मुलखाची हट्टी

Submitted by सुप्रिया जाधव. on 13 December, 2015 - 11:20

संस्कारांची बैठक आहे धट्टी कट्टी
अनुभवा तू येवून पढवू नकोस पट्टी

निकाल जाहिर केला होता आयुष्याने
मीच बांधली डोळ्यांवर सोइस्कर पट्टी

जाते तेथे येते पिच्छा सोडत नाही
तुझी आठवण अशीकशी मुलखाची हट्टी

एकाएकी उधाण येते मतभेदांना
एकाएकी समन्वयाची विझते भट्टी

गळा घोटतो प्रसंग एखादा.... सौख्याचा
खर्जामध्ये दुःख लावते वरची पट्टी

नांदवून घेईना धड़ देइ सोडचिठ्ठी
ठरव एकदा आयुष्या कट्टी की बट्टी ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान मतला…

निकाल जाहिर केला होता आयुष्याने
मीच बांधली डोळ्यांवर सोइस्कर पट्टी

बोलका शेर…

एकाएकी उधाण येते मतभेदांना
एकाएकी समन्वयाची विझते भट्टी

सुरेख…

शुभेच्छा.

वाह!

संस्कारांची बैठक आहे धट्टी कट्टी
अनुभवा तू येवून पढवू नकोस पट्टी >>> अप्रतिम

जाते तेथे येते पिच्छा सोडत नाही
तुझी आठवण अशीकशी मुलखाची हट्टी >>> , वा !

गळा घोटतो प्रसंग एखादा.... सौख्याचा
खर्जामध्ये दुःख लावते वरची पट्टी >>>>>>> वा !