प्रेमाचं सीमोलघ्घंन - भाग पहिला..

Submitted by अजय चव्हाण on 29 October, 2015 - 11:59

नमस्कार प्रिय वाचकमित्रांनो,

मायबोलीवर पहिल्यांदाच लिहतोय..
मी नेहमीच ह्या साईटवर पाहुणा म्हणून यायचो...वाचायचो...
कळत नकळत गुंतत गेलो ह्या मोहजंजाळात...इथल्या मसालेदार, तिखट, गोड, आंबट, तुरट, कडू अशा सार्याच लेखमेजवान्याचा भरपेट आस्वाद घेतलाय...
आता नेहमीच पाहुण्यासारख चोरून चोरून मेजवान्याचा आस्वाद घेणं बरं नव्हे....
म्हणून मी ही काही मेजवान्या द्यायचं ठरवलयं..
तुम्हाला आवडेल अशी आशा करतो..

(शुध्दलेखनात काही चुका आढळल्यास क्षमस्व)

........................................................................................................................................................................

आजचं वातावरण खूप छान आहे.. सकाळची प्रसन्न वेळ... .
गोड गुलाबी थंडी...वाफाळत्या चहाचा मंद सुवास..दुर कुठूनतरी येणारा रेडिओचा आवाज आणि अशातच दाट धूक्क्यांतून अलगद धावत येणारी ट्रेन हळू हळू होत प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली..आज माहीत नाही का ते पण मनात एक प्रकारची हुरहुर वाढत होती..नक्कीच काहीतरी चांगले घडणार आहे आज...हा प्रवास नुसता प्रवास नसून जणू काही माझ्या आयुष्याचाच प्रवास आहे..
इतक्यातच रेल्वेची अनाऊसंमेंट झाली.

" कृपया यात्री ध्यान दे..प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पर आई हुई दिली- मुंबई राजधानी एक्सप्रेस, थोडेही देर में रवाना होगी यात्रीयोंसे निवेदन है के वे अपने जगहपर बैठ जाए.."

अनाऊसंमेंट झाली तशी मी ट्रेनमध्ये चढलो..ट्रेन सुरू झाली..हळू हळू होत प्लॅटफॉर्मला बाय करत..
सर्वकाही मागे सरत गेलं..
पेपरवाले, फेरीवाले यांचे आवाज ट्रेनमध्ये गुंजू लागले आणि मी माझी सीट शोधत होतो..
हुश्श. .फायनली माझी सीट मिळाली मला..माझं सामान वैगेरे व्यवस्थित ठेवून एकदाच बसलो मी..
माझ्या समोरची सीट तशी रिकामीच होती बहुतेक पुढच्या स्टेशनवर कुणीतरी येणार असेलं?? असो..मी बॅगेतून काॅफी मग आणि थर्मास काढला.. मगामध्ये थोडी काॅफी घेऊन मी पेपर वाचू लागलो..
" आजचा आपला दिवस शुभ राहीलं..दुरचा प्रवास घडण्याची दाट शक्‍यता नाकारता येत नाही.. धक्कादायक घटना घडू शकतात.."
माझं राशीभविष्य वाचून झाल्यावर मी दुसर्‍या पानावरच्या बातम्या वाचू लागलो...मी वाचनात इतका मग्न होतो की, कधी दुसरं स्टेशन आलं हे कळलंच नाही...धकाबुक्की , ओरडण्याचे आवाज.. सगळेच जणू काही इरेलाच पेटले होते..सगळ्यांनाच घाई होती.. ऑलिंपिकची रेसच जणू..रेसकडे दुर्लक्ष करत मी पुन्हा एकदा वाचू लागलो..कपात अजून थोडी काॅफी शिल्लक होती...
मी वाचनात इतका मग्न झालो होतो की, कुणीतरी येऊन मला काहीतरी विचारत होतं पण मला काही ऐकूच आलं नाही त्यांनी परत विचारल्यावर
120 च्या स्पीडने त्यांचे शब्द माझ्या कानात फिरू लागले...
" एक्सुज मी?? दिस इज अ सिट नं 55 राईट??
मी त्यांना न बघताच समोरच्या सिटकडे इशारा केला आणि काल झालेल्या मॅचची बातमी वाचू लागलो..
भारतचा कांगारूकडून
(ऑस्ट्रिलियाकडून) 20 धावांनी पराभव झाला होता..त्या काॅलमच्या लेखकाने भारताचा पराभव होण्यामागच नेमक कारण आणि त्याच एक्सप्लेनशन असं काही तिखटमीठ लावून लिहलं होतं जणू काही त्याने याविषयी पी. एच. डीच केलीय....

