प्रेमाचं सीमोल्लघंन - अंतिम भाग

Submitted by अजय चव्हाण on 10 November, 2015 - 12:31

भाग पहिला - www.maayboli.com/node/56229

भाग दुसरा - www.maayboli.com/node/56293

अंतिम भाग.

............................................................................................................................................................................................

बघता बघता दोन वर्षे सरली आता फक्त फायनलचे ईयरचे काही दिवस बाकी होते बास..
तिला प्रपोज करू की नको ह्या धर्मसंकटात मी सापडलो होतो..नकार मिळणार हे माहीत होतचं..तरीही मनाचा हिय्या करून प्रपोज मारायचं मी ठरवलं..

"लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं..
सरळ जाऊन बोलण्यापेक्षा ईझी आणि बेटर असतं.."
संदीप खरे यांनी कवितेत सागितल्याप्रमाणे मी ही लव्ह लेटर लिहायच ठरवलं..

प्रिय नयना,

जेव्हा तु हे लेटर वाचशील तेव्हा नक्कीच तुला अनेक प्रश्न पडतील, धक्काही बसेन पण मी जे काही इथे लिहलं आहे..ते अगदी खरंखुरं आणि माझ्या मनातलं लिहलं आहे ग..

हल्ली तुला बघितल्यावर,
ह्रदयात माझ्या धडधड सुरू होते..
दुर कुठेतरी मनात जणू गिटार वाजे..
सुरही तुझ्याकडे तालही तुझ्याचकडे माझे..
सप्तसूर फूलु दे हे..
मिळू दे ह्रदयाला हे ह्रदय तुझे..
तुझ्या प्रेमात मी..
तुझ्या आठवणीत मी
का गुंतलो मी असा.
फिरवावा कुणी मोरपंख अंगी जसा..
कळेना हे प्रेम कसे..
कधी अलवार तर कधी गुलाबी कोडे जसे..
सांगितले ग तुला आज मी..
मनीचे माझ्या या गुंज..
स्विकार करशील आणि बांधशील का नवे रेशीमबंध..

तुझा विचार करताना शब्द सुचत गेले आणि साकारली ही माझी पहीली कविता..कसं, कधी, कुठे नेमकं मला माहीत नाही पण मी तुझ्या प्रेमात पडलोय..तुझा नकार आणि स्विकार दोन्ही मंजूर आहेत मला..
लव्ह यु..

मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन..

फक्त तुझाच,
हर्ष

लेटर लिहून तर झालंच होतं पण काॅलेजच्या फेअरवेलनंतर तिला देण्याच ठरवलं होतं मी....यथावकाश फेअरवेल संपल..मी तिला कॅटीनमध्ये घेऊन आलो..आज ती खरचं खुप छान दिसत होती..गुलाबी साडी..मस्त वेणी..लाईट मेकअप..गुलाबी लिपस्टिक. . कॅटीनमध्येही आमचं फेअरवेल होतं म्हणून जागोजागी गुलाबी रंगाचे फुगे लावले होते..आणि मी ही आज गुलाबी शर्ट घातला होता..एकूण सारं वातावरणंच गुलाबी...फरफेक्ट टाईम..
मी दोन काॅफी ऑर्डर केल्या..
काय बोलू कशी सुरूवात करू तेच कळत नव्हतं...मी मनातल्या मनात वाक्य जुळवतच होतो ईतक्यातच..

" कोई मुझे छेडे दू ऊसे मैं गाली..
आय अॅम दॅट गर्ल ..बोले दुनिया मुझे मवाली.."

अशी काही विचित्र रिंगटोन असलेला तिचा मोबाईल वाजला..यार ह्या मोबाईलला पण आताच बोंबलयचं होतं..

"हा बोल.."

...................
..................

"नाय रे बोल तु.."

...............
...............

"हलकट नालायक..थोबाड बघितलस का कधी आरशात..
समोर असता तर चपलेने तुडवलं असतं तुला..."

तिने रागाने फोन कट केला..

"काय झालं ??"

मी आश्चर्य होत विचारलं..

तिने जे सांगितलं ते ऐकून तर मला 440 व्होल्टचा धक्काच बसला... मला विश्वासच बसत नव्हता.. माझ्या कानात जुन्या गाण्याचे बोल वाजू लागले

" दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा"

मी असा बसलो होतो जणू काही मला पॅरेलाईज झालाय..
तिला विष्णूने काॅलवर प्रपोज केलं होतं..
काॅलवर प्रपोज केल्यावर ही हालत आहे मी तर समोर प्रपोज करणार होतो मी हळूच टेबलाच्याखाली वाकून बघितलं तिने खुपच हेव्ही सँडल घातली होती.. कुणाला एक जरी पडली ना त्याला दिवसा तारे नक्कीच दिसतील..
मी स्वतःला ईमाजिन करून बघितलं आणि हे मला नक्कीच परवडलं नसतं..
मी ते लेटर माझ्या खिशातून काढून हळूच डायरीत ठेवलं..
आणि तिला अखेरचा अलविदा करत निघून आलो तिच्या आयुष्यातुन कायमचाच..तिने नंतर काॅन्टक ठेवण्याचा प्रयत्न केलाही पण मीच तिला दुर केलं स्वतःपासून.

" मेरी लव्हस्टोरी शुरू होनेसे पहेले खुद मैनेही खत्म की थी"

.........................................................................................
........................................................................................

.........................................................................................................................................................

इतक्यातच पुढचं स्टेशन आलं आणि परत मी आपल्या जागेवर... आता ट्रेनमध्ये गर्दी थोडी वाढली होती..माझ्याजवळच एक बाई आपल्या 5 वर्षाच्या मुलाला समजावत होती पण तो ऐकतच नव्हता.... बहुतेक त्याला खिडकीजवळ बसायचं होतं मी ते पटकन ओळखलं.. त्याला मी माझ्या मांडीवर बसवलं तसा तो खुप खुश झाला..खुप क्युट होता तो... त्यांच हसणं, खिदळणं, त्याचे निरागसं प्रश्न मनाला माझ्या स्पर्श करत होते..खिडकीच्या बाहेर बघण्याचा बहुतेक त्याला कंटाळा आला होता.. तो मी नुकत्याच थर्मास ठेवायला काढलेल्या बॅगेशी खेळू लागला..त्याची आई तिथून त्याला ओरडत होती मग मीच त्यांना असू द्या हो खेळू द्या त्याला असं म्हटल्यावर कुठे त्या शांत झाल्या...
बसून बसून मलाही थोडा कंटाळा आणि थकवाही आला होता म्हणून जरा फ्रेश व्हायला गेलो मी..
जेव्हा परत आलो तेव्हा मी बघितलं की, माझ्या बॅगेची एक झिप खुलीच होती बहुतेक त्या मुलाने खोलली असेल खेळताना त्या मुलाने खोलली असेल असं समजुन मी थोडं दुर्लक्ष केलं.. एव्हाना ट्रेननेही चांगलीच गती पकडली होती..मी झिप बंद करणार इतक्यातच एक जोराचा झटका लागला आणि माझ्या बॅगेतली डायरी उलटी होऊन खाली पडली ती नेमकी ज्वालामुखीच्या पायथ्याशीच..
तिने ती उचलून मला ती परत केली मी ही आभार वैगेरे मानले तिचे..
खरंतरं माझ्या मनात खुप खळबळ माजली होती..
बोलावं का तिच्याशी नाही नको तिने ओळखलं तर ठीक नाहीतर उगाच पचका व्हायचा इतक्या लोकांसमोर असा विचार करून मी त्या लहान मुलाशी खेळू लागलो..खुपच अवघड होत हे माझ्यासाठी, ऑकवर्डही वाटत होतचं पण न बोलणंच योग्य आहे असं समजून मी दुर्लक्ष केलं...
तो मुलगा ही आता माझ्या मांडीवरून उठून मधल्या पॅसेजमध्ये खेळू लागला लहान मुले काय कुठेही रमतात बिचारी कदाचित मोठयाच माणसांना मनात असूनसुद्धा रमता येत नसेल बहुतेक...एव्हाना तो लहान मुलगा खाली पडलेला कागद उचलून त्याच विमान बनवून खेळू लागला.. हातातलं विमान झुऽऽऽ झुऽऽ करत तो खिडकीवरून ज्वालामुखीच्या दिशेने गेला आणि कशालातरी ते विमान घासून त्याची एक घडी मात्र मोडली तसा तो परत बनवायला लागला इतक्यातच ज्वालामुखीचं त्याला म्हणाली दे आण इकडे तो कागद मी तुला मस्त विमान बनवून देते..त्याने कुतूहलाने विमान दिलं....तिने संपूर्ण कागद अगोदर सारखा केला त्या कागदावर काहीतरी लिहलं होत वाटतं तिने पहली ओळ वाचली आणि ती वाचतचं राहीली..
एव्हाना माझ्याही लक्षात आलं होतं हा कागद माझ्याच डायरीतला आहे...माझ्या डायरीत मी खुप कविता, चारोळ्या लिहल्या होत्या त्यातलाच एखादा असेल हा आणि तो ते वाचत असेल तर माझी काहीच हरकत नव्हती म्हणून मी जास्त लक्ष नाही दिले...मी माझ्याच विचारात गढून गेलो होतो..
एका क्षणासाठी वाटलं सांगाव तिला इतके वर्षे साठलेलं मनातलं पण धीर काही होत नव्हता...
ताई काय विमान आपल्याला बनवून देणार नाही असं समजून तो मुलगा माझ्याजवळ आला आणि गेम खेळायला माझ्याकडे मोबाईल मागू लागला..त्याची आई तशी तिकडून ओरडायला लागली पण तो खरंच इतका क्युट होता की त्याला नकारच देऊ शकलो नाही मी..
तेवढ्यात ज्वालामुखीचा मोबाईल वाजला
"आॅखो में तेरी अजबसी अजबसी अदाये है"
ज्वालामुखी किंवा ज्वालामुखीची चाॅईस नक्कीच बदलली होती पण इतकी बदलेलं हे मला स्वप्नातही खरं वाटलं नसतं.. कुठे ती मवालीवाली रिंगटोन आणि कुठे ही मेलोडी रिंगटोन...असो, वाळवंटातसुद्धा फुले फुलतात तर..
तिचा काॅल संपला तसा त्या मुलाने तिचाही मोबाईल मागितला अन् माझा मोबाईल तिच्या हातात दिला..

माझं लक्ष खिडकीच्या बाहेरच होत..हिरवे डोंगर मध्येच कुठेतरी सुर्याफुलांचे शेत, नद्या, कालवे, छोटीशीच पण टुमदार घरे छान वाटत होत सारं.. काहीच वेळात आता 'प्रेमनगर' येणार होतं...
...

माझा मोबाईल जेव्हा मी परत घेतला तेव्हा एका अनोळखी पण ओळखीच्या वाटणार्‍या नंबरवरून मॅसेज आला होता..
तो असा काहीसा असा होता...

हाय हर्ष,

इतकं प्रेम करतोस का रे माझ्यावर..
खरंतर माझंही तुझ्यावर प्रेम होत रे नव्हे, अजूनही आहे फक्त फरक इतकाच होता की, कधी मला कळलंच नाही ते.. जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्ती लांब जातात तेव्हा ते आणखीनच जवळ येतात..असंच काहीस तुझ्याबाबतीत झालं होतं..
मी खूप वेळा तुला संपर्क करायचा प्रयत्न केला पण रिस्पॉन्सच नाही मिळाला तुझ्याकडून...
तु लिहलेलं लेटर योगायोगाने वाचलं मी आणि खरं सांगू खुप छान लिहलं आहेस आवडलं मला ते..बहुतेक देवालाही हेच हव होतं..आणखी एक खुप बदललायस रे तु तुझं लेटर मिळालं नसतं तर मी ओळखलचं नसतं तुला..हॅन्डसम दिसायला लागलायस..
खुप बोलायच आहे तुझ्याशी, ओळख दाखवली नाहीस म्हणून भांडायचही आहे तुझ्याशी..
अॅनिवेय तुला नंतर बघून घेईन मी..
आय लव्ह यु टू

फक्त तूझीच
नयना..

मॅसेज वाचल्यानंतर मी तिच्याकडे बघितलं तीही माझ्याचकडे बघत होती..
आम्ही दोघांनीही स्माईल ऐक्सचेंज केली एव्हाना पुढच स्टेशन आलं होतं
पिवळ्या बॅकग्राऊंड वर
काळ्या मोठ्या अक्षरात 'प्रेमनगर' लिहलं होतं..
मला माझी डेस्टिनी मिळाली आणि तुम्हाला??

समाप्त...

मेरी लव्हस्टोरी शुरू होनेसे पेहलेही खत्म हो चुकी थी..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटची ओळ चुकुन पुन्हा एकदा काॅपी झाली...

त्याबद्दल क्षमस्व..

आणि मा.बो. वर एकदा टाकलेली पोस्ट मोबाईल थ्रु एडीट कशी करायची..

हे कुणी सांगितल्यास फार मदत होईल..

यार अशी स्वप्ने बघण्यात अर्धे आयुष्य गेले. की काहीतरी योगायोगाने चमत्कार वगैरे घडत फिल्मी स्टाईलने एखादी पोरगी पटून जाईल... पण प्रेमात चमत्कार घडत नाहीत तर घडवावे लागतात हे आयुष्याच्या एका टप्प्यावर समजले आणि तिथून माझे कॅरेक्टरच चेंज झाले.

माझ्या जुन्यापुरान्या दिवसात घेऊन गेल्याबद्दल धन्यवाद Happy

मजेदार आहे हा भाग. पण कथा अजुन फुलवली असती तर जास्त आवडली असती. असू दे, पुढच्या लेखनाला शुभेच्छा Happy

मजेदार आहे हा भाग. पण कथा अजुन फुलवली असती तर जास्त आवडली असती. असू दे, पुढच्या लेखनाला शुभेच्छा >>>>>> +१