साथ मला दे इतकी तू की...

Submitted by सत्यजित... on 23 November, 2015 - 15:51

हातामध्ये हात धरु दे...
रस्त्यासोबत वाट-सरु दे!

कोणाचीही ओळख नाही...
त्या जागी ने..पण अब्रू दे!

काळाला या उत्तर नाही...
मग प्रश्नाला या विसरु दे!

आभाळाला कैद करुया...
पंखांचे जाळे पसरु दे!

अवघड नाही जीवन-गाणे...
सप्त-सुरांनी मन बहरु दे!

साथ मला दे इतकी तू की...
वाट..प्रवासी स्वप्न ठरु दे!
—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users