सोशल नेटवर्किंग (भाग ६)

Submitted by लाडू on 31 October, 2015 - 06:04

भाग १: http://www.maayboli.com/node/56176

भाग २: http://www.maayboli.com/node/56188

भाग ३: http://www.maayboli.com/node/56200

भाग ४: http://www.maayboli.com/node/56221

भाग ५: http://www.maayboli.com/node/56234

हल्लीच अंधेरी-विलेपार्ले भागात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित कथा. पण सर्व पात्रे काल्पनिक आहेत
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'sorry पण सध्या मी इथे नसणार आहे दोन महिने. एका कामासाठी जर्मनीला जातोय परवा. परत आल्यावर बोलूच. see you.'मल्हारचा हा असा मेसेज सिद्धांतला अनपेक्षित होता. त्याने फक्त दोन शक्यता गृहीत धरल्या होत्या. एकतर हो किवा नाही. पण आता मल्हारला भेटण्यासाठी दोन महिने वाट पहावी लागणार होती. या एकूण प्रकरणातच काहीतरी प्रोब्लेम आहे असे सिद्धांतला वाटत होते. इथे मयंकही गाल फुगवून बसला होता. त्याचे चित्त थाऱ्यावर आणणे गरजेचे होते. त्याने कॉम्पुटर लावला. आणि मयंकला हल्लीच store केलेले नवनवीन wallpaper दाखवू लागला.

हा सिद्धांतचा छंद होता. देशविदेशांमधील वेगवेगळे फोटो शोधण, आणि कॉम्पुटरचा wallpaper म्हणून रोज वापरणं. वाटत तितकं सोप्प नव्हत ते. त्यासाठी सिद्धांत तासतास इंटरनेटवर घालवत असे. कोणीच न पाहिलेले, थोडे unique म्हणता येतील असे फोटो जमवण म्हणजे वेडेपणा होता. पण असेच wallpaper सिद्धांतच्या कॉम्पुटर आणि मोबाईल वर असत. पूर्ण जगातले असे नवखे पण उत्कृष्ट फोटोग्राफर त्यामुळेच सिद्धांतच्या फ्रेंडलिस्ट मध्ये होते. या छंदामुळे कधीही भारताबाहेर न गेलेल्या सिद्धांतला पूर्ण जगातल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती तर होतीच. पण बऱ्याच न पाहिलेल्या उत्कुष्ट लोकेशन्सची माहिती अगदी तोंडपाठ होती.

आणि हे फोटो खरच एवढे सुंदर होते कि कितीही म्हटलं तरी मयंक बाकी सगळ विसरून फोटो पाहू लागला. अचानक एका फोटोने मयंकचे लक्ष वेधून घेतले. हा फोटो याआधी पाहिल्याचे त्याला आठवत होते. "सिद्धांत थांब. तो फोटो मी पाहिलाय आधी. पुन्हा दाखव" यावर सिद्धांतने वाद घातला नसता तर कदाचित काही झालं नसत. पण सिद्धांत हे मान्य करण शक्यच नव्हत कि हा फोटो मयंक आधी पाहू शकतो. ज्या फोटो बद्दल मयंक म्हणत होता तो सिद्धांतच्या एका facebook फ्रेंडने काढला होता. केल्विन त्याचं नाव. तो न्यूझीलंडचा फोटोग्राफर होता. आणि हा फोटो त्याच्या instagram अकाऊंट वरून सिद्धांतने घेतला होता. तो मयंकने पाहण अशक्य होत. त्यावरूनच त्यांचा वाद चालू झाला. अचानक मयंकला आठवलं हा फोटो मल्हारच्या profile मध्ये पहिला होता. आणि तो फोटो न्यूझीलंडचा नसून गोव्याचा होता. दोघेही एकमेकांच ऐकायला तयार नव्हते.

