स्पेलिंग बी साठी मदत हवी आहे

Submitted by sneha1 on 8 December, 2015 - 10:53

नमस्कार मंडळी !
माझी लेक सध्या ४थी मधे आहे. क्लास लेव्हल आणि ग्रेड लेव्हल दोन्ही मधे तिची स्पेलिन्ग बी साठी निवड झाली आणि ह्या शुक्रवारी स्कूल लेव्हल बी आहे. आणि त्याच्यामधे ४थी आणि ५वी एकत्रच आहेत. लिस्ट मधले शब्द आम्ही करतो आहेत, पण मला खरी मदत हवी आहे ती अनोळखी शब्दांसाठी..त्याच्यासाठी आणि ह्या वयाला योग्य असे मार्गदर्शन हवे आहे.. आणि जे ह्या ३ दिवसांमधे करता येइल असे..
आखूडशिंगी बहुदुधी Happy
प्लीज मदत करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरपूर शुभेच्छा. मी पण मदत नाही करु शकत.:अरेरे:

एस आर डी, स्नेहा १ बहुतेक अमेरीकेत रहातात, त्यामुळे तिथल्या परीक्षेबद्दल बोलत असाव्यात असा माझा अन्दाज आहे.

ती स्पर्धा बहुतेक इकडची भारतातलीच आहे अथवा असावी. मला नाव आठवत नाही पण एका चानेलवर ।होते अशी स्पर्धा.दिलेल्या पुस्तकातले शब्दार्थ इतक्या सोप्या इंग्रजीत आहेत की मुलांचे इंग्रजीही नक्की सुधारेल.शिवाय आकार समजावा म्हणून पेन ठेवले आहे.दप्तरातून सहज नेता येईल.किंमत पन्नासच्या आसपास आणि सहज उपलब्ध.

स्नेहा,
तीन दिवसावर स्पर्धा असेल तर आयत्यावेळी मार्गदर्शनाचे प्रेशर नसावे. अनोळखी शब्दांसाठी ओरीजिन /अर्थ विचारणे, शब्दाचे रुट लक्षात आल्यास तसे, शब्द पुन्हा बोला अशी विनंती करुन फोनिक्स वापरुन स्पेलिंग सांगायचा प्रयत्न करणे हे करता येइल. मुख्य म्हणजे मन शांत ठेवणे. तुमच्या मुलीला शुभेच्छा!

भारतातही ही स्पर्धा होते.. साक्षी नावाचे तेलुगु चॅनेल आहे ते तेलंगणा, आन्ध्रा, तामिलनाडु आणि मुंबई मध्ये घेतात.अजुनही विझार्ड नावाची पण स्पेल बी असते..

माझा मुलगा आत्ता साक्षी बी मध्ये सेमी फायनल (स्टेट लेवल) पर्यन्त गेला होता...पण तो लहान (१ली व २री) च्या गटात होता, तेव्हा त्याना दिलेल्या पुस्तकातले २० - २५% शब्द विचारले होते. बाकीचे कुठुनही विचारले होते.. लॉजिक असे काही नव्हते , तुमचे आत्तापर्यन्त वाचन (अतिरिक्त) किती आहे यावर सर्वकाही असते..
त्यामुळे शाळेतुन त्यांच्या वयोगटाला सजेस्ट केलेली पुस्तके वाचायला सांगा

शब्दाचे ओरिजिन, अर्थ, उच्च्चार यावरुन स्पेलिंग बनवायची प्रॅक्टिस करुन घ्या

स्पेलिन्ग बी साठी निवड झाली >> यासाठी आधी काही एक्झाम घेतात का/ काही क्रायटेरिया आहे का तुमच्या स्कुल मधे?
स्पेलिंग बी आणि स्पेल बी या दोन वेगवेगळ्या एक्झाम आहेत का?
( आमच्या शाळेत स्पेल बी एक्झाम असतात पण त्यात स्कुल लेवल ला कोणीही बसु शकते. त्याच्या पुढच्या परिक्षा सिलेक्शन / पॉइंट बेस वर असतात. माझी मुलगी मागच्या वर्षी मधे त्यांच्या इंटरनॅशनल लेवल पर्यंत गेली होती. )
तुमची आणि आमची परिक्षा सेमच ( Wink ) असेल तर - आम्ही फारसा काहीच अभ्यास केला नाही. स्कुललेवलला तर अजिबात काहीच नाही मग पुढच्या लेवलला त्यांच्याकडुन जे पुस्तक आले होते त्यातले मधे अधे थोडेफार केले असेल. परिक्षेत काय आले होते ते मात्र कळायला मार्ग नाही.
जर स्पेलिंग पाठ न करता उच्चारावरुन करायची सवय असेल तर फारसे काही करावे लागणार नाही.

स्नेहा, ३ दिअव्सच असतील तर शाळेतून आलेल्या लिस्ट मधलेच शब्द तयारी म्हणून करवून घ्या, बाकी जस्ती लोड घेउ नका.
लेकीला शुभेच्छा!