हे तुला पाहिजे तसे झाले (तरही)

Submitted by सुप्रिया जाधव. on 10 December, 2015 - 12:46

काय होतो पुढे कसे झाले ?
हे तुला पाहिजे तसे झाले

थेट डोळ्यात पाहिले त्याने
विश्व माझे लहानसे झाले

अर्थ शब्दातले फिके पडले
मौन गहिरे जसेजसे झाले

सावली धर ज़रा उन्हामध्ये
मागणे हे न फारसे झाले

मार्ग अवलंबला जिने नवखा
पावलांचे तिच्या ठसे झाले

बेत होते किती तुझे माझे
दैव फिरले तसे फसे झाले

ऐकण्याची तिची सवय नडली
बोलण्याचे तिच्या हसे झाले

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्थ शब्दातले फिके पडले
मौन गहिरे जसेजसे झाले

ऐकण्याची तिची सवय नडली
बोलण्याचे तिच्या हसे झाले <<<

व्वा व्वा

वा
ही पण छान आहे

काय होतो पुढे कसे झाले ?
हे तुला पाहिजे तसे झाले

थेट डोळ्यात पाहिले त्याने
विश्व माझे लहानसे झाले

अर्थ शब्दातले फिके पडले
मौन गहिरे जसेजसे झाले

हे जास्त आवडले.

त्याने थेट डोळ्यात पाहिल्याने मन्त्रमुग्ध होवून त्याच्या त्या एका नजरेतच माझे अवघे विश्व सिमित झाले !

फसलाय का जयदीप शेर ?

वाह !

अर्थ शब्दातले फिके पडले
मौन गहिरे जसेजसे झाले>>व्वा!

>>>मार्ग अवलंबला जिने नवखा
पावलांचे तिच्या ठसे झाले

ऐकण्याची तिची सवय नडली
बोलण्याचे तिच्या हसे झाले>>>हे विशेष आवडले!

मार्ग अवलंबला जिने नवखा
पावलांचे तिच्या ठसे झाले

ऐकण्याची तिची सवय नडली
बोलण्याचे तिच्या हसे झाले

सुंदर…

शेवटचा प्रचंड आवडला. ( वस्तुस्थिती आहे ना ! )

हो वैभव ! दुर्दैवाने हीच वस्तुस्थिती होती, आहे आणि कदाचित असेलहि !!

धन्यवाद !!

आभार मंडळी !!

सुप्रिया।