(*सूचना - फेसबुक वरील लोकप्रिय पेज भुताटकी (4400+LIKES) या पेज वरील लोकप्रिय कथा इथे देत आहे . सदरहू पेज हे मी व माझा मित्र तुषार घाग याचे Co-Creation असून सदरची कथा माबोकरांना आवडल्यास अन्य कथा नंतर टाकल्या जातील .आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत--- मंदार कात्रे }
https://www.facebook.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9F%E...
" किल्लेदार "
समीर लहानपणापासून वात्रट, कधी त्याने आपल्या आई वडिलांचं ऐकलं नाही, दररोज भांडण खोड्या आणि आत्ता मोठा झाल्यावर रस्त्यावर मारामाऱ्या पण करायला लागला . कसाबसा १२ वी पास झाला ,आई वडील वैतागले आणि त्याला त्याच्या आत्याकडे पाठवला. तिकडेच त्याने अभियांत्रिकीला प्रवेश घेतला , शिकत असताना ह्याच्या अंगातले दुर्गुण कमी न होता वाढतच गेले. महाविद्यलयात त्याने टपोरी मुलांची सांगत पकडली आणि मित्रांबरोबर पार्ट्या करणं सिगारेट दारू तंबाखू सगळी व्यसनं लावून घेतली.
कान्हेरे अभियांत्रिकी महाविद्यालय, आजूबाजूचा सगळा परिसर हिरवागार जवळच एक नदी आणि दूरवर नजर टाकली कि एक किल्ला नजरेस पडायचा.समीर मित्रांसोबत बसला कि नेहमी म्हणायचा
"आपल्याला ना साला त्या किल्ल्यावर जायचंय , मस्त सिगारेट चा झुरका मारायचा ,समोर दिसणारा मोकळा परिसर उंच उंच डोंगर बघून...बियर मारायचीय "
मुलं त्याच्यावर हसायचे..... " साल्या जात जाऊ नको वाटेल तिथे, त्या किल्ल्यावर कोणीच जात नाही , ओसाड पडलेला किल्ला आहे तो, भुताटकी बिताटकि असेल तिथे "
लगेच दुसरा मित्र बोलला
" मरशील साल्या कुठेपण जात जाऊ नको "
घंटा वाजली ... मुलं उठून आपापल्या वर्गात जायला निघाले, समीर पण उठला, हातातली सिगारेट जमिनीवर टाकून बुटाने चुरडली ......."मी जाणार साला.." असं बोलून तो पण वर्गात निघून गेला.
शनिवार होता, लेक्चर लवकर संपलं, समीर आपली बाईक घेऊन बाहेर आला, काय डोक्यात सनकी आली, जवळच असलेल्या हायवेवर गेला, बियर शॉपी मधून ५ बियर घेतल्या, सिगारेट ची पाकिटं घेतली , वेफर आणि शेंगदाणे घेतले ...गाडीची दिशा वळवली ....आणि आत्ता त्याच्या नजरे समोर दिसत होता तो घारीगड. असं मानलं जायचं कि त्या किल्ल्यात घारी आणि गिधाडं राहतात, तिकडे सहसा कोणी माणूस फिरकत नसे. समीर ने आपली बाईक खाली बांद्लवाडी गावातच ठेवली, कारण किल्ला उंचावर होता. मित्रांनी नकार दिल्यामुळे रागाच्या भरात इथे तो एकटाच आला. पाठीवर bag घेऊन तो किल्ला चढून वर आला. दुपारचे ३ वाजले. घामाघूम समीर किल्ल्यात आल्यावर षटकोनी आकाराचं एक तलाव त्याला दिसलं, पाणी हिरवं गार, त्याने आजूबाजूला एक नजर फिरवली, किल्ला पार मोडकळीस आलेला, त्या किल्ल्यात वट वागळे उलटी टांगलेली दिसली. गिधाडं घारी असं काही न्हवतं तिथे. एकदम सामसूम वातावरण . वर एक बुरुज दिसला, आपली Bag उचलून तो त्या बुरुजाकडे गेला, समोर अथांग पसरलेला मोकळा परिसर , हिरवं गार माळरान पायथ्याला वसलेलं छोटसं गाव आणि दूरवरून नागमोडी वळण घेत जाणारी नदी. समीर ने बसायला रुमाल टाकला. बुरुजाला अनेक खोल्या बनवल्या होत्या, काही खोल्यांच्या खिडकीतून तोफा बाहेर तोंड करून उभ्या होत्या. एका रिकाम्या खोलीच्या खिडकीत तो बसला. समोरचं वातावरण बघून तो खुश झाला. खिशातून सिगारेट काढून पेटवली आणि डोळे मिटून त्याने एक झुरका मारला. Bag मधून एक बियर बाहेर काढली आणि खिडकीतून समोर बघत ....तो प्यायला लागला .
