घोडा/घोडी पाळणे बाबत....

Submitted by limbutimbu on 31 October, 2015 - 00:14

घोडा /घोडी विकत घेणे मनास येते आहे....
कोणकोणत्या जातीचे घोडे उपलब्ध असतात?
कुठे मिळतील? किती किंमतीपर्यंत?
रेसचे रिटायर्ड घोडे कसे मिळवायचे?
घोड्यांचे खाणे /खुराक काय असतो?
क्रुपया घोड्यांच्या पालनाविषयी माहिती हवी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबू,
थेरपी हॉर्सचा विचार केला आहे का? तुमच्याकडे जागा आहे तेव्हा असे काही करता आले तर घोडा पाळायची तुमची हौस पूर्ण होईल आणि जोडीला एक सेवा पुरवता येईल.

आमच्या इथे बरीच मुलं ४-एच चा हॉर्स करीक्युलम करतात. घोड्याची सगळी काळजी घ्यायला शिकतात, जोडीला शोमनशिप, लीडरशीप वगैरे. एकदा आवड रुजली कायम साथ देते.

कालच माझी एक हॉर्स राइडर मैत्रीण सांगत होती की कुत्रा जेव्हढा माणसाला जीव लावतो तसा घोड़ा लावत नाही. तिच्याकडे १०० एकर जमीन आहे आणि ४ घोड़े. मेंढ्या पण असाव्यात.
ती आणि तिचा नवरा हॉर्स राइडिंग च्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असतात.
धाग्याचे शीर्षक आणि लेखकुचे नांव यांची सांगड न बसल्याने नाव दोन वेळा वाचुन खात्री करून घेतली Wink असे प्रश्न सहसा लिंबुभाऊँना पड़त नाहीत...

रॉहू, तुमच्या पहिल्याच पोस्टमध्ये मस्तानीचा उल्लेखही नाही. अशाने घोड्याला राग येईल हां. Wink

घोडी पाळणे बाबत : घोडी हा शब्द घोडा चे अनेकवचन म्हणून वापरला आहे, की स्त्रीलिंग म्हणून?

लिंबूराम, तुम्ही थोडा गोवंश पाळा पाहू. घोडाबिडा ठेवायचे तामसी विचार का मनात यायला लागलेत? बाकी आमच्या बंबैय्या मराठीत घोडा म्हणजे (गावठी) बंदूक.

बाकी आमच्या बंबैय्या मराठीत घोडा म्हणजे (गावठी) बंदूक.
>>
अगदी हेच लिहायला आलो होतो.
एवढेच नव्हे तर याबाबत मदत हवी असल्यास कळवा Happy

घोडा पाळायचा आहे की घोडी हे पण आधीच ठरवा.
वर्णाश्रमाप्रमाणे घोड्यांच्या किंमती पण कमी अधिक असाव्यात. व्रतवैकल्याचा घोडा, मांसाहारी घोडा, बीफ खाणारा घोडा, कवायतीचा घोडा, फिरंगी घोडा, बारा गावचा पाणी पिलेला घोडा असे घोड्यांचे अनेक प्रकार आहेत.

घोडा/घोडी पाळायचं म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे आधी नक्की करा म्हणजे अचूक माहीती पुरवता येईल.

तुम्हाला म्हणून ही विशेष टीप.
जोशी आडनावाचा घोडा पाळू नका. तो रात्री बेरात्री आउट डेटेड जोक्स मारून तुम्हाला पकवत बसेल. आचार्य अत्र्यांचा इसवीसन पूर्व आडनावातलं पहिलं अक्षर गाळण्याचा जोक सांगून चारही पाय वर करून जमिनीवर लोळण घेईल आणि हा जोक आजही फिट आहे असं सांगेल.

मग वैतागून तुम्ही त्यालाही त्याच्या आडनावावर हा प्रयोग करून बघायला सांगाल, त्याच क्षणी ते रेकायला लागेल. तुम्ही कन्फ्युज व्हालच शिवाय लोळण घेताना घोडा बसल्यावर त्याचं करायचं काय हा प्रश्नही उभा राहील. तेव्हां ती रिस्क नकाच घेऊ.

लिंब्या आमचे एक (तुमचे आडनावबंधु) नातेवाईक आहेत त्यांच्याकडे होता घोडा. गावात धर्मचैतन्यमधे रहात होते. Happy

प्रतिसादाबद्दल सगळ्यांना धन्यवाद.
स्वाती२, तुमची सुचना लक्षात ठेवतो.

>>> मी घोडा होऊन राहिलो तर पगार देणार काय ? <<<<
मोगा, सध्याचा हापिसात अन घरात "गर्दभ अर्थात ओझ्याचा गाढव वा छोटा हत्ती" बनुन रहायच्या ड्युटीचा कंटाळा आलाय का? Proud

वत्सला, मला बरेच प्रश्न पडतात, सगळेच इथे विचारतो असे नाही. Happy
दीडमा, घोडी हा शब्द स्त्रीलिंगी म्हणूनच वापरला आहे. गोवंश तर पाळणारच आहे.
बाकी बैम्बैय्या मराठीतील "घोडा" पाळण्यासारखे दिवस पूर्वीही नव्हते, आत्ताही नाहीत, अहो साधी धुणे वाळत घालायची काठी घरात असेल तरी "संघाची काठी/दंड" हे हत्यार असे ठरवुन संघस्वयंसेवक म्हणुन पकडून न्यायचे ते दहशतीचे दिवस पाहिलेत आम्ही, असले बैम्बैय्या घोडे कुठले पाळणार? त्यापेक्षा "आम्हाघरी धन शब्दाचीच शस्त्रे" ही उक्ति लक्षात ठेवुन आशिर्वाद किंवा शाप देण्याच्या मंत्रांना सिद्ध करत असतो झाले..! Proud

कान्द्या, बरोबर. Happy

शाप देण्याच्या मंत्रांना सिद्ध करत असतो झाले..! >> सिद्ध झाला की सांगा लिंबुजी. लखवी/अजहर मसूद/दाऊद यांना शाप देण्यात मज्जा येईल. Wink Light 1

>>>>> सिद्ध झाला की सांगा लिंबुजी. लखवी/अजहर मसूद/दाऊद यांना शाप देण्यात मज्जा येईल. <<<<<
नै रे भो..... शाप द्यायचा झाला तरी समोरची व्यक्ति "तितक्याच लायाकीची / तोलामोलाची " असावि लागते Proud

असल्यांकरता फक्त शुभंकरोतीच्या वेळेस "शत्रुबुद्धि विनाशाय" अशी प्रार्थना करणे उचित ठरते, (पुरेसे नै ठरत, मग अस्तोच नाठाळाचे माथीचा ठेका.. ) . Wink

Pune RTO च्या शेजारच्या SSPMS शाळेत हॉर्स रायडींग चा बेसिक कोर्स शिकवतात. त्यांचीच पागा पण आहे. तिथे सगळी इत्यंभुत माहीती मिळेल.

हो. तिच शाळ. विमान अजुन हि आहे. माझ्या मुलासाठी मी चौकशी करायला जाणार होतो पण वयाची अट १२ वर्ष अशी कळाल्याने नाही गेलो.

Pages