गप्पा हिच्या संपत नाही (विडंबन)

Submitted by हर्ट on 6 December, 2015 - 03:31

भय इथले संपत नाही ह्या गाण्याची फक्त चाल वापरली आहे.

गप्पा हिच्या संपत नाही
फोनवर जिवलग मैत्रिण आहे
मी दारापाशी उभा
डोअरबेल बंद आहे...

ते तिचे हसणे पट्टीचे
कुकरचा तो आवाज
बटाटे उपवासाचे
माणूस उपाशी दारात

तो गोड कंठ पुर्वीचा
कायमचा फसवूणी गेला
पावलांचा होता आजाव
स्वागताला असे ती दारात

ओरडून कोरड पडली
बडबडती सख्खे शेजारी
ही थकता थकत नाही
भोगणे उभ्या जन्माचे!

बी

Group content visibility: 
Public - accessible to all site users