Submitted by बाळ पाटील on 17 November, 2015 - 02:17
असे काय मोठे तुझे राज आहे
मध्ये नागडा अन वरी साज आहे
कधी झाकतो का रवी या कराने
तरी या जिवाला किती खाज आहे
किती धावला तो उभा जीवनी पण
कुठे काल होता कुठे आज आहे
किती सावरावा पदर पापण्यांचा
कुणाला कशाची इथे लाज आहे
उशीरा कळाले , धरा गोल सारी
इथे झोपडी अन तिथे ताज आहे
बघा लावली आग त्याने स्वत:ला
तसा तो जरासा जिगरबाज आहे.
- बाळ पाटील
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बघा लाविली आग त्याने
बघा लाविली आग त्याने जलाला
तसा तो जरासा जिगरबाज आहे.<<<
लाविली असे लिहिण्याची काही खास आवश्यकता जाणवत नाही. 'लावली' असेही चालेल. दुसरी ओळ मस्त! पहिल्या ओळीत 'जलाला' ऐवजी 'स्वत"ला' असे असते तर अधिक मजा आली असती. कृ गै न!
धन्यवाद बेफिकीरजी, बदल
धन्यवाद बेफिकीरजी, बदल मलादेखील रुचला.
छान
छान
nice
nice
वाह्...जबरदस्त! अभिनंदन बाळ
वाह्...जबरदस्त! अभिनंदन बाळ पाटिलजी!
सग्गळे शेर चढत्या क्रमात दमदार!
बेफीजी...काय फोडणी असते राव तुमची!
खरंच मजा आली!
माझ्या एका शेरालाही असाच 'तडका' सुचवला होता आपण,त्याची आठवण झाली!
धन्यवाद!
अरविंदजी , मोगाजी धन्यवाद
अरविंदजी , मोगाजी धन्यवाद !!
सत्यजीतजी, खरेच मजा आली !!!
छान गझल !
छान गझल !
मुक्तेश्वरजी धन्यवाद !
मुक्तेश्वरजी धन्यवाद !
छान
छान