यादी इथे बघू शकता - http://forbesindia.com/lists/2015-celebrity-100/1519/1

टॉप टेन लिस्ट खालीलप्रमाणे (नावापुढे कमाई कोटींमध्ये लिहिली आहे)

१. शाहरुख खान : २५७.५०
२. सलमान खान : २०२.७५
३. अमिताभ बच्चन : ११२
४. महेंद्रसिंह धोनी : ११९.३३
५. आमीर खान : १०४.२५
६. अक्षयकुमार : १२७.८३
७. विराट कोहली : १०४.७८
८. सचिन तेंडुलकर : ४०
९. दीपिका पदुकोण : ५९
१०. हृतिक रोशन : ७४.५०

ईतर उल्लेखनीय नावे क्रमांकानुसार.
११. रणबीर कपूर
१२. रोहीत शर्मा
१३. प्रियांका चोप्रा
१७. करीना कपूर खान
१८. कतरीना कैफ
२२. सोनाक्षी सिन्हा
२३. माधुरी दिक्षित
२७. कपिल शर्मा
२९. यो यो हनीसिंग
३२. सोनू निगम
३८. सानिया मिर्झा
३९. सायना नेहवाल
४५. सनी लिओन
६२. मेरी कोम
६६. चेतन भगत
६९. रजनीकांत
८२. अजय अतुल (२७.५ करोड)

.....................................................................

आता काही मनात आलेले विचार आणि निरीक्षणे.
रोचक आहेत की खोचक आहेत की अगदीच भोचक आहेत हे वाचकांनीच ठरवावे

.....................................................................

१) यू कॅन हेट हिम, यू कॅन लव हिम .. बट यू कॅन्नॉट इग्नोर हिम !! हे शाहरूखने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

२) गेल्यावर्षी सलमान पहिल्या क्रमांकावर होता. यावर्षी घसरण होत दुसर्‍या क्रमांकावर गेला. येत्या वर्षात जर त्याचे काळवीट प्रकरण गाजले किंवा त्याने आणखी एखादे नवीन कांड केले, तर त्याची घसरण होत तो क्रमांक तीन सुद्धा होऊ शकतो. त्याने काळजी घ्यायला हवी.

३) क्रिकेटला राष्ट्रीय खेळ का घोषित करत नाहीत हे अनाकलनीय.

४) चिरतरुण म्हणजे नेमके काय हे अमिताभने मला दाखवून दिले.

५) रणबीर कपूर आणि रणवीर सिंगला काही जण उगवता सुपर्रस्टार समजतात. कदाचित ते असतीलही. पण त्यांच्या दुर्दैवाने आधीचे काही मावळायचे नाव घेत नाहीयेत.

६) रोहीत शर्माने कसोटी क्रिकेटला त्याचे स्थान दाखवून दिले.

७) या पुरुषप्रधान संस्कृतीने नटलेल्या देशात सेलिब्रेटींच्या लिस्टमध्ये आठ पुरुषांनंतर एका स्त्री चा नंबर लागला. ती स्त्री म्हणजे दिपिका पदुकोन.
उगाच नाही मी या धाग्यात खालील विधान केले होते.
"ती अशी आहे जिचा प्रत्येक पुरुषाला हेवा वाटावा,
तो हि ईतका, की जर त्याला पुढचा जन्म स्त्रीचा मिळणार असेल तर त्याने देवाकडे तो दिपीकाचा मागावा."
आज माझ्या या विधानाला एक अर्थ प्राप्त झाला.

८) करीना कपून खान हिने ‘कपूर आणि खान’ या दोन दिग्गज आडनावांच्या ताकदीवर शिक्कामोर्तब केले.