शेवटी सिद्धांतने मयंकला एक app दाखवलं. ज्यामध्ये इंटरनेटवर जगभरातून कुठेही अपलोड केलेल्या फोटोचे डीटेल्स मिळू शकतात. तो फोटो सगळ्यात आधी कुठून कोणी आणिक कुठल्या साईट वर अपलोड केला गेला हे सगळचं. आणि त्या app मध्ये तो फोटो सर्च केला. फोटोचे app वरून मिळालेले डीटेल्स सिद्धांतच्या बाजूने निकाल देत होते.
नेम: केल्विन
अपलोडेड फ्रॉम: न्यूझीलंड
लोकेशन: साउथ आईसलंड वेस्ट कोस्ट
time: 5/12/2013 - 6 .03 PM
मयंक थक्क होऊन पाहत राहिला. "सिद्धांत, म्हणजे जर हे app खरोखर काम करत असेल तर... ", सिद्धांत त्याच्याकडे शांतपणे पाहत म्हणाला, " ...तर मल्हारने हा फोटो चोरला आहे. आणि हे app बरोबरच काम करत. मी स्वत: अनेक वेळा टेस्ट केलय." मयंकला चोरी वैगरे शब्द जरा विचित्रच वाटला. तसे त्याने बोलून दाखवताच सिद्धांतने पुढे म्हटले,

"हे बघ मयंक, मल्हारने जर हा फोटो स्वत:च्या नावावर अपलोड केलाय तर हा गुन्हा आहे. तुला खोट वाटत असेल तर त्याआधी तुला फोटोग्राफीचे काही आंतरराष्ट्रीय नियम सांगतो

१) कोणीही व्यक्ती ज्या क्षणी एखादा फोटो काढते त्या क्षणी त्या फोटोचे मालकीहक्क (copyrights) त्या व्यक्तीला मिळतात. त्यासाठी कुठेही register करायची किंवा कुठलाही form भरायची गरज नसते.
२) आपण काढलेल्या फोटोचे copyrights आपण कोणालाही विकू शकतो किवा देऊ शकतो. आणि जगातील सर्वच व्यावसायिक फोटोग्राफर्स अशाच प्रकारे पैसा मिळवतात.
३) जरी एखादा फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर प्रसिध्द झाला असेल तरी त्याचे copyrights फोटोग्राफरकडे सुरक्षित असतात. त्याच्या पुर्वपरवानागीशिवाय कोणीही तो फोटो वापरल्यास cyber crime चे सगळे नियम तिथे लागू होतात.
४) फोटोचे राईट्स फोटोग्राफरकडून घेतले असतील तरी त्याचा type महत्वाचा ठरतो. या प्रकारामध्ये मूळ फोटोग्राफरचे नाव क्रेडिट्स मध्ये नमूद करणे आवश्यक ठरते.

म्हणजे कळतंय का तुला? मल्हारने काय काय नियम धाब्यावर बसवलेयत? आपण कितीही मोठा फोटोग्राफर असलो न तरी जोपर्यंत दुसऱ्याच्या फोटोचा आदर करत नाही तोपर्यंत आपण हाडाचा फोटोग्राफर नाहीच. याने तर दुसऱ्याचे फोटो क्रेडीट न देता स्वत:च्या नावाने अपलोड केलेत. याला मी तरी चोरीच म्हणतो. आता केल्विनने ठरवलं तर मल्हारवर कायदेशीर कारवाईही होऊ शकते पण व्यावसायिक फोटोग्राफर नाहीये केल्विन. त्यामुळे हे थोडं कठीण आहे. तो आपला वेळ आणि पैसा या मल्हारमागे घालवणार नाही. आणि मला एक कळत नाही, एवढ सगळ सुरळीत चालू असताना, स्वत:च करीअर सेट असताना मल्हारला ही दुर्बुद्धी का झाली असावी?" मयंकपण आता हाच विचार करत होता. मल्हारने काढलेले अनेक सुंदर सुंदर फोटो त्याने पाहिले होते. ते ही त्याने काढलेत कशावरून? आपण हे शोधायचंच आज अस ठरून त्याने सिद्धांतकडून ते app घेतले. आणि तो घरी जायला निघाला.

