प्रेम रतन धन पायो

Submitted by समीरपाठक on 19 November, 2015 - 12:56

करिष्माई निर्माते-दिग्दर्शक सुरज बडजात्या हे नवीन चित्रपट त्यांची आवडती व्यक्तिरेखा "प्रेम" आणि या वेळेस प्रेम च्या भूमिकेत सलमान खान दुहेरी भूमिकेत असल्या तिकीट बारीवर गाजण्याच्या दृष्टीने परिपूर्ण मसाल्या सहित आलेले आहेत. पहिल्या विकेंडलाच गाठलेला शंभर कोटींचा आकडा हा दाखवतो कि जनता आधीपासूनच फक्त बडजात्याच्या करिष्म्यावर विश्वास ठेवून आहे. पण कितीही नाकारले तरी रिपीट ऑडीयंस हि सुरज बडजात्या फिल्मची मागील काहीवेळची बनलेली खासियत या वेळेस कितपत चालते यावर या सिनेमाचे यश अवलंबून असेल. दिग्दर्शकाचे आणि मुख्य अभिनेत्याच्या जोडीचे प्री-इम्प्रेशनच इतके जबरदस्त कि पहिल्या तीन दिवसातच हिटचा दर्जा चित्रपटाने मिळवला पण यशस्वी होण्याचा दर्जा या नंतर सुरु होईल, आणि तो मिळेल का हे अनुभवणे मजेशीर राहील !!!!
सुरज बडजात्याचा सिनेमा म्हणजे पूर्ण शाकाहारी थोडक्यात पूर्ण कुटुंबाला सोबत नेउन देखील कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला आवडेल असे काही ना काही सापडणारा एक दुर्मिळ सिनेमा असे आजवर इम्प्रेशन होते. मैने प्यार किया, हम आप के है कौन, हम साथ साथ है आणि विवाह असल्या एक से एक उत्तम कलाकृती सादर करणारा हा गडी. अर्थात मै प्रेम कि दिवानी हु सारखा अपवाद पण या केस मध्ये हा अपवाद देखील "सन्माननीय अपवाद" आपोआप बनतो.
सलमान खान दुहेरी भूमिकेत आणि त्यातही एक भूमिका राजाची आणि एक त्याच राज्यातल्या प्रजाजनाची. या दोन भूमिकांचा आपसात-सहकलाकारांशी मेळ जमवताना लेखक स्वत:च कन्फ्युज झालाय का अशी शंका प्रेक्षकांना येते. या दोन पैकी एक भूमिका जवळपास तीनही तासभर कहाणीच्या बाहेर असूनही हे विशेष. कहाणीलेखक-पटकथा लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता या चारही महत्वाच्या भूमिकांत सुरज बडजात्याच असल्यामुळे जसे विवाहच्या केसमध्ये उत्कंठावर्धक आणि तारुण्यपिटिकेला गवसणी घालणारी आगळी- वेगळी कथा असली वाहवा त्याने सगळ्या वयोगटातून त्याने मिळवली त्याचप्रमाणे या वेळेस रिपीट ऑडीयंस तर सोडा पण मागील पुण्याईमुळे मिळालेला ऑडीयंसहि छी-थु करेल अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.
लेखकाने cinematic लिबर्टी इत्यादी इत्यादी संकल्पनांचा आधार घेत प्रेक्षकांना गृहीत धरणे हे हिंदी प्रेक्षकांसाठी नवीन नाही पण सुरज बडजात्या सारख्या प्रथितयश (!!!!!!) लेखक-दिग्दर्शकाने प्रेक्षकांना मूर्ख समजण्या इतपत कमतरता ठेवाव्यात याचा धक्का बसल्याशिवाय राहात नाही. जास्त नाही आपण एकंच छोट उदाहरण घेऊ एक राजाच्या कुटुंबातल्या आंतरिक बाबी भलेही बाहेरचा व्यक्ती राजवाड्यात त्यांचा आत्मज म्हणून शिरला तरीही इतक्या सहजा-सहजी बाहेरपर्यंत झिरपाव्यात?? बाकी प्रसंग हि सांगता येतील गृहीत धरल्याचे पण आधीची पुण्याई बघता इतकच सध्या पुरे बाकी बघणाऱ्या प्रेक्षकांनी आपापले ठरवावे.
आलोक नाथ हा सुरज बडजात्याचा लकी चार्म वाटायचा मला कारण त्याच्या गाजलेल्या प्रत्येक सिनेमात तो एक महत्वपूर्ण भूमिकेत होता."मै प्रेम कि दिवानी हु" मध्ये नव्हता आणि असा सिनेमा होता हे कोणाला आठवते का या प्रश्नाच्या उत्तरातच मला असे का वाटते याचे उत्तर आहे का?? या सिनेमातही आलोक नाथ नाही !!!! वास्तविक बघता अनुपम खेरच्या जागी त्याला बसवता आल असत पण.........
मुख्य अभिनेत्री म्हणून सोनम कपूर आहे पण तिला प्रोमोसाठी वापरलेल्या गाण्यात कंबर हलवणे सोडून इतर काही महत्व नाही. सहाय्यक भूमिकेत नील नितीन मुकेशहि आहे पण त्याला तोंडी लावण्यापुरतेही महत्व नाही.
२००६ सालच्या विवाह मध्ये स्व.रवींद्र जैन यांचा म्हणजेच एका मेन स्ट्रीम चित्रपट क्षेत्रात नवीन संगीतकाराचा वापर करून त्यांनी दिलेल्या संगीताच्या बळावर चित्रपट यशस्वी करून दाखवल्या नंतर सुरज बडजात्याची हिंमत वाढली अन या वेळेस त्याने संगीतासाठी चक्क हिमेश रेशमियाचा वापर केला. पण ज्याप्रमाणे रवींद्र जडेजा कितीही फुगला तरी कसोटीत त्रिशतक मारू शकेल का?? यातच जाणकारांना रेशमिया महाशयांना वापरणे योग्य कि अयोग्य समजून जायला हवे.
चित्रपटाला मी अर्धा स्टार देईन अभिनेत्यांच्या मेहनतीसाठी आणि दिग्दर्शकाच्या पूर्वपुण्याईसाठी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विवाहच्या केसमध्ये उत्कंठावर्धक आणि तारुण्यपिटिकेला गवसणी घालणारी आगळी- वेगळी कथा असली वाहवा त्याने सगळ्या वयोगटातून त्याने मिळवली >>>>>> ????? तारुण्यपिटीका शद्ब नक्की कशासाठी आहे ????

