एल आय सीच्या जीवन अक्षय ६ पॉलिसीत पैसे गुंतवावे का?

Submitted by अमा on 25 November, 2015 - 03:18

एल आय सीची जीवन अक्षय ६ योजना गुंतवणूक करण्या योग्य आहे का? समजा त्यात ३ लाख १० हजार गुंतवले तर दर वर्षी २२५०० रु. परेन्त परतावा मिळेल. ही अ‍ॅन्युइटी स्कीम आहे. दर महिन्याला, क्वार्टरला किंवा सहा महिनयांनी पण पेमेंट घेउ शकतो. ते खर्च करता येइल किंवा इतर ठिकाणी गुंतवता येइल. जालावर स्कीमची माहिती आहेच. आपले काही अनुभव असल्यास शेअर करा. शोधून करेक्ट लिंक देते.

रिटायर मेंट प्लानिन्ग च्या द्रुष्टिकोनातून स्कीम बरी आहे का? इतर चांगले पर्याय असल्यास सांगा. एन पी एस, पीपीएफ पी एफ सोडून.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची माहिती बरोबर आहे अमा. ७.३% निश्चित , न बदलणारा व्याज दर असणार आहे.

हा दर तुम्हाला चालत असेल तर की स्कीम घ्यावी. पण त्या आधी घरच्यांच्या सर्व लोकांच्या नावानी पीपीएफ खाती काढुन वर्षी दिड लाख प्रत्येकी भरावे. सध्या साडेआठ व्याज आहेच, जो कधीच ८ च्या खाली जाणार नाही.

पीपी एफ आहे. पण त्यात इतकी रक्कम भरत नाही. त्याची एक वेगळी क्वेरी आहे.

१) पीपीएफ आहे हैद्रआबाद मध्ये. तर मुंबईत त्या अकाउंट मध्ये पैसे भरू शकतो का?

आणि
२) स्पाउस वारल्यावर त्याच्या अकाउंट् मधेएल पैसे कसे काढायचे.? माझे बँ ऑफ मैसूर मध्ये खाते आहे.
लीगसी मधून कंपुटर वर ट्रान्स्फर करताना माझे नॉमिनेशन त्यानी गहाळ केले. आता लीगल हेअर/ एअर
सर्टीफिकेट द्या म्हणतात. पैसे रिकव्हर करता आले पाहिजेत. हे एकच काम माझे पेंडिंग राहिले आहे. काय डॉकमिंट लागतात?

पॉलिसीकडे इन्व्हेस्टमेण्ट म्हणून पाहू नये असे फायनान्शियल अ‍ॅड्वायजर सांगतात. त्यापेक्षा डेथ बेनिफिट पॉलिसी घ्यावी कमी प्रीमियमची आणि उरलेले पैसे इन्व्हेस्ट करायचे. तुम्हाला जो रेट ऑफ इन्टरेस्ट मिळतोय त्यापेक्शा चांगला रेट ऑफ इन्टरेस्ट अजून कशात मिळतो का ते पाहा. डेट बेस्ड म्युच्युअल फन्ड हा त्याहून चांगला ऑप्शन असू शकेल असे मला वाटते.
तरी एकदा फायनन्शियल अ‍ॅडवायजरला विचारलेले बरे. मामीला विचारून पाहा. ती चांगला सल्ला देईल,

पी पी एफ आता दीड लाख केले.

ब्यान्क्तील पीफ खात्यात कुठुनही पैसे भरता येतात.

पुर्वी पोस्टातील खाती कनेक्टेड नव्हती. ती नुकतीच झाले आहेत... पण त्यासाठी तुम्हाला त्या मूळच्या पोस्टात जावे लागेल व नवा दहा की बारा अंकी नंबर घ्यावा लागेल.. त्याचे नवीन पासबुक मिळते.

ते मिळाले की मुम्बैच्या पोस्टात तुम्ही पैसे भरु व काढू शकता.

पीपी एफ आहे. पण त्यात इतकी रक्कम भरत नाही. त्याची एक वेगळी क्वेरी आहे. >>>>>>

असे करू नका अमा, पीपीएफ मधे पूर्ण रक्कम भरा. ते जास्त फायदेशीर आहे ह्या पॉलिसी पेक्षा.

च्या मारी ! धरून फाट्याक स्कीम आहे !
३० नोव्हेम्बर २०१६ पासून याचा रेट मात्र कमी झाला असून तो ६.५ % च आहे !
बँकांचे व्याजदर कमीच होणार आहेत. तरी हा एक नक्कीच चांगला गुंतवणूक पर्याय आहे.

विशेष कोणी घ्यावे ?
- ज्यांना एकरकमी गुंतवणूक करायची आहे.

वरिष्ठ काय एज लिमिट आहे काय वय आहे सुरुवातीचे ? माझी ज्येना पौगंडावस्था चालू आहे. ना धड ज्येना ना चाळीशीतले नवनव तरूण.

पीपीअेफ च्या माहिती बद्दल धन्यवाद टोचा.
मी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आता पर्यंत. नोकरी न करणाऱ्या कुटुंब सदस्याचे पण पीपीअेफ अकाउंट काढता येते का?

ते तेवढे य'ल. आय. शी.' आणी 'गुंतवणूक' असा एकत्र उल्लेख करणे टाळाल का प्लीज..! ह्यांचा काहिएक संबंध नाही!!
हे म्हणजे 'भयंकर सुंदर' वा .खतर्नाक गोड' वगैरे सारखे म्हणतात तसे वाटते.
माझे मत असे आहे की गुंतवणूक ही पाँलिश्यात करु नये ती योग्य ठिकाणीच करावी. पी पी एफ हे उत्तम उपायांपैकी एक.
विमा हा जोखमीचा प्रकार बघुन 'टर्म' च घ्यावा.
बाकी यल. आय. शी. ही 'बँक ओफ ध्रुतराष्ट्र' सारखी अजूनही (एवढे कमवून ठेवले असतांन्ना व स्पर्धक असतन्ना) तेवढीच हेकट व महागडी आहे ह्याबदाल अर्थतज्ञांकडून माहिती घ्यावी.

यक्ष, 100% सहमत अजूनही ब्रँड च्या नावाखाली लूट चालूच आहे, अर्थ निरक्षर किंवा आळशी जनतेचा तुटवडा नाही तोवर त्यांच्या धंद्याला तोड नाही