मला नसते मलाच फसवायचे!

Submitted by vilasrao on 21 November, 2015 - 11:59

वलेपण आंतले, मन जपायचे
कधी मग पापणीस भिजवायचे!

प्रभाकर मावळेल क्षितिजावरी
बुडून अजून तांबड विझायचे !

उगाळत आठवांस बसतो जिथे
तिथेच असून आपण नसायचे !

मनीतर ग्रीष्म दूरवर सारखे
नटून थटून श्रावण दिसायचे !

वळून वळून मीपण बघायचो
जरी नसते कधीच परतायचे !

मला नसते मलाच फसवायचे !
तरी असते तुलाच विसरायचे !

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users