बघता बघता तो ३ बियर प्यायला आणि कधी झोपला त्यालच समजलं नाही.डोळे उघडले आत्ता अंधार पडलेला .खिशातून मोबाईल काढला आणि बघितलं तर ९ वाजले होते. आत्ता ह्या भयाण काळोखात डोंगर उतरून कसं जायचं.तो खूप नशेत होता धड उभं हि राहता येत न्हवतं, त्याने विचार केला दुसरा मार्ग नाही, काही हरकत नाही
"साला उरलेल्या बियर पिऊन इथेच झोपू...बघू उद्याचं उद्या, आज कि शाम घारीगड के नाम" बाटलीचं बुच उडवलं आणि बाटली लावली तोंडाला. किल्ल्यात गार वारा घोंगावायला लागला होता, वट वागळ चिवचिवाट करत इकडून तिकडे फिरण्याचा आवाज येत होता. मध्येच कुठूनतरी कोल्ह्यांचा आवाज कानावर पडत होता. आत्ता तर पायथ्याला असलेल्या गावातले टीमटीमणारे दिवे पण बंद व्हायला सुरवात झालेली. वातावरण अधिकच भयाण होत चाललं, किल्ल्यात उगवलेली वडाची झाडं आत्ता अधिकच आक्राळ विक्राळ दिसायला लागली ....समीर मनातून घाबरायला लागला. ह्या ओसाड किल्ल्यात काय काय रहस्य दडली असतील देव जाणे.
"त्याने आपल्या २ बियर काढल्या , चिप्स चं पाकीट काढलं आणि गटागटा २ बियर पोटात घातल्या. त्या थंड हवेने बियर ची नशा ह्याच्या डोक्यात झींगली, उभा राहिला आणि जोरात ओरडला
" हुजूर , बंदा आपकी खिदमत में हाजीर है हुजूर, फर्मान दिजीये हुजूर अभी हम गाव में जायेंगे और अनाज कि लुट करवाके वापीस आयेंगे हुजूर "
आणि हसायला लागला ........हा हा हा हा हा हा हा.
त्याच्या हसण्याच्या पाठोपाठ त्या किल्ल्यात दुसरं पण कोणीतरी जोरजोराने हसायला लागलं.समोरच्या तलावातलं पाणी आपोआप आवाज करायला लागलं. आत्ता समीर गप्प बसला, तो एवढ्या नशेत होता कि त्याला वाटलं आपलाच आवाज भिंतींवर आपटून ...बुरुजात घुमतोय. तो शांत झाला तरीपण ते हसणं चालूच होतं. थोड्यावेळाने शांतता पसरली.
"ओये , कौन है उधर,साला सामने आजाव अभी हम अपनी शमशेर निकाल के तुम्हारा सर कलम करते है , सामने आव "
मोडक्या हिंदीत तो ऐतिहासिक डायलॉग मारून पुन्हा हसायला लागला.आत्ता मात्र कोणाचाही हसण्याचा आवाज आला नाही...सर्वत्र शांतता पसरली आणि लटपटत तो पुन्हा खाली बसला. खाली बसताच समोरच्या तुटलेल्या बुरुजावरून मातीचा ढिगारा आणि त्यासोबत मोठमोठाली दगडं त्या तलावात पडली...एकच आवाज व्हायला सुरवात झाली आणि तो आवाज संपूर्ण घारीगडात घुमला. समीर घाबरला. पण उभं राहण्याची त्याच्यात ताकद न्हवती. काहीतरी बडबडत तो खाली बसला आणि पुन्हा झोपुन गेला.
रात्र वाढत गेली, डोळ्यावर चंद्र आला किल्ल्यात चंद्राचा प्रकाश पसरला,भयाण शांतता..........समीर ला स्वप्न पडलं, तो किल्ल्याच्या त्याच बुरुजावर खिडकीत बसलेला दिसला , समोरच्या तालावातून एक घोडेस्वार बाहेर निघाला, एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात चाबूक .....तो घोड्यावर एक एक पायरी चढून समीरच्या जवळ आला, आणि म्हणाला .....
