Submitted by सुप्रिया जाधव. on 10 December, 2015 - 12:40
काय होतो पुढे कसे झाले ?
हे तुला पाहिजे तसे झाले
थेट डोळ्यात पाहिले त्याने
विश्व माझे लहानसे झाले
अर्थ शब्दातले फिके पडले
मौन गहिरे जसेजसे झाले
सावली धर ज़रा उन्हामध्ये
मागणे हे न फारसे झाले
मार्ग अवलंबला जिने नवखा
पावलांचे तिच्या ठसे झाले
बेत होते किती तुझे माझे
दैव फिरले तसे फसे झाले
ऐकण्याची तिची सवय नडली
बोलण्याचे तिच्या हसे झाले
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मार्ग अवलंबला जिने
मार्ग अवलंबला जिने नवखा
पावलांचे तिच्या ठसे झाले
खूप मस्त ...