खूपच कंटाळा येऊ लागला होता..मी पेपर तसाच फोल्ड करून जवळ जवळ बॅगेत कोंबलाच..कपात अजूनही थोडी थंड झालेली काॅफी बाकी होती..
अचानक माझी नजर समोर गेली..समोर एक व्हाईट- लव्हेंडर पंजाबी सूट घालून मुलगी बसली होती..तिला पाहताच चाट पडलो..मला इतका धक्का बसला होता की, काॅफी माझ्या गुलाबी शर्टावर सांडली..विश्वास ठेवा अगर नका ठेवू पण तो काॅफीचा डाग तंतोतंत एका तुटलेल्या ह्रदयाच्या आकारासारखा वाटत होता..मी रूमालाने पुसण्याचा त्याला प्रयत्न केला पण छे सारे व्यर्थ... तुटलेल्या ह्रदयाची काच आणि हा डाग बहुतेक कधीच साफ नाही होउ शकतं..माझी नजर अजूनही माझ्या मेंदूच न ऐकता तिलाच पाहत होती..
तिने बहुतेक ओळखलं नव्हते मला..
ओळखणार तरी कशी मला ती? तेव्हा मी किती बारीक होतो..नाकावर चश्मा आणि राहणीमानही एकदम गबाळ्यासारखं..
आता खूप बदललो होतो मी..
दिल्लीची हवा मला चांगलीच लागली होती..जाडा नाही पण खात्यापित्या घरचा जरूर वाटत होतो..नाकावरच्या चश्मयाची जागा आता लेन्सने घेतली होती..रंगही थोडा उजळला होता...
तिने मला ओळखलं नाही ह्यात त्या बिचारीची काय चुक??
आणि अचानक मी फ्लॅशबॅकमध्ये शिरलो..

8 वर्षापूर्वी....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

" कृपया यात्री ध्यान दे..प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पर आई हुई दिली- मुंबई राजधानी एक्सप्रेस, थोडेही देर में रवाना होगी यात्रीयोंसे निवेदन है के वे अपने जगहपर बैठ जाए.."

>>>>

राजधानी दिल्लीतून पकडली होती का?
दिल्लीत राजधानी कधीच १ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येत नाही. इन फॅक्ट मुंबई ते दिल्लीतल्या कोणत्याच स्टेशनवर ती १ नंबर प्लॅटफॉर्मला लागत नाही. निजामुद्दीनहून ऑगस्ट क्रांती पकडलीत असं गृहीत धरलं तरी ती देखील १ नंबर प्लॅटफॉर्मला येत नाही (बडोदा सोडून).

दुसरं स्टेशन आलं हे कळलंच नाही...धकाबुक्की , ओरडण्याचे आवाज.. सगळेच जणू काही इरेलाच पेटले होते..सगळ्यांनाच घाई होती.. ऑलिंपिकची रेसच जणू..रेसकडे दुर्लक्ष करत मी पुन्हा एकदा वाचू लागलो..कपात अजून थोडी काॅफी शिल्लक होती...
>>>>>>>

राजधानी होती का ऑगस्ट क्रांती?

राजधानी दिल्लीहून सुटली की थेट कोट्याला थांबते ती साडेचार तासांनी. एवढा वेळ तुम्ही पेपर वाचत होतात का?
अगदी ऑगस्ट क्रांती धरली तरी निजामुद्दीनहून सुटल्यावर मथुरा गाठायला तिला दीड तास लागतो कमीत कमी.
अगदी निजामुद्दीन त्रिवेंद्रम राजधानीही थेट मथुरेलाच थांबते.

इतका वेळ पेपर वाचलात असं गृहीत धरलं तरी कपात कॉफी अजून बाकी कशी?
राजधानीतले वेटर लगेच येतात कप परत नेण्यासाठी.
का तुमचा पर्सनल थर्मास होता?

राजधानीने असंख्य वेळा प्रवास केल्यामुळे हे डीटेल्स पहिल्या फटक्यात खटकले. इतर कोणतीही गाडी - गोल्डन टेंपल, पश्चिम एक्सप्रेस, स्वराज, गेला बाजार पंजाब मेल आणि गरीब रथही एकवेळ खपून गेली असती.

असो..मी बॅगेतून काॅफी मग आणि थर्मास काढला.. मगामध्ये थोडी काॅफी घेऊन मी पेपर वाचू लागलो..<<<<<

लेखकाचा पर्सनल थर्मास असावा.

लेखक महोदय, पुढचा भाग कधी येतो आहे?

मायबोली वर स्वागत आहे. खूप छान लिहिलंय. पुढचे भाग लवकर टाका. सवय करुन घ्या एथे टिकाकार खुप आहेत.

वरील कथा पुर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी, रेल्वेचे वेळापत्रक, स्थानके, अंतर या सार्याशी काहीही सबंध नाही..

वैशाली मॅडम तुम्ही दाखवलेली चुक मान्य आहे..
पुढील लेखनात अशा चुका अशा चुका होणार नाहीत ..याची नक्कीच काळजी घेईन...