९) अजय अतुल हे नाव बघून चटकन अभिमान वाटला. मी प्रांतवादी तर नाही ना, असा विचार मी सध्या करतोय.
असो, पण त्यांच्या नावापुढे २७.५ करोडचा आकडा बघून थोडा चक्रावलो आहे, भल्याभल्यांपेक्षा मोठा आहे.
उदाहरणार्थ - ब्लॉकबस्टर सिनेमे देणारा, दर सिनेमात लाखोंच्या गाड्या उडवणारा आणि आजकाल सुपर्रस्टार शाहरूखसोबत काम करणारा स्टार दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या कमाईचा आकडा फक्त ४.५ करोड दिसतोय.

१०) कतरीना कैफने सिद्ध केले. सौंदर्य हीच स्त्रीची खरी ताकद आहे.

११) सोनाक्षी सिन्हाने दाखवून दिले. स्त्री सौंदर्याची व्याख्या बदलत आहे.

१२) आपल्या मराठमोळ्या माधुरीला २३ व्या क्रमांकावर बघून अभिमानाच्या आधीही आश्चर्य वाटले. त्यानंतर मग कौतुक वाटले. तिच्या वयात पोहोचल्यावर कतरीना कैफ कदाचित पहिल्या हजारातही नसेल असा विचार मनात डोकावून गेला.
"सौंदर्य हीच स्त्रीची खरी ताकद" या वाक्यातील ‘च’ मागे घेत आहे.

१३) यो यो हनीसिंगला २९ व्या क्रमांकावर आणि सोनू निगमला ३२ व्या क्रमांकावर पाहून वाह म्हणावेसे वाटले.
जर आतिफ अस्लम भारतीय असता, तर तो या लिस्टमध्ये कुठे असता याचा विचार मी सध्या करत आहे.

१४) सानिया मिर्झा आजही भारतीयच आहे आणि भारतीयच समजली जाते हे बघून बरे वाटले.

१५) सानिया आणि सायना या दोन नामसाधर्म्य असणार्‍या खेळाडूंचे क्रमांक या यादीत पाठोपाठच आहेत हा एक योगायोग. मात्र या दोघींनी महिलांच्या खेळाला ग्लॅमर मिळवून दिलेय हे अधोरेखित झाले.

१६) सनी लिओन.. ऊप्फ.. काय बोलावे हिच्याबद्दल.. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत एमआयएम या पक्षाला महाराष्ट्रात तीन जागा मिळाल्यावर जसे चरकलो तसेच सनी लिओनला या यादीत बघून चरकलो.
सध्या ती ४५ व्या क्रमांकावर आहे. इथून पुढे तिचा क्रमांक आणखी आणखी सुधारणार यात मला शंका नाही.
सौंदर्य ही स्त्रीची ताकद आहे की नाही यावर आता मला भाष्य करायचे नाही. पण स्त्रियांचे सौंदर्य ही पुरुषांची कमजोरी आहे याबाबत मी आता ठाम झालो आहे.

१७) प्रियांका चोप्रा आणि मेरी कोम यांचा व्हॉटसपवर फिरणारा एक मेसेज आठवला. मेरी कोमने पुर्ण कारकिर्दीत जेवढे पैसे कमावले नाही तेवढे प्रियांका चोप्राने तिच्यावर एक चित्रपट करून कमावले वगैरे वगैरे.
मेसेजमागील भावना तेव्हाही पटल्या नव्हत्या. पण आज दोघींनाही या लिस्टमध्ये बघून बरे वाटले.

१८) चेतन भगत लेखक म्हणून काय चीज आहे हे त्याचे एकही पुस्तक वाचले नसल्याने सांगू शकत नाही. मात्र त्याने भारतात लेखकांना ग्लॅमर मिळवून दिले हे मान्य करावेच लागेल.

१९) रजनीकांत हे एक आदर्श व्यक्तीमत्व आणि कलाकार आहेत. पण सुपर्रस्टार म्हणून ते प्रादेशिकच आहेत.

२०) कपिल म्हटले की आम्हाला कपिल देवच आठवतो. पुढच्या पिढीला बहुधा कपिल शर्मा आठवेल.

