हायकू सदृश काही कविता - भाग १

Submitted by कविता क्षीरसागर on 4 November, 2015 - 07:55

तुझ्या प्रतीक्षेत पावसात मी चिंब उभी ...

गालावरुन ओघळणारे पाणी
तू पावसाचे कसे समजलास ?? !!!!

एक नाजुक पक्षी
किती सहज उडतोय

आभाळ पाठीवर घेऊन .....

या नाजुक फुलांवर हे थेंब कसले ?
यांच्या कुशीत
कोण असेल रडले ......?!!

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद भरत मयेकर, महेश

महेश हे सर्व माझे हायकू आहेत .
शुद्ध हायकुचे नियम माहित असल्याने मी याला हायकू सदृश कविता म्हटले आहे .