पुन्हा पुन्हा चुकणारे आपण

Submitted by जयदीप. on 5 December, 2015 - 14:23

पुन्हा पुन्हा चुकणारे आपण
बरोबरी करणारे आपण

असूनही नसणारे आपण
अनोळखी बनणारे आपण

कधी, कसे रमणार कुठेही
स्वतःमधे रमणारे आपण

कितीतरी ठरतील शहाणे
पुढे पुढे करणारे आपण

कधीतरी समजेल जगाला
हळू हळू भिनणारे आपण

हवेमुळे आहोत कदाचित
वार्याने विझणारे आपण

...जयदीप

टीप: डाॅ. अनंत ढवळे यांची एक गझल या जमिनीत आहे.
ह्या जमिनीचे श्रेय माझे नाही.

मला ती गझल खूप आवडते, त्यावरून ही गझल सुचली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधीतरी समजेल जगाला
हळू हळू भिनणारे आपण>>>बहोत खूब,जबरदस्त!

हवेमुळे आहोत कदाचित
वार्याने विझणारे आपण>>>हा पण सहीच!

छान गझल!

>>>हवेमुळे आहोत कदाचित
वार्याने विझणारे आपण<<< सुरेख

गझलही छान

छान