फिरवून बघ ना पाठ ते येईल धावत

Submitted by सुप्रिया जाधव. on 15 November, 2015 - 21:50

हल्ली सुखाचे वागणे नाही सुसंगत
आयुष्य बसते त्यातुनी दुःखे उगाळत

त्याच्या स्वभावाचे अनेकानेक पैलू
शेरामधे एका तुझ्या नसतील मावत !

तेव्हाच ये होईन जेव्हा पाठमोरी
डोळ्यातल्या पाण्यास होते मी बजावत !

हृदयातल्या गोष्टी नका मेंदूस सांगू
हटकून बसतो जे हवे ते अर्थ काढ़त !

गमजा नशीबाच्या सहन करतेस का तू
फिरवून बघ ना पाठ ते येईल धावत

टाळू नको आमन्त्रणे अवघ्या ऋतुंची
थोड़ी पुढे होताच तू करतील स्वागत !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>तेव्हाच ये होईन जेव्हा पाठमोरी
डोळ्यातल्या पाण्यास होते मी बजावत !<<< व्वा वा

सुरेख गझल झाली आहे.

अभिनंदन!

गझल खासंच!

>>>टाळू नको आमन्त्रणे अवघ्या ऋतुंची
थोड़ी पुढे होताच तू करतील स्वागत !<<<
काय समारोप आहे गझलेचा!
उमेदभऱ्या मनाची साशंक घालमेल नी आश्वस्तता...दोन्ही पुरेपुर!

गझल खासंच!

>>>टाळू नको आमन्त्रणे अवघ्या ऋतुंची
थोड़ी पुढे होताच तू करतील स्वागत !<<<
काय समारोप आहे गझलेचा!
उमेदभऱ्या मनाची साशंक घालमेल नी आश्वस्तता...दोन्ही पुरेपुर!