पुढच्या ठिकाणावर खरा मुक्काम आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 10 December, 2015 - 12:32

पटवून देणे जोखिमेचे काम आहे
जो तो विचारांवर स्वतःच्या ठाम आहे

त्याच्या मनाशी पोचणारा राजरस्ता
सिग्नलविना झाला कधीचा जाम आहे

तू प्रेम दे बदल्यात प्रेमाच्या खरेतर
उपकार मैत्री कीव....फसवे काम आहे

त्याच्या विचारांनी किती दमछाक होते
मेंदूस घडतो केवढा व्यायाम आहे

केव्हाच आहे सोडले दुस्वास करणे
ती जाणते की राधिकेचा श्याम आहे

यंदा तरी हातास थोड़े पीक लागो
त्याच्याचसाठी गाळलेला घाम आहे

एकेक थांबा पार केला जीवनाचा
पुढच्या ठिकाणावर खरा मुक्काम आहे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>एकेक थांबा पार केला जीवनाचा
पुढच्या ठिकाणावर खरा मुक्काम आहे<<<

वा वा, सुरेख!

खुपच सुरेख.
सगलेचह छान पण

तू प्रेम दे बदल्यात प्रेमाच्या खरेतर
उपकार मैत्री कीव....फसवे काम आहे

एकेक थांबा पार केला जीवनाचा
पुढच्या ठिकाणावर खरा मुक्काम आहे

हे अजून खास आहेत.

आर्तता प्रत्येक गझलेत जाणवतेच........धन्यवाद जयदीप !

बेफीजी, निनाद थैंक्यू !!

पहिला आणि शेवटचा शेर उत्तम झाले आहेत.
मधल्या काही शेरात गझलेवरची पकड थोडीसी सैल झाल्यासारखी वाटते आहे. (वै.म.)