बडजात्याचे हल्लीचे चित्रपट त्यांच्याच जुन्या चित्रपटांचे रिमेक असतात. हा कुठल्या चित्रपटाचा रिमेक आहे?

आपण चित्रपटाला अर्धा स्टार दिलात आणि जनतेने २०० करोड Happy

सलमानच्या चित्रपटांची परीक्षणे एक आठवडा आधीच यायला हवीत, अन्यथा ही परीक्षणे येईयेईपर्यंत १०० कोटींचा गल्ला रोख जमला असतो तर १०० कोटी अ‍ॅडवान्स बूकींगमध्ये

सलमानच्या चित्रपटांची परीक्षणे एक आठवडा आधीच यायला हवीत, अन्यथा ही परीक्षणे येईयेईपर्यंत १०० कोटींचा गल्ला रोख जमला असतो तर १०० कोटी अ‍ॅडवान्स बूकींगमध्ये>>>>>>>>>>>>>>>>> ऑ!
ऋ, एक आठवडा आधीच्या परीक्शणाच काय घेउन बसलास? एक वरषापुर्वीच लोकांना माहीत असतं भाईचा कुठला पिच्चर येणारे ते. आता पुढच्या इदीला येणार्‍या सुलतान कडे डोळे लागलेत पब्लिकचे.

भाईचे फॅन्स परीक्षण वाचून सिनेमा बघायला जात नाहीत. भाईचा पिक्चर हे त्यांच्यासाठी घरचं कार्य असतं. पिक्चर कसाही असला तरी भाईचे फॅन्स बघतातच.

भाईचा पिक्चर फ्लॉप करून दाखवण्यासाठी सोहेल खानसारखी किस्मत आणी गट्स असावे लागतात. (किंवा सुभाष घईंसारखी)

भाईचे फॅन्स परीक्षण वाचून सिनेमा बघायला जात नाहीत. भाईचा पिक्चर हे त्यांच्यासाठी घरचं कार्य असतं. पिक्चर कसाही असला तरी भाईचे फॅन्स बघतातच.
>>

सहमत आहे.

पण होतं काय, चित्रपटाला जाणारे सारेच भाईंचे फॅन नसतात. तर सुरुवातीला भाईंचे फॅन गर्दी करत १०० कोटी मिळवून देतात, त्यामुळे चित्रपटाची हवा होते, आणि पिक्चर चांगला असावा म्हणत आमच्यासारखी सामान्य माणसे आणखी १००-२०० कोटी कमावून देतात. जर आम्हाला आधीच समजले की चित्रपट टुक्कार आणि भाईंच्या फॅन्सनी बघावा ईतपतच सुमार आहे आहे तर मग आमचे पैसे तरी वाचतील.

आजच्या तारखेला सलमानच्या पिक्चरचे एक तिकीट = एक किलो तूरडाळ आहे.
एखाद्या गरीबाच्या पोराला तूरडाळ खायला घालण्याचे पुण्य त्या आगाऊ परीक्षणकर्त्याला मिळेल.