२१) महाराष्ट्रातील सेलिब्रेटींची लिस्ट काढली, मराठी चित्रपट आणि मालिकांतील कलाकारांचा याच निकषांवर क्रम लावला, तर टॉप टेन कसे दिसेल, असा विचार मनात येतोय. यात स्वतंत्र धाग्याचे मटेरीअल तर नाही..

२२) गेल्या चार वर्षांच्या लिस्ट चाळल्या. तीच तीच नावे टॉप टेन मध्ये दिसत आहेत. चारपैकी तीन वेळा नंबर वन शाहरूखच होता. सो, यू कॅन हेट हिम, यू कॅन लव हिम .. बट यू कॅन्नॉट इग्नोर हिम !! हे आता पुर्णपणे सिद्ध झाले आहे.

ता.क. - काही विधाने उपरोधाने नटलेली आहेत. ती स्वताहून ओळखण्यातच खरी गंमत आहे.
कु > ऋ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कापोचे नक्कीच, शेवटी हा आपल्या श्रद्धेचा भाग आहे. जसे कोणी काहीही सांगो पण जोपर्यंत आपल्या नेहमीच्या गुरुजींनी पत्रिका बघितल्याशिवाय आपण त्यातील शनि मंगळ साडेसातीवर विश्वास ठेवत नाही, तसेच हे.
तरी आपण स्वत:तर्फे टॉप टेन लिस्ट द्याल तर ती सुद्धा याच्याशी ताडून बघणे रोचक राहील Happy

शेतकर्‍यांसाठी मनापासून मदत करणारा नाना नसलेल्या आणि काही प्रमाणात का होईना संवेदनशीलता दाखवून शेतकर्‍यांना मदत देणार्‍या अक्शयकुमारचं नाव शाहरुखसारख्या टिनपाटाच्या नंतर पाहून लिस्टची लायकी कळली.

शेवटी हा आपल्या श्रद्धेचा भाग आहे. >> प्रिंट मीडीयामधे संध्यानंद, भोंगा, मुंबई चौफेर, पोलीस टाईम्स, रणशिंग, तुतारी, सिंहगडची राणी, मध्यरात्रीची मुंबई, इब्लीस, हैदोस अशा नियतकालिकांमधून बातमी ची खातरजमा झाल्याशिवाय विश्वासच बसत नाही. वृत्तवाहीन्यांमधे इंडीया टीव्ही, सुदर्शन टीव्ही, न्यूज २४, टीव्ही इंडीया, न्यूज एज्क्सप्रेस इ. अशा काही प्रतिष्ठीत वाहीन्या आहेत.

ऋन्मेऽऽष , यार तुला मानल , काड्या कशा टाकायच्या अन १०० नंबरी धागे कसे काढायचे याचे क्लास सुरू कर .
वर डिसक्लेमर आहेच
काही विधाने उपरोधाने नटलेली आहेत. ती स्वताहून ओळखण्यातच खरी गंमत आहे.
खर तर या यादीत अनपेक्षित फारस काही नाहीये.
बॉलिवूड कलाकरांच मानधन जास्त आहे हे माहित आहेच ना ?
फेम रँक मधे अजूनही अमिताभ पहिला आहे ( मीही शाहरूखचा प्रचंड फॅन आहे , पण तुझ्या अशा उद्योगानी तू त्याच नुकसानच करतोयस Sad )

बाय द वे काही उल्लेखनीय काड्या

यू कॅन हेट हिम, यू कॅन लव हिम .. बट यू कॅन्नॉट इग्नोर हिम !! हे शाहरूखने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

क्रिकेटला राष्ट्रीय खेळ का घोषित करत नाहीत हे अनाकलनीय.

रोहीत शर्माने कसोटी क्रिकेटला त्याचे स्थान दाखवून दिले.

आज माझ्या या विधानाला एक अर्थ प्राप्त झाला.

करीना कपून खान हिने ‘कपूर आणि खान’ या दोन दिग्गज आडनावांच्या ताकदीवर शिक्कामोर्तब केले.