" काय रे हरामखोरा , लाज विकून खाल्लीस काय. तुझ्या बाप जाद्यांनी रक्त सांडून हे किल्ले शाबूत ठेवले, गोरगरिबांचे रक्षण केले आणि तू कसली लुट करणार रे भेकड माणसा "
आपल्याच माणसांचे धान्य लुटून आणायची वार्ता करतोस, चल उठ उभा रहा, किल्ले काय तुझ्या बापजाद्याची जायदाद आहे काय रे , दारू पितोस इथे येऊन आणि एक जोराचा चाबकाचा फटका त्याने समीर च्या पाठीत खेचला "
ताड करून उभा राहिला, पाठ झोंबतच होती, हे खरं होतं कि स्वप्न त्याला कळेना. आत्ता त्याची दारू पार उतरली , डोळे चोळून तो इकडे तिकडे बघायला लागला ....आणि बघतो तर त्याच्या समोर एक माणूस घोड्यावर स्वार होऊन उभा राहिला ...." नामर्दा दारू पितोस , आणि ते हि इथे ह्या ऐतिहासिक किल्ल्यावर ..." पुन्हा चाबकाचा फटका त्याच्या खांद्यावर खेचला गेला......
आत्ता मात्र तो समजून गेला हा खरोखरचा माणूस आहे , तिथून धडपडत पळाला खाली उतरला आणि त्याच्या हाताला एक दगड सापडला, त्याने तो दगड त्या माणसाच्या दिशेने भिरकावला पण दगड त्याच्या हातातून सुटेना.....हे काय होतंय , दगड फेकण्याचा प्रयत्न करतोय पण दगड हाताला चिटकून कसा बसला. चंद्राच्या प्रकाशात तो भला मोठा माणूस आणि त्याचा तो घोडा ह्याला स्पष्ट दिसत होता.खाली वाकला दुसरा दगड उचलणार एवढ्यात त्याच्या पाठीत आणखी एक चाबकाचा फटका बसला ......कळवळला खाली आडवा पडला आणि समोर नजर टाकली तो माणूस तिथेच होता त्या बुरुजावर. समीर ने बाजूला वळून बघितलं तर तसाच एक माणूस ह्याच्या जवळ उभा होता. कोण आहेस कोण तू , मला कशाला मारतोस
" रखवालदार हाय म्या इथला , किल्लेदार सुभानराव " आणि तो माणूस अदृश्य झाला. समीर ताड करून उभा राहिला .
"किल्लेदार ......" समीर तोंडातल्यातोंडात पुटपुटला. हे सगळं विचित्र आहे , हा माणूस नाही ...हे भूत आहे , पण ह्या अंधारात मी जाऊ कुठे, इथून बाहेर कुठून जाऊ ? ..त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं, अंगाला घाम सुटला आणि पायावर अजून एक चाबकाचा फटका बसताच तो जमिनीवर कोसळला...टोल गेलेला समीर खाली गडगडत आला आणि तलावाच्या बाजूलाच पडलेल्या दगडावर आपटला. डोकं धन्न करून दगडावर आपटताच तो जागीच बेशुद्ध पडला. रात्रभर तिथेच पडून राहिला ,
डोळे उघडले सूर्य डोक्यावर होता. उठून बसला , अंगाला माती लागलेली डोक्यावरची जखम दुखायला लागली. डोक्याचं रक्त हाताला लागलेलं.पायात चप्पल न्हवती आणि पाठ झोंबत होती. रात्री घडलेला भुताटकीचा प्रकार डोक्यात वीज पडावी असा चमकला. ताबडतोब उठला आणि तिथून धावत धावत डोंगर उतरून खाली गावात आला. गाडी जवळ आला चावी काढायला हात खिशात घातला पण चावी सापडेना. लक्षात आलं चावी तर Bag मध्ये ठेवलेली, आणि Bag वर किल्ल्यावर ....आत्ता वर जाणार तरी कसं . त्याने गाडीला धक्का मारत मारत त्या गावातून बाहेर आणली, बाहेर हायवेवर आला,जवळच "श्रीकृपा मोटर ग्यारेज " दिसलं....
" एक भाऊगाडीची चावी नाही माझ्याकडे गाडी चालू करून दे "
मेक्यानिक ने ह्याच्याकडे बघितलं, पार मातीत लोळून आल्यासारखा वाटत होता, पायात चप्पल न्हवती आणि शर्ट मागून फाटलेला, मानेवर कसलातरी लाल वळ दिसत होता.