एखाद्या गरीबाच्या पोराला तूरडाळ खायला घालण्याचे पुण्य त्या आगाऊ परीक्षणकर्त्याला मिळेल.>>> हाच फंडा दिलवालेच्या वेळी देखील वापरण्यात येईल.

नक्कीच, पण
शाहरूखचे चित्रपट भक्त (कट्टर चाहते) नाही चालवत. किंबहुना वर आपण म्हणालात तसे "भाईचे फॅन्स परीक्षण वाचून सिनेमा बघायला जात नाहीत" हे शाहरूखबाबत लागू होत नाहीत. ते त्याचा फ्लॉप स्विकारतात. अर्थात त्यात शाहरूखचा काही कमीपणा नसून त्याची चित्रपटाची निवड चुकली हे ते जाणतात आणि त्याच्या पुढील चित्रपटासाठी त्याला शुभेच्छा देतात.

तीन खानांमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये एक बेसिक फरक आहे.

सलमान खान - याने काहीही केले तरी त्याचे चाहते भाईने केलेय ते आनंदाने चालवून घेतात.

आमीर खान - याने नेहमी उत्तमच अदाकारी दाखवावी अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा असते. काहीही आचरटपणा आमीरकडून खपवून घेतला जात नाही.

शाहरूख खान - हा या दोघांचा सुवर्णमध्य आहे. याने आचरटपणा आणि अदाकारी या दोघांचा मध्य साधावा, हे दोन्ही जोडीने वा आलटून पालटून करावे अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा असते. त्याने अभिनयाशी फारकत कधी घेऊ नये पण त्याचबरोबर आपली स्टाईल आणि स्टारडम सुद्धा जपावे अशी अपेक्षा असते. दर दिवशी चाहत्यांच्या शाहरूखकडूनच्या अपेक्षा बदलत असतात, आणि तो त्या आजवर पुर्ण करत आपले सुपर्रस्टारपद टिकवत आला आहे हे विशेष.

तळटीप - एकच माणूस या तिघांचाही चाहता असू शकतो, मात्र त्याच्या अपेक्षा तिघांकडून वरीलप्रमाणे वेगवेगळ्या असतात.

चित्रपटाला मी अर्धा स्टार देईन>>>>>>>तुम्ही फारच उदार आहात, Happy

राजश्री कडुन अशा गार्बेजची अपेक्षा नव्हती.

सल्लू क्रिमिनल चा चित्रपट थेटरात पाहणार नाहि, अस निश्चय केलाय्...तेंव्हा परीक्षण कस ही असलं तरी घरीच पहीन, किंवा नाहि पाहणार Wink

हाच फंडा दिलवालेच्या वेळी देखील वापरण्यात येईल.
>>
शाहरूख इथे आला.
मी सलमानबद्दल लिहिल्याने नंदिनी यांनी शाहरूखबद्दल लिहिले.
अर्थात यात काही गैर नाही, फक्त धाग्यावर शाहरूख आणायचे बिल माझ्यावर फाडू नका ईतकेच नमूद करायचे आहे. Happy

अवांतर - शाहरूख आणी सलमानहची तुलना गंमतीशीर आहे. एकेकाळी सलमान हा शाहरूखचा सपोर्टींग अ‍ॅक्टर म्हणून मिरवायचा

शाहरूख आणी सलमानहची तुलना गंमतीशीर आहे. एकेकाळी सलमान हा शाहरूखचा सपोर्टींग अ‍ॅक्टर म्हणून मिरवायचा>>>>>>> खरंच गम्मत वाटली वाचुन.

नक्की काय गंमत,
<< एकेकाळी सलमान हा शाहरूखचा सपोर्टींग अ‍ॅक्टर म्हणून मिरवायचा >>
हे का? यात तथ्य आहे पण ..
सैफही तसाच अडकला असता ..

म्हणजे त्याने वेगळ्या प्रकारच्या भुमिका केल्या नसत्या आणि शाहरूख, यश चोप्रा, करण जोहार स्टाईल सिनेमाच करत बसला असता तर तिथेच अडकला असता आणि आज साडेतीन खानांमध्ये तो ओळखला गेला नसता.

"हम तुम" हा सोलो हिट त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट होता.

२००६ सालच्या विवाह मध्ये स्व.रवींद्र जैन यांचा म्हणजेच एका मेन स्ट्रीम चित्रपट क्षेत्रात नवीन संगीतकाराचा वापर करून >> रविंद्र जैन नवीन संगीतकार ?

स्व.रवींद्र जैन यांचा म्हणजेच एका मेन स्ट्रीम चित्रपट क्षेत्रात नवीन संगीतकाराचा वापर करून >> रविंद्र जैन नवीन संगीतकार ? >>>

Biggrin मी वाटच बघत होते हे कोण लिहितंय त्याची...

Pages