ब्लॉकबस्टर सिनेमे देणारा, दर सिनेमात लाखोंच्या गाड्या उडवणारा आणि आजकाल सुपर्रस्टार शाहरूखसोबत काम करणारा स्टार दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या कमाईचा आकडा फक्त ४.५ करोड दिसतोय.

कतरीना कैफने सिद्ध केले. सौंदर्य हीच स्त्रीची खरी ताकद आहे.

सोनाक्षी सिन्हाने दाखवून दिले. स्त्री सौंदर्याची व्याख्या बदलत आहे.

जर आतिफ अस्लम भारतीय असता, तर तो या लिस्टमध्ये कुठे असता याचा विचार मी सध्या करत आहे.

पण स्त्रियांचे सौंदर्य ही पुरुषांची कमजोरी आहे याबाबत मी आता ठाम झालो आहे.

रजनीकांत हे एक आदर्श व्यक्तीमत्व आणि कलाकार आहेत. पण सुपर्रस्टार म्हणून ते प्रादेशिकच आहेत.

महाराष्ट्रातील सेलिब्रेटींची लिस्ट काढली, मराठी चित्रपट आणि मालिकांतील कलाकारांचा याच निकषांवर क्रम लावला, तर टॉप टेन कसे दिसेल, असा विचार मनात येतोय. यात स्वतंत्र धाग्याचे मटेरीअल तर नाही..

गेल्या चार वर्षांच्या लिस्ट चाळल्या. तीच तीच नावे टॉप टेन मध्ये दिसत आहेत. चारपैकी तीन वेळा नंबर वन शाहरूखच होता. सो, यू कॅन हेट हिम, यू कॅन लव हिम .. बट यू कॅन्नॉट इग्नोर हिम !! हे आता पुर्णपणे सिद्ध झाले आहे.

शेतकर्‍यांसाठी मनापासून मदत करणारा नाना नसलेल्या आणि काही प्रमाणात का होईना संवेदनशीलता दाखवून शेतकर्‍यांना मदत देणार्‍या अक्शयकुमारचं नाव शाहरुखसारख्या टिनपाटाच्या नंतर पाहून लिस्टची लायकी कळली.

अनुमोदन!

स्वतः खिशातले २ रुपयापेक्षा जास्त पैसे भिकार्‍याला सुध्द्दा न देणारे इतरांना कोणी किती कशी मदत केली आहे याची माहिती न घेता टिनपाट ठरवतात हे बघून आनंद जाहले

धन्यवाद Wink

स्वजोला स्थान नाही मिळाल या यादित.. ऋन्मेष उगाचच सुपर्रस्टार स्वजो सुपर्रस्टार स्वजो करत होता. बाकी मिळकतीवर टॉप १० आणि १०० च्या याद्या बनवण म्हणजे धन्य प्रकरण आहे. माणसाच खर कर्तुत्व राहिल बाजुला, बँक बॅलन्सला महत्त्व. मग ते कसेही, काहीही करुन मिळवलेले का असेनात..

ऋत्विका, आपल्या भावनांचा आदर आहे. पण ही लिस्ट दानशूरांची किंवा समाजसेवकांची नसून सेलिब्रेटींची आहे तर निकषही त्यानुसारच असणार ना.
उद्या सचिन पेक्षा द्रविड महान फलंदाज आहे कारण द्रविड स्वभावाने चांगला आहे असे म्हणाल तर कसे चालेल.

तरीही विषय निघालाच आहे तर निदर्शनास आणून देतो की शाहरूखने देखील नुकतीच एक भली मोठी रक्कम चेन्नई पूरग्रस्तांना दान केली आहे. किती ते नक्की आता मला आठवत नाही. उगाच कमी जास्त आकडा घेतला तर लफडा नको. कोणाला खात्रीशीर आकडा माहीत असेल तर प्लीज इथे सांगा.