घरी आल्यावर सगळ्यात आधी त्याने काय केले असेल तर मल्हारची profile पाहिली. आता एक लेटेस्ट अपलोड होता तो मल्हारच्या पासपोर्टचा फोटो, आणि सोबत जर्मनीच तिकीट वैगरे. मल्हार आपल्याला भेटण टाळतोय म्हणून हे जर्मनी वैगरे नाटक आहे अस मयंकला वाटल होत. पण आता ती शंका दूर झाली. तो खरच जर्मनीला जात होता. मल्हारने काढलेले खूप सारे फोटो मयंकने मोबाईल वर सेव्ह केले. शिवाय टेस्टिंग साठी स्वत: काढलेले आणि facebook वर असलेले फोटोसुद्धा घेऊन ठेवले. दोनच दिवसांनी खरच सहार इंटरनेशनल एअरपोर्ट वरून मल्हार ने facebook वर चेक इन केले तेव्हा तो खोट बोलत असण्याच्या उरल्या सुरल्या आशाही संपल्या. आता मल्हारला भेटायला दोन महिने वाट पाहायला लागणार होती. अनघाशी याबद्दल बोलायला हव होत आणि श्रावणीशी सुद्धा. इतका खोटारडा माणूस आणि या मुली कसा विश्वास ठेऊ शकतात त्याच्यावर. त्याने अनघाला लगेच call केला आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. सिद्धान्तने दिलेलं app आणि फोटोग्राफीच्या नियमांबद्दलही. पण अनघाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. जणू काही हे तिला आधीच माहित होत. असेलही. मल्हारने तिला प्रपोज केलं असेल तर हेही सांगितल असेल याचा विचार आपण आधी करायला हवा होता. पुन्हा एकदा स्वत:वर चरफडत मयंक सोफ्यावर बसला. पण त्याला अनघाची एवढी काळजी नव्हती जेवढी श्रावणीची होती. त्याने facebookवरून श्रावणीला पुन्हा एकदा मेसेज करायचं ठरवलं आणि हे सगळ प्रकरण तो तिला सांगणार होता, तिने आपला कितीही अपमान केला तरी चालेल पण तिला कळल पाहिजे हे सगळ, अस म्हणतच मयंकने facebook लॉग इन केले.

क्रमश:

भाग ७ http://www.maayboli.com/node/56264

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय काय होणार काय जाणे पुढे. . कठीणे या पोरांचे.. एकंदर नव्या पिढीचे.>>> उद्या सगळ्यांचा निकाल लावायचा विचार आहे Happy

उद्या सगळ्यांचा निकाल लावायचा विचार आहे स्मित >> ये ब्बात!

थोडे मोठे भाग टाक म्हणुन सांगणारच होते तितक्यात तुझा प्रतिसाद आला.
खुप मस्त चालली आहे कथा.

बरं. पोरीने वाचावे असे वाटतेय ही कथा. पण मराठी इतक सारे वाचायचे पेशन्स नाहीत तिच्यात.>> समदुखी खूप आहेत. वर इंग्रजीमध्ये का नाही लिहिलीस हा आरोपच माझ्यावर. विचार करतेय भाषांतराचा

वाचले सहाही भाग .. आता एकाच भागात निकाल लावणार म्हणजे नक्की काय याची उत्सुकता लागलीय..

अवांतर - नावे आवडली कथेतील

धन्यवाद ऋन्मेऽऽष आज निकाल लावायचा प्रयत्न केलाय. पण दिवाळीच्या आधीचा रविवार असल्यामुळे सगळच जमल नाही. अजून एक भाग येईल त्यामुळे. 
तुम्ही लिहिलेल्या अवांतर साठी धन्यवाद म्हणणार नाही आणि कारण उद्याच्या भागात सांगेन 