उमटेल माझा ठसा...

Submitted by सत्यजित... on 28 October, 2015 - 17:39

भिंतीवरी सरकतो,आहे जसा कवडसा...
तितकीच साथ देतो,सूर्या तुझा भरवसा!

आभाळ वेदनांचे मी पेलले परंतू...
नाही सुखावल्या त्या,मी सोडला तो वसा!

गेल्या कितीक रात्री,मी झोपलोच नाही...
त्या शोधण्यात असतो,मी गर्क फार दिवसा!

आहे उभाच आहे,पण एकटा अता मी...
जो सोबतीस होता,फुटलाय रे आरसा!

निसटून जात होते,संदर्भही जिण्याचे...
हातात हात कोणी,उरला कुठे फारसा?

गगनास आज माझे,अस्तित्व मान्य नाही...
चमकू नकोस जेंव्हा,उमटेल माझा ठसा!
—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृत्तात (आनंदकंद अपेक्षित) चुका आहेत
काफ़िया रदीफ च्या भागात शेवटी लगागा असे यायला हवे
मतल्यात भरवसा-कवडसा
यात जसे लगागा आले तसेच समाक्षरी समवृत्तीय जोडणी करणे भाग आहे असे वाटते फा -रादिवसा सारखी =लललगा
असो
शुभेच्छा