तसेच काही जण गुप्त दाना वर विश्वास ठेवणारे असतात. कळत नकळत आपण अश्यांनाही नावे ठेवत नाही आहोत ना हे बघणेही गरजेचे.

आपण नेहमी फिल्म आणि क्रिकेट सेलिब्रेटींकडून दानाची अपेक्षा करतो. पण कित्येक राजकारणी भ्रष्टाचार करतात, कित्येक उद्योगपती कर बुडवतात, काळा पैसा कमावतात अश्यांकडून मात्र कवडीचीही अपेक्षा ठेवत नाही.

हे फिल्मस्टार आणि क्रिकेटपटू जास्त कमावत असले तरी स्वताच्या मेहनतीने कमावतात, स्वताच्या कष्टाचा पैसा दान करतात.
आणि आपण त्यांच्यात तुलनाही कशी करतो बघा,
अ सेलिब्रेटींने ब सेलिब्रेटीपेक्षा कमी दान दिले म्हणून अ ला हिणवतो. पण क आणि ड ने काहीच दान केले नसते तरी त्यांना काही बोलत नाही कारण अ आपल्या नावडीचा Happy

मुग्धटली ही मिळकतीची नाही तर प्रसिद्धीची लिस्ट आहे. आणि मिळकतही प्रसिद्धीच्या जीवावरच कमावली गेली आहे. अन्यथा उद्योगपतीही यात असते.

स्वप्निल जोशी यात नाही कारण यात बॉलीवूडचे स्टार भरलेत. टॉलीवूडचे सुपर्रस्टार रजनीकांत देखील किती मागे आहेत पहा. मग आपल्या मायबोलीवूडचा सुपर्रस्टार कसा असेल.
बाकी ही लिस्ट पाहता त्याचे नाव आपल्याला आठवावे हेच त्याचे यश नाही का.

मंड़ळी, यादी ऋन्मेषने नव्हे फोर्ब्स इंडियाने तयार केलीय.

त्यात क्रिकेटपटू आणि हिंदी चित्रपट अभिनेत्यांचा भरणा अधिक आहे.
पण सानिया, सायना (तेही सर जाडेजांच्या पुढे) , मेरी कोम, लिएंडर, अनिर्बान लाहिरी (हा काय खेळतो तेही पटकन आठवलं नाही - गोल्फ), सुनील छेत्री आणि रोहन बोपन्ना हे अन्य खेळाडू आहेत त्या यादीत. विश्वनाथन आनंद नाही हे मात्र खटकले.
हमारे गाँव का छोरा रोहित शर्मा फेमच्या बाबतीत आठव्या क्रमांकावर कसा काय आला न कळे. आयपीएल जिंकली म्हणून का?
फेम रँकिंग : १ बच्चन २ सलमान ३ सचिन.

केदार,
माझ्यात एवढी ताकद नाही की मी एका सुपर्रस्टारकडून त्याचे चाहते हिरावून घेईल.

समजा जर आपण उद्या शाहरूखला जाऊन सांगितले की मायबोलीवर एक ऋन्मेष आहे जो तुझी एवढी स्तुती करतोय की तुझे चाहते वेगाने कमी होत आहेत. त्याला थांबव नाहीतर पुढच्यावर्षी तू नंबर वन राहणार नाहीस.... तर त्याची प्रतिक्रिया काय असेल.. एनी गेसेस Happy

राधे मा आणि बापू हे आध्यात्मिक गुरू आहेत. अन्यथा सत्यसाईबाबा देखील यात आले असते. या लोकांची कमाई मग सर्वात जास्त असती. तरी यांची वेगळी यादी बनवू शकतो.

<<त्याला थांबव नाहीतर पुढच्यावर्षी तू नंबर वन राहणार नाहीस.... तर त्याची प्रतिक्रिया काय असेल.. एनी गेसेस स्मित>>

------ नम्बर वन खड्ड्ड्यात गेला तरी चालेल... पण निरागस ऋन्मेष चा आनन्द हिरावणार नाही.

