थ्रील थरार 3

Submitted by Abhishek Sawant on 1 December, 2015 - 21:06

थ्रील थरार ३
.
.
.
.
जय ला चांगलच माहिती होते की रोहित ची चांगलीच तंतरलेली असणार म्हणून तो रोहितला चिडवू लागला की “ तू फक्त gym च कर साल्या जरा काय झाले की तुझी फाटते, नुस्ता फुगलयस आंगात काय दम नाही “ मग रोहित ने पन चार अस्सल कोल्हापुरी शिव्या एकंदर जय ला आणि लांडग्याला हासडल्या आणि ईकडे तिकडे बघत तो लांडगा अजून त्यांच्या मागावर तरी नाही ना याची खात्री करून घेऊ लागला.
तोपर्यंत एका गावाची वेस लागली होती भुत आत्मा वैगेरे काही असेल तर ते गावची वेस ओलांडू शकत नाही असे त्याने कोणत्यातरी भयकथेत वाचलेल होतं म्हणून वेस लाग्ल्यावर त्याला जरा हायस वाटले. थंड वारा त्यांच्या अंगाला स्पर्श करून जात होता गाव आल्याने जय ने गाडीचा वेग कमी केलेला गावातली सगळे लोक जागेच होते. आणि सगळेच लोक या दोघांच्या कडे संशयाने पहात होते जय ने शेवटी एका दोघाना ओळखीचा हात केला. आणि गाडी थांबवून तो त्यांच्याशी कन्नड मध्ये बोलू लागला. जय इकडे तिकडे बघत गावातील निरीक्षण करत होता.
गावच्या पारावर मानसे बसलेली होती चोर कूट कूट चोर आलेत याची माहिती काढत होते, कोण म्हणत होता मी चोरास्नी वरच्या माळ रानावर बघीतलो कोण म्हणत होता की त्यांना बाई च्या वेशात दिसले अशी जोरदार चर्चा तिथे चालली होती.
हे चोर म्हणजे समाजातील एक विशिस्ट घटक होते, ते लोक असे गावोगावी भटकून चोरी करणे दरोडे घालने अशी कामे करत. कोणत्यातरी गावावरुन ५०-६० लोक निल्याची बातमी आणि २ ते ४ ठिकाणी झालेले दरोडे त्यामध्ये मारली गेलेली माणसे यामुळे एकंदरित भितीचे वातावरण आसपासच्या खेडेगावात पसरलेले होते. त्यातच whaatsapp हे नविन माध्यम मिळाल्यामुळे अश्या अफवा फोफावल्या होत्या. लोक रात्र रात्र जागत गस्त घालु लागलेले, दाट वस्तीमध्ये राहणार्‍या लोकांना तेवढी भीती नसली तरीही शेतावर किवा लहान लहान वाड्यांवर राहणार्‍या लोकांना चोरांची भिती जास्त होती.
त्या माणसाचे आणि जय चे बोलणे झाले व जय ने गाडील किक मारली आणि गाडीने वेग घेतला काही मिनिटातच गाव मागे पडले. आता या नंतर आणखी एक गाव ते झाल कि जय चे गाव तिथुन पुधे गेल कि जयची वस्ती एवढाच त्यांचा प्रवास शिल्लक राहिला होता. रोहित ला आता वाटू लागले की कशाला याचा घरी यायला हो म्हनालो. तो जेमतेम एक बैलगाडी जाईल असा छोटा रस्ता आणि रस्त्याच्या बाजुला दुतर्फा असनारी शेती, सोबतीला थंड गार वारा आणि चांदने. ही रोहित साठी bike चालवायची ideal condition होती पन मगाशी झालेल्या काही घटनांच्या मुळे तो गाडी चालवायच टाळत होता जय ने त्याला आग्रह केला तरी सुद्धा त्याने नकार दीला जयला रोहितच्या स्तिथिची कल्पना होती म्हणून तो पन गप्प बसला,.
ते एक गाव ओलांडुन जय च्या गावात पोहोचले तिथुन पुढे त्यांनी एक कच्चा रस्ता पकडला जो जय च्या वस्तीवर जात होता. त्या रस्त्यावर ५-६ मिनिटे पुढे आल्यानंतर ते जयच्या शेतावरच्या वस्ती वर पोहोचले तेव्हा ८.३० वाजून गेले होते.
जय ची वस्ती म्हणजे ३ – ४ त्यांच्याच भावकी मधील घरे आणि घरांच्या भोवताली शेती, घर पण तशी बेताचीच होती. घरापुढेच एक चोटासा गोटा होता त्यात एक म्हैस आणि तिचे १-२ महिन्याचे रेड्कु बांधले होते. घरापासुन काही अंतरावर शेळ्यांचा पाल होता. घरांच्या मागच्या बाजूला २-३ छोटे डोंगर किंवा टेकडी होत्या.
जय आणि रोहित पोहोचताच जयचे वडील दारात आले आणि त्यांना प्यायला पाणी दिले, हातपाय धुवून फ्रेश होवून ते घरात गेले, जयच्या आईने त्यांना मस्तपैकी चहा बनवून दिला. ते चहा संपवताणार तेव्हड्यात लाईट जाते. लाईट गेल्यावर ५ मिनिटांनी लोकांचा गलका ऐकु येतो, कोणीतरी जय ला हाक मारते अरे घरात काय बसलायसा बाहेर य चोर आलेत चोर. आणि.......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mi pahilich katha lihtoy..salla dilyabaddal thanks..shift key mhanje mala ky kalal nhi?

पसरट होते आहे कथा... काही नवीन उत्कंठावर्धक घडत नाहीये.
कथेला कलाटणी हवी.

आपण लेखन झाल्यावर पोस्ट करण्याआधी एकदा वाचत जा. म्हणजे शुद्धलेखन झाले आहे की नाही ते कळेल.

वर उमेश ने सांगितले आहे ते असे:
नुसता एन टंकला तर आणि शिफ्ट कळ दाबून कॅपिटल एन टंकला तर होतो हे सांगत आहेत.

सर्वसाधारण (फक्त सर्वसाधारण, कारण अपवाद आहेत) नियमानुसार र अक्षरा नंतर बहुदा ण यायला हवा.
तेथे नसतो. उदा. मरण, कारण, तारण, स्मरण.

मी मागील वेळी लेखन संशोधनाची साधने दिली होती ती वापरलेली दिसत नाहीत.
Sad

घरापुढेच एक चोटासा गोटा होता हे वाचून डोळ्यासमोर एक चपटा दगड आला... Happy

अभिषेक जेव्हा कधी अक्षर टाईप करताना गोंधळ होईल, तेव्हा प्रश्नचिन्हावर क्लिक करावे. अधिक माहितीसाठी खालील image बघा.

Untitled.jpg

Ok..I'll take care next time..thanks..actually I m typing in word microsoft..then I used to post here

Ok..I'll take care next time..thanks..actually I m typing in word microsoft..then I used to post here