भुक्त

Submitted by Rajesh Kulkarni on 25 November, 2015 - 15:37

भुक्त

जरा कोठे मोदी सरकारच्या बाजूने बोलले किंवा कोणाच्या तथाकथित सेक्युलरपणावर टीका केली की तुम्हाला भक्त म्हणून तसे लेबल लावलेच समजा. एकदा तसे केले, की मग या लोकांना मूळ मुद्दा काय आहे याबाबत विचार करण्याची गरजही रहात नाही.

तेव्हा उगाचच धर्मनिरपेक्षतेचे सोंग घेणा-यांसाठी, भाजप सरकारवर उठता-बसता टीका करणे हाच धर्म बनवून घेतलेल्यांसाठी एक शब्द सुचवत आहे. भुक्त.

भुक्तचा अर्थ पुढीलप्रमाणे - १. जो खाया गया हो। भक्षित। २. जिसका भोग किया गया हो। ३. जिसे भुना लिया गया हो।

वरील अर्थाप्रमाणे ज्याने आपली बुद्धी अनाठायी टीका करण्यासाठी, तसे करताना उठसुट दुस-याला भक्त म्हणण्यासाठी गहाण टाकलेली आहे, मग ती कॉंग्रेसकडे, लालू-मुलायमकडे, पुरस्कार परत करणा-यांकडे किंवा आणखी कोणाकडे गहाण टाकलेली असो, ते भुक्त.

शिवाय हा शब्द भक्तच्या जवळचाही आहे. भुक्त लोकांनाही त्याचा अर्थ समजणार नाही त्यामुळे त्यांना भुक्त म्हटले तर त्याचा अर्थच न समजल्यामुळे ते थोडे बावचळतील, परंतु हळुहळु त्यांनी त्यांची बुद्धी कोठे गहाण टाकली आहे हे त्यांचे त्यांनाच कळेल. त्याप्रमाणे त्यांचे कॉंभुक्त (कॉंग्रेसभुक्त), लाभुक्त, मुभुक्त असेही वर्गीकरण करता येईल. किंवा ते तपशील नको असतील तर केवळ भुक्त हेही विशेषण पुरेसे होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकभुक्त म्हण्जे काय तुमच्या व्याख्येत?

चातुर्मासात, नवरात्रात काही लोक ए.भु. रहातात म्हणजे एक धान्य खातेत.