" काय रे गाडी काय चोरीची हाय काय "......."नाही हो माझीच गाडी आहे "
आणि समीर ने आपल्यासोबत घडलेली घटना त्या मेक्यानिक ला सांगितली. ग्यारेज्वाला पण ऐकून थक्क झाला.
"असा प्रकार आज पर्यत ऐकून नाय रायलो बाबा , पयल्यांदाच ऐकून रायलो "
मेक्यानिक ने समीर ला गाडी चालू करून दिली आणि तो पुन्हा आत्याच्या घरी आला....पाठीवर उठलेले वळ बघून आत्या बोलली ..." काय रे सम्या काल रात्रभर कुठे होतास,आणि हे वळ कसले रे,परत मारामारी करून आलास वाटतंय , हे बघ बाबा इथे राहायचं तर व्यवस्थित रहा, नाहीतर जा तुझ्या बपाकडच जाऊन रहा. व्याप नको आमच्या डोक्याला"
" काय बोलावं त्याला समजेना .....अंघोळ करून आला आणि गप्प बसून टी.व्ही.लावून बसला. समोर कार्यक्रम लागला होता " जय मल्हार " डोळ्यासमोर रात्र उभी राहिली, ताबडतोब Channel बदलून त्याने Discovery लावलं.
बोरेय!
बोरेय!
कथा अजून वाचली नाही, वाचून
कथा अजून वाचली नाही, वाचून नक्कीच प्रतिसाद देतो, पण पहिल्याच ओळीने एक शंका मनात आली.
कथा आपलीच आहे का? की त्या फेसबूक पेजवर असलेल्या कथा आपण इथे टाकणार आहात?
बरेचदा अश्या फेसबूक पेजवर मायबोली वा तत्सम संकेतस्थळावरून कथा चोरून चिपकवल्या जातात.
हे आपल्या फेसबूक पेजबद्दल बोलत नाहीये, मात्र असे होते काही पेजेस वर. राग नसावा.
भूतकथेसारखं घाबरावे असे काही
भूतकथेसारखं घाबरावे असे काही वाटले नाही.
किल्ल्यांचे संवर्धन करा, किल्लापरीसरात स्वछता आणि पावित्र्य राखा, नासधूस करू नका .. टाईप सामाजिक संदेश देणारी कथा वाटली.. संदेश पटला
सदरहू पेज व कथा हे मी व माझा
सदरहू पेज व कथा हे मी व माझा मित्र तुषार घाग याचे Co-Creation आहे ,................... !
मी नक्की काय वाचलं.. ह्यात
मी नक्की काय वाचलं.. ह्यात कथा कुठे आहे? असो.... तुमचं जे काही वाचन मी वाचलंय, बरेचदा त्यात मुख्य पात्र तंबाखू, गुटखा, दारू, सिगरेट, बिअर चा खूप सेवन करतो..
चांगले लिहीलय, पण तपशीलात
चांगले लिहीलय, पण तपशीलात अजुन खुलविता आली असती, तुटक तुटक वाटते.
मस्त! हसुन हसुन पोट
मस्त! हसुन हसुन पोट दुखले.
इतके विनोदी लेखन मी तर कधी आयुष्यात वाचले नव्हते.
कर्ते ते एकाद्याला पछाडण्यासाठी रत्नागीरीत भुते भाड्यावर(Rent) अजून मिळतात का हो?
भयंकर चुक्कार...!!
भयंकर चुक्कार...!!
भूतकथेसारखं घाबरावे असे काही
भूतकथेसारखं घाबरावे असे काही वाटले नाही.
कसाबसा १२ वी पास झाला ,आई
कसाबसा १२ वी पास झाला ,आई वडील वैतागले आणि त्याला त्याच्या आत्याकडे पाठवला. तिकडेच त्याने अभियांत्रिकीला प्रवेश घेतला>>>
ते बोल्ड टायपातले शब्द वाचुन आलेला विचार.
च्यामारी सध्या अभियांत्रिकी इतकं स्वस्तं झालंय का?
ते पेज इनएक्सेसिबल आहे. लिंक
ते पेज इनएक्सेसिबल आहे. लिंक चुकलीय का?
https://www.facebook.com/%E0%
https://www.facebook.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9F%E...