इतिहासाचे साक्षीदार

Submitted by Swara@1 on 7 December, 2015 - 07:05

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझा लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. मायबोलीवर सभासद होऊन काहीच महिने झालेत पण इथे लिहिलेल्या सर्वच कथा कादंबऱ्या, ललित, इतिहास ह्या संबंधित सगळे धागे अगदी शेवटच्या प्रतीसादापर्यंत वाचले आहेत .
इतिहासाची खूप आवड आहे मला. इथे येउन आणि वाचून मला बरीचशी माहिती मिळाली आणि माझ्या ज्ञानात अजूनच भर पडली असे म्हणायला हरकत नाही. इतिहास वाचताना बऱ्याचदा असे जाणवते कि इतिहासकारांच कुठल्याही एका घटनेवर एकमत नसत. प्रत्येकाच्या दृष्टीने इतिहास वेगळा असतो आणि आपण तो त्या त्या लेखकाच्या दुष्टीनेच पाहतो आणि मग नवे नवे वाद सुरु होतात. तर त्यावरूनच सहजच माझ्या मनात हा विचार आला कि खरच जर आपल्याला तो काळ एकदा अनुभवायला मिळाला तर आपल्या सगळ्या शंकांचं निरसन होईल. आजचा माझा प्रश्न असाच आहे कि जर कधी तुम्हाला एक संधी मिळाली खरा इतिहास जाणून घ्यायची तर तुम्हाला कोणत्या काळात जायला आणि कोणत्या घटनेचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल. (उदा. शिवाजी महाराजाचा इतिहास, पेशवे - पानिपत, महाभारत,वगैरे )
काही चुकीच असल्यास निदर्शनास आणून द्यावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जस मी आधी म्हटलं त्याप्रमाणे आपण इतिहास त्या त्या इतिहासकारांच्या दृष्टीनेच पाहतो. त्यातलं खर किती आणि खोट किती हे आपल्याला माहित नसत. अश्या वेळी वाटत कि जर मी तिथे असतो किंवा असते तर खर काय ते समजल असत.

मला अस वाटत कि जर देवाने मला अशी एक संधी दिली, इतिहासातील कोणतीही एक घटना पहायची, समजून घ्यायची आणि त्या मगच सत्य जाणून घायची तर मी नक्कीच छत्रपति शिवाजी महाराज्यांच्या काळात जाईन आणि त्याचं जीवन , त्यांच्या लढाया, स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केलेला संघर्ष, सगळ सगळ (त्यांचा संपूर्ण जीवनपट ) जाणून घेईन. म्हणजे आज इतक्या वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यातल्या काही घटनांवरून जे वादंग निर्माण होतात त्यामागच सत्य कळेल.

तर मित्रांनो जर तुम्हाला अशी संधी मिळाली तर तुम्हाला कोणत्या काळात जायला आवडेल आणि का?

Happy Happy Happy

अजुन जर संधी मिळत गेल्या तर सावित्री आणि रमाई चे पण
यांचा साधा इतिहास जरी वाचला तरी वास्तवात यायला २-४ दिवस जातात
.निदान माझ्या बाबतित तरी.

अजुन जर संधी मिळत गेल्या तर सावित्री आणि रमाई चे पण
यांचा साधा इतिहास जरी वाचला तरी वास्तवात यायला २-४ दिवस जातात
.निदान माझ्या बाबतित तरी.>>>>>> सकुराला अनुमोदन

असे खुप काळ आहेत ज्यात डोकवायला आवडेल,
महाभारत, चाणक्य, देवगिरीचे साम्राज्य, शिवाजी महाराज, पेशवाई, स्वातंत्र्य संग्राम, इ.