Submitted by सुप्रिया जाधव. on 21 October, 2015 - 08:37
आपण परस्परांना भलते गृहीत धरतो
किंवा परस्परांचा मानी स्वभाव नडतो
स्वप्नामधे सुखांनी आमन्त्रणे दिलेली
पण वास्तवात सारा उलटा प्रकार घडतो
ताज्या तुझ्या स्मृतींचे माखून रंग गहिरे
तो सूर्य पश्चिमेला कृत-कृत्य होत ढळतो
ना साठवे कधीही घरटयात अन्न-पाणी
पक्षी तरी कसा हा इतक्या मजेत उड़तो
काटयाकुटयात फुलते स्वीकार ना मलाही
गंधाविना जशी तू कोरंट मान्य करतो
जी त्या नशेत आहे ती बात यात नाही
उष्टावतोस प्याला तेव्हाच तोल सुटतो
भोगी क्षणाक्षणाचा उपभोग घेत मरतो
योगी क्षणाक्षणाला अमरत्व प्राप्त करतो
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुप्रियाताई, आवडली गझल. मस्त
सुप्रियाताई, आवडली गझल. मस्त आहे.
मस्तच ! घरटे पक्षी वाला शेर
मस्तच ! घरटे पक्षी वाला शेर खासच आवडला ..
मस्त
मस्त
खूपच छान गजल !
खूपच छान गजल !
खुप सुरेख आहे
खुप सुरेख आहे रचना.
स्वप्नामधे सुखांनी आमन्त्रणे दिलेली
पण वास्तवात सारा उलटा प्रकार घडतो
अगदी रोजच्या जीवनातला!
भोगी क्षणाक्षणाचा उपभोग घेत मरतो
योगी क्षणाक्षणाला अमरत्व प्राप्त करतो
हा शेर खुप आवडला.
ताज्या तुझ्या स्मृतींचे माखून
ताज्या तुझ्या स्मृतींचे माखून रंग गहिरे
तो सूर्य पश्चिमेला कृत-कृत्य होत ढळतो>>> वाह!!!
छान गझल! सगळेच शेर चांगले, ना
छान गझल!
सगळेच शेर चांगले, ना साठवे कधीही घरट्यात अन्नपाणी हा आणि शेवटला खुप आवडला, क्या बात है!
पहिला शेर मात्र गद्य वाटतो.
तुमची ’तुझे गाव आले हवा धुंद झाली” ही गझल वाचली, ती ही झकास आहे.
भोगी क्षणाक्षणाचा उपभोग घेत
भोगी क्षणाक्षणाचा उपभोग घेत मरतो
योगी क्षणाक्षणाला अमरत्व प्राप्त करतो>>
हे अगदी खरे आहे.
छान गझल! आवडली.
छान गझल! आवडली.
गझल खूप छान झाली आहे
गझल खूप छान झाली आहे सुप्रिया! शेवटचे चार शेर विशेष! कोरंट शेरात करतो(स) असे असायला हवे असे मनात आले. असो.
शुभेच्छा!
कोरंट चा विचार करते बेफीजी,
कोरंट चा विचार करते बेफीजी, धन्यवाद !
सगळ्यांचे खुप आभार !!
सुप्रिया.
.
.
भोगी क्षणाक्षणाचा उपभोग घेत
भोगी क्षणाक्षणाचा उपभोग घेत मरतो
योगी क्षणाक्षणाला अमरत्व प्राप्त करतो >>>>> या शेराकरता दंडवतच ....
__________/\__________
अतिशय सुरेख गजल ....
खूप छान आहे ग़ज़ल ।। भावना
खूप छान आहे ग़ज़ल ।। भावना जगावेगळ्या असतात तुम्हच्या ।। खूप होलवर जाताय तुम्ही गजलेच्या ।। खरच!
ना साठवे कधीही घरटयात
ना साठवे कधीही घरटयात अन्न-पाणी
पक्षी तरी कसा हा इतक्या मजेत उड़तो
खुप छान !
सुप्रिया खूप छान गझल घडतो ,
सुप्रिया खूप छान गझल
घडतो , ढळतो आणि शेवटचा शेर … हे जास्त भावले
खूपच छान गझल...
खूपच छान गझल...
स्वप्नामधे सुखांनी आमन्त्रणे
स्वप्नामधे सुखांनी आमन्त्रणे दिलेली
पण वास्तवात सारा उलटा प्रकार घडतो>>>अगदी सरळ सत्य!
ताज्या स्मृतींच्या गहिऱ्या रंगात 'माखलेला' मावळता सूर्य...अन् त्याची कृत-कृत्यता! केवळ अप्रतिम!
ना साठवे कधीही घरटयात अन्न-पाणी
पक्षी तरी कसा हा इतक्या मजेत उड़तो>>>व्वा...क्या बात है!
काटयाकुटयात फुलते स्वीकार ना मलाही
गंधाविना जशी तू कोरंट मान्य करतो>>>ये भी क्या बात है!
व्वा वा!! खूपच सुरेख
व्वा वा!! खूपच सुरेख
खुप धन्यवाद मण्डळी !!
खुप धन्यवाद मण्डळी !!
ना साठवे कधीही घरटयात
ना साठवे कधीही घरटयात अन्न-पाणी
पक्षी तरी कसा हा इतक्या मजेत उड़तो>>> हे खुपच आवडले..
सुंदर गझल..
खुप सुंदर आणि प्रामाणिक
खुप सुंदर आणि प्रामाणिक शब्दरचना वाटली ही. खुप आवडली.
खूपच सुंदर गझल! संपूर्ण गझलच
खूपच सुंदर गझल! संपूर्ण गझलच छान...
जी त्या नशेत आहे ती बात यात
जी त्या नशेत आहे ती बात यात नाही
उष्टावतोस प्याला तेव्हाच तोल सुटतो....
क्या बात है .... जियो !