सांज माझ्या जीवनाची

Submitted by इस्रो on 2 December, 2015 - 23:31

सांज माझ्या जीवनाची बघ ढळाया लागली
माणसे माझी अताशा मज कळाया लागली

काढली त्यांनी मघाशी आठवण जेव्हा तुझी
मग जखम या काळजाची भळभळाया लागली

काय झाले या ऋतूंना मज कळेना हे असे
कोवळी पाने तरुंची का गळाया लागली ?

काल परवा ती सती अन आज हुंड्याचा बळी
निरनिराळ्या कारणांनी स्त्री जळाया लागली

जाहले लागीर कैसे हाय रे परमेश्वरा !
माणसे सुज्ञ सारी का सराया लागली ?

वाढली धडधड कशाने माझिया ह्रदयी अशी
गझल बहुधा आत माझ्या सळसळाया लागली

-इस्रो
[भ्रमणध्वनी ९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users