पुण्यात दिवाळीच्या फराळाचे पदार्थ कुठे घ्यावेत?

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2015 - 06:15

२ आणि ३ नोव्हेंबरला पुण्यात येत आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडला उतरणार आहे.
तिथुन सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी दिवाळीच्या फराळाचे पदार्थ मिळण्याची चांगली ठिकाणे कोणती?
चिवडा (घरगुती), भाजणीच्या चकल्या, करंज्या, लाडु, शेव, अनारसे इत्यादि घ्यायचे आहेत. त्या ठिकाणचे अजून प्रसिद्ध पदार्थ सुचवल्यास उत्तमच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१.चितळे बंधु - डेक्कन जिमखाना- वेळ ९-१ आणि ४-७..याआधी (किंवा नंतर) आलात तर शटर उघडले जाणार नाही Wink
(२ तारखेला मिळणार नाही - सोमवार बंद..)
२.चितळे बंधु - बाजीराव रोड - सोमवारी फक्त ९ ते १ ( पदार्थ संपले असले आणि परत येणार नसले तर स्पष्ट पाटी लावतात).
३.काका हलवाई - मंडई
४.खाउवाले पाटणकर
(रिक्षा करुन शनिपाराजवळ उतरायचे..तिथे २,३,४ जवळ जवळ आहेत. तिथेच देसाई बंधु आंबेवाले यांचे पण दुकान आहे तिथेही मिळतील).
फर्ग्युसन रोडवरुन डेक्कन जिमखान्याला (१) साठी चालतही जाउ शकता.

इथे दिलेल्या माहितीवरून

http://www.khawakee.com/products_marathi.html

हेही मायबोलीकरच आहेत. तर तुम्ही समस्त (त्यांच्याव्यतिरिक्त अन्य सर्व Wink ) मायबोलीकरांच्या वतीने जरा चव आणि अनुभव घेऊन पहा.

पूर्वी इंदिरा कम्युनिटी किचन मधे स्वस्तात मिळायचे आणि चांगला दर्जा होता. चितळेंकडचे पदार्थ घेऊ नका. ते स्वतः बनवत नाहीत.

मार्केट यार्ड, भवानी पेठ इथल्या व्यापा-यांतर्फे दिवाळीचे पदार्थ बनवले जातात. ना नफा ना तोटा तत्त्वावर गेली अनेक वर्षे उपक्रम चालू आहे. स्वच्छता राखली जाते. अनेक गरजूंना रोजगार उपलब्ध होतो. पैशांची बचत होते आणि पदार्थही चांगले असतात. भवानी पेठेत चौकशी करा.

mansmi18, भरत मयेकर, सुनियाद, mi_anu धन्यवाद सगळ्यांना

mansmi18: छान विस्तृत माहिती दिलीत.

भरत मयेकर: इन्टरेस्टिंग माहिती. महर्षी नगर किती लांब आहे डेक्कन पासून अथवा NCL पासून (NCL ला जायचेय सोमवारी).

सुनियाद, छान माहिती.

mi_anu : कुठे आहे टाटा मोटर्स गृहिणी यांचे आउटलेट? पिं/चिं ला तर नाही ना? जाणे जमणार नाही या ट्रिप मध्ये.

मानव, त्यांचे मुख्यपृष्ठ वाचा. पुण्यात कुठेही होम डिलिव्हरी आहे म्हणे. फोन नंबर आणि इमेलही दिलेत. तुम्ही स्वतःच अधिक माहिती काढू शकाल.

निवेदीता वाळींबे
nivulifeisthebest@gmail.com

9970329528

या देखील फराळाची ऑर्डर घेतात. त्या पुण्यात रहातात

चितळेंकडचे पदार्थ घेऊ नका. ते स्वतः बनवत नाहीत.
>>
जर त्यांना विकतचाच फराळ घ्यायचा आहे तर चितळ्यांनी स्वता बनवलेला असो वा आणखी कुठून विकत आणला असो, काय फरक पडतोय Happy

@ धागा मदत,
मी पुण्यातला नाही, पण मुंबईला येणे होणे असेल तर घरीच या फराळाला Happy

आज आत्ता परतलो कामावरुन. त्यामुळे खरेदीसाठी जाणे झाले नाही.
पण डेक्कनचे चितळेंचे दुकान खुपच जवळ आहे. उद्या सकाळी तिथुनच खरेदी करेन.

डेक्कनलाच चितळे, काका हलवाई इथे खरेदी केली.
पण वरील दिलेल्या ऑप्शन्स मधुन ऑर्डरवर बनवून देणारे खावाकी / वाळिंबे यांच्या कडुन चांगले पदार्थ मिळतील असे लक्षात आले. पुढल्या खेपेला त्यांच्या कडील काही पदार्थ ट्राय करीन.
माहिती बद्दल सगळ्यांचे आभार.

जर त्यांना विकतचाच फराळ घ्यायचा आहे तर चितळ्यांनी स्वता बनवलेला असो वा आणखी कुठून विकत आणला असो, काय फरक पडतोय >> Lol