सरदार वल्लभभाई पटेल - भावपूर्ण आदरांजली

Submitted by नीलम बुचडे on 31 October, 2015 - 02:31

सरदार वल्लभभाई पटेल
(३१ ओक्टोबर १८७५ - १५ डिसेम्बर १९५०)

भारताचे एक राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना सरदार ह्या पदवीने संबोधित केले जाई.वल्लभभाई पटेलपेशाने वकील होते. वकिली करीत असताना तेमहात्मा गांधीच्याप्रभावाखाली आले.गुजरातच्याखेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले.भारत छोडो आंदोलनातते आघाडीवर होते.वल्लभभाई पटेलहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणिपंजाबवदिल्लीयेथे राहणार्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली. म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात.सरदार पटेलहे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोहपुरुष, स्वतंत्र हिंदुस्थानच्या लोकशाहीवादी भारताच्या निर्मितीमागिल सिद्धहस्त, सोरटीसोमनाथ मंदिराच्या जिर्णोद्धारामागिल तत्वज्ञ, मुक्त व्यापार व खाजगी मालकी हक्काचे समर्थनामार्फत देशावर येऊ घातलेली कम्युनिस्ट/समाजवादी विचारप्रणाली थोपवू पहाणारा विचारवंत अशा सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीदिनानिमित्त सादर प्रणाम-अभिवादन.

आज भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांचाही स्मृतीदिन आहे.. त्यांना संपूर्ण मायबोली परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली..

इंदिराबाईंकरता स्वतंत्र धागा काढा की... Happy
तरीही, आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

कणखर व्यक्तिमत्व, खंबीरता, व पक्षांतर्गत विरोधकांवर चपखलपणे मात करीत अत्यंत दु:ष्काळाच्या व राजकीय गोंधळाच्या परिस्थितीत सत्तेवर आलेल्या, कम्युनिझमला सत्तेपासुन दूर ठेवण्याचा पराकोटिचा प्रयत्न केलेल्या, १९७२ च्या पाकविरुद्धच्या युद्धातील विजयी भारताच्या नेत्या व पंतप्रधान, श्रीमती इंदिरा गांधी यांना स्मृतिदिनाबद्दल आदरांजलि.

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली!!

*******************************************************
काडी टाकली असे वाटल्याने संपादित केलेले विधान

सरदार पटेलांना त्यांच्या जन्मदिनी अभिवादन.
इंदिरा गांधींना त्यांच्या हौतात्म्यदिनी आदरांजली.

वरचा मजकूर इथून (अनुक्रमांक २५) घेतला आहे का?

इंदिरा गांधीनबद्दल मला कायम आदर वाटलाय आणि कायम वाटत राहील. आजच्या दिनी त्याना आदरांजली.

सरदार पटेलांनाही आदरांजली. स्वतंत्र भारतातली संस्थाने त्यांनी समर्थपणे भारतात विलीन केली.

इंदिरा गांधीनबद्दल मला कायम आदर वाटलाय आणि कायम वाटत राहील. +१

सरदार वल्लभभाई पटेलांना आदरांजली.

इंदिरा गांधी आणि वल्लभ भाई पटेलांकडे एक समान गुण होता. त्यांना पटलेली गोष्ट ते फारशी चर्चा न करता योग्य त्या मार्गाने कार्यांन्वीत करुन टाकायचे.

वरील मजकूर विकीपीडीया वरून घेतला आहे...
श्री. डोंगरेंचा ब्लॉग आताच बघितला. खूप वाचनीय माहिती आहे तिथे. आवडला..

भारताचे पहिले गृहमंत्री - जे पंतप्रधान झाले असते तर..... - वल्लभभाई पटेल आणि खुद्द बाळासाहेब ठाकर्‍यांनी रणरागिणी दुर्गा म्हणून ज्यांना गौरवले त्या पंतप्रधान इंदिरा गांधींना विनम्र अभिवादन!

श्री. विजय टी सर.. आपल्या देशाच्या इतिहासातील या थोर व्यक्तिमत्वांना आदरांजली देणे एवढाच उद्देश होता.
मी कोणतीही कथा प्रसिद्ध केलेली नाही..