तशी नसते रात आजपण

Submitted by vilasrao on 25 October, 2015 - 13:42

आकाश पाहता ढळते रात आजपण!
वेचून चांदण्या सरते रात आजपण!

नंदादिपातुनी वदली वात तेवती
तीलाच तेवढी छळते रात आजपण !

गावात आणले सगळे राजकारणी
वस्तीत जागती असते रात आजपण !

आता उजाडतेच अशी वेळ जाहली
आशेत एवढ्या जगते रात आजपण!

गाठून आठवण बसली तीच आजपण
गेली जशी तशी नसते रात आजपण !

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users