सकुरा मॅडम...हो बरोबर गेस केलत तुम्ही..कथेतल्या नायकाचा पर्सनल थर्मास आहे...

आणि लवकरच पुढचा भाग पोस्ट केला जाईल..

मधुकरराव...चिडलात वाटत??

असो..तुम्ही पुरवलेली माहीती स्तुत्य आहेच...पण कुठलीही कथा ही भाबडपणाने वाचली की, ती जास्त आवडते..
किंबहुना लोक काही चुकाही ईंजोय करतात..

तुम्हाला ईंटरेस्ट नसेल तर नसू देत..
पण कथा सोडून तुम्ही रेल्वेमध्ये इंटरेस्ट घेत बसलात..

असो..तुमची मर्जी...नेक्स्ट टाईम एखादी कथा सुचलीच अशाच प्रकारची तर आधी सगळे डिटेल्स तुम्हालाच विचारत जाईन ..मगच लिहेन..

होप सो...तेव्हा ह्या चुका सुधारण्यात मदत कराल..

अजय,

कन्स्ट्रक्टीव्ह क्रिटीसिझम असा एक प्रकार असतो, जो तुम्हाला माहीत असेल अशी अपेक्षा.
आणि चिडण्याचा प्रश्न येतोच कुठे?

कथा किंवा कादंबरी कितीही काल्पनिक असली तरी किमान पटेल असं डीटेलिंग अपेक्षीत असतं. ते नसतं तेव्हा खटकतं आणि जे मला खटकतं ते मी स्पष्टपणे लिहीतो. उगाच किती छान म्हणून वाहवा करत नाही.

मायबोलीवर स्वागत.

सीमोल्लंघन, शुद्धलेखन, वगैरे

डिटेलिंग नीट जमण्यासाठी दुसर्‍या एखाद्या किंवा दोनतीन , पुरेशा लोकप्रिय नसलेल्या पुस्तकांचा आधार घेऊन बघा.
किंवा नकाच बघू. स्वतःला जसे जमेल तसे लिहा. जमेलच.

पुढील लेखनास शुभेच्छा!

छान

पुढचे भाग लवकर टाका. सवय करुन घ्या इथे टिकाकार खुप आहेत,त्यांच्या कडे लक्ष्य देवू नका .खूप छान लिहिलंय ,कथेचा पुढचा भाग येऊद्यात लवकर.

मायबोलीवर स्वागत .. कथा वाचतोय .. नव्हे प्रेमकथा म्हटले की मी आवर्जून वाचतोच, कारण अर्ध्याअधिक माझ्या आयुष्यातील एखाद्या किस्श्याशी रिलेट होतातच Wink
फक्त भाग तेवढे जरा मोठे आणि पटपट टाका ..

अवांतर - कथा काल्पनिक असली तरी त्यातील इतर डिटेल वास्तवाशी फारकत घेणारे चालावेत की नाही यावर मी एक स्वतंत्र धागा काढतोय लवकरच Wink

अवांतर - कथा काल्पनिक असली तरी त्यातील इतरडिटेल वास्तवाशी फारकत
घेणारे चालावेत की नाही यावर मी एक स्वतंत्र धागा काढतोय लवकरच>>>> ऋन्मेष , नंदिनीने काढलेला कथालेखन आणि चर्चा नावाचा एक स्वतंत्र बाफ आहे. तिच्या लेखनात जाऊन तो बघा. कथालेखनाच्या सर्व पैलूवर तिथे व्यवस्थित चर्चा अगोदरच झाली आहे.

अजय चव्हाण , कथा आवडली आहे . पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

जाई, मी ते गंमतीने म्हटलेले. वरच्या वादाला फुलस्टॉप लावायला.
तुम्ही म्हणता त्या धाग्याची कल्पना आहे. छान उपयुक्त धागा आहे आणि तशीच चर्चा, अधलेमधले वाचलेय त्यातील.

धन्यवाद.. भरत, सक्रीय, महेंन्द्र, ऋन्मेऽऽष आणि जाई..

ऋन्मेऽऽष तुम्हाला कदाचित माहीत नसेन बट मी तुमचा खुप मोठा फॅन आहे...तुमचे सगळेच लेख वाचले आहेत मी...आणि पोह्यावरचा लेख तर अप्रतिमच होता..
आणि हो..मलाही कांदेपोहे अॅनिटाईम फेवरीट आहेत..

धन्यवाद.. भरत, सक्रीय, महेंन्द्र, ऋन्मेऽऽष आणि जाई..

ऋन्मेऽऽष तुम्हाला कदाचित माहीत नसेन बट मी तुमचा खुप मोठा फॅन आहे...तुमचे सगळेच लेख वाचले आहेत मी...आणि पोह्यावरचा लेख तर अप्रतिमच होता..
आणि हो..मलाही कांदेपोहे अॅनिटाईम फेवरीट आहेत..