ऋन्मेष , ही यादी लोकप्रियता + (उघड) मिळकत या दोहोंवर आधारित .
मी वर् म्हटलं तसं नुसत्या लोकप्रियतेत बच्चन इज ऑन टॉप.

मग आपल्या मायबोलीवूडचा सुपर्रस्टार कसा असेल.>>>> Uhoh तो फक्त तुझ्यासाठी असेल बाबा सुपरस्टार.. उगीच मायबोलीवुड वगैरे नको लिहू.

बाकी ही लिस्ट पाहता त्याचे नाव आपल्याला आठवावे हेच त्याचे यश नाही का. >>>> बाळ ऋन्मेषा त्याच नाव लिस्ट बघुन नाही आठवल तर तुझा धागा बघुन आठवल. तो या यादित आला म्हणुन तुला धागा काढावासा वाटला की कै अस वाटुन गेल.

विश्वनाथन आनंद नाही हे मात्र खटकले. >>>> त्याची मिळकत फोर्ब्जने दखल घेण्याइतकी नाहीये ना

विश्वनाथ आनंद जो खेळ खेळतो त्याची लोकंही दखल घेत नाहीत हे सत्य नाकारता येणार नाही. आणि हेच या यादीत प्रतिबिंबित होतेय.

@ मायबोलीवूड म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी.. मायबोली या संकेतस्थळाचा नाही..

डेरा सच्चा सौदा वाले राम रहीम की कोणते ते बाबा आता बॉलीवूड स्टार पण झालेत ना? पैसे आणि लोकप्रियता यात काही कमी नसावी.

भरत मयेकर, हो नुसत्या लोकप्रियतेत बच्चन साहेब टॉपला आहेत. माझ्या पोस्टमध्ये मी त्यांचे कौतुकही केलेय. तसेही बच्वन आणि शाहरूख दोघेही माझ्या आवडीचे. मी कधी त्यांची तुलना करत नाही. पण मला आजच्या बच्वनपेक्षा ते आंग्री यंग मॅनच भावतात..

फोर्ब्स वाल्यांचं क्लासिफिकेशन पण गंडलेलं वाटतंय. अनेक फिल्मवाले अनेक जण टीव्हीवाले झालेत.

मंड़ळी, यादी ऋन्मेषने नव्हे फोर्ब्स इंडियाने तयार केलीय.
>>
जर खरेच कोणाचा हा समज असेल की ही यादी मी केली तर लोकांचा गैरसमज तसाच राहू द्यायला आवडेल मला Happy

हमारे गाँव का छोरा रोहित शर्मा फेमच्या बाबतीत आठव्या क्रमांकावर कसा काय आला न कळे. आयपीएल जिंकली म्हणून का?
>>>
हो, आयपीएल परफॉर्मन्स आणि एकदिवसीय मधील धडाकेबाज द्विशतकी खेळ्या.
हाच खेळाडू कसोटीत चाचपडतोय. पण ते त्याच्या लोकप्रियतेच्या आड येत नाही.
आणि म्हणूनच मी लेखात म्हटलेय, रोहीत शर्माने कसोटी क्रिकेटला त्याचे स्थान दाखवून दिले.

४५ नं खरं आहे का हे.
असेल तर असहिष्णुतेचा कळस म्हटला गेला पाहिजे. असहिष्णु लेकाचे. मायबोलीवरील कित्येकांचा "हातभार" असेल त्याला.

असो.

पीएल ....ते टिनपाट ऐवजी गोणपाट बसते का बघा मीटरमधे ....(प्राची टु गच्ची चे यमक )

Top 100 Indian celebrities याचं 'सर्वोत्तम १०० भारतीय' हे भाषांतर फार खटकलं Sad
म्हणजे शा.खा. हा सर्वोत्तम भारतीय आहे??
सर्वोच्च १०० भारतीय प्रसिद्ध व्यक्ती हे जास्त योग्य झालं असतं.

Pages