टीव्ही नवीन घ्यायचा आहे.

Submitted by अनघा. on 19 October, 2015 - 03:18

आधी एखादा बीबी असेल तर कृपया लिंक द्यावी. धन्यवाद. Happy

एलईडी/एलसीडी मध्ये कोणता घ्यावा ? स्वस्त अन मस्त आणि चांगला टिकणारा सुध्दा हवा.
आमचे हे म्हणतात की मायक्रोमॅक्स घेऊ. १५-१६ पर्यंत आहे - बायबॅक किंमत. (जुना ओनिडा आहे)

मला मामॅ मान्य नसल्याने इथे मुद्दा उपस्थित करावा लागला. Happy

तरी सर्वांनी फुकटचा सल्ला द्यावा. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुस द्यावा की मित्रमैत्रिणींनो ! Happy

आपल्या त्या ह्या अ, ब, क समद्यांस्नी देता अन मले काहून हो इग्नोर करून राहिलासा ?

अनघा, LED घे. व्हिडिओकॉन, पॅनासोनिक, LG वगैरेची बेसिक मