सहलीबाबत मार्गदर्शन हवे आहे

Submitted by सचिन७३८ on 9 November, 2015 - 05:22

नमस्कार…
आमची सहल दिनांक ०६ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०१५ यादरम्यान खालील ठिकाणी जाणार आहे.

१. सातारा
अ. वाई *
ब. महाबळेश्वर
क. कासपठार

२. कोल्हापूर
अ. महालक्ष्मी मंदिर *
ब. शाहू पॅलेस
क. रंकाळा तलाव
ड. ज्योतिबा

३. सिंधुदुर्ग
अ. आंबोली घाट
ब. सावंतवाडी *
क. देवबाग बीच
ड. तारकर्ली बीच
इ. मालवण, सिंधुदुर्ग किल्ला

४. रत्नागिरी
अ. गणपतीपुळे *
ब. कर्डे बीच
क. असूद-केशवराज-व्याघ्रेश्वर मंदिर
ड. हर्णाई बंदर-सुवर्णदुर्ग किल्ला
इ. आंजर्ले-कड्यावरचा गणपती, व्हाईट सँड बीच
ई. श्रीवर्धन *

५. रायगड
अ. मुरुड जंजिरा किल्ला
ब. रायगड किल्ला

ज्याठिकाणी * अशी खूण केली आहे तिथे आम्ही रात्रमुक्कामी थांबणार आहोत. तरी निवास व भोजनाची सोय वरील ठिकाणी कोठे-कोठे होईल याबाबत जाणकारांनी मार्गदर्शन करावे. आम्ही एकूण ४५ मुले-मुली आहोत. कोंकणात काही ठिकाणी निवासासह घरगुती भोजनाची सोय असते असेही ऐकून आहे. आमची सहल ०६ डिसेंबर रोजी रात्री ०८.०० वाजता निघेल आणि १२ डिसेंबर रोजी सकाळी ०८.०० वाजता परत येणार आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा व्वा, मजा करा.. कोकण म्हणजे. . धमाल..
आमचे घरच सिंधुदूर्ग मध्ये असल्याने बाहेर रहाण्याच्या सोईबाबत काही मदत करू शकत नाही.. Sad

तरी 'सचिन'ने सहलीबाबत मार्गदर्शन मागावं हे नवल आहे. Proud