सुट्टी

Submitted by कविता क्षीरसागर on 21 October, 2015 - 10:23

सुट्टी

संपली बुवा एकदाची
ही परीक्षेची कटकट
सुट्टीत काय करणार
सांगा बरं पटपट !

पप्पू म्हणाला " मी किनई
खूप वाचन करणार
बिरबल आणि ठकसेन
गोष्टी खूप वाचणार "

पिंकी म्हणाली " सुट्टीत या
डान्सचा क्लास लावणार "
गब्दुल गोट्या म्हणे " मी
भरपूर व्यायाम करणार "

मी म्हणालो " या वर्षी
अभ्यासाचा पडला ताण
घालवण्यासाठी शीण हा
"विश्रांती” हाच उपाय रामबाण "

कविता क्षीरसागर

Group content visibility: 
Public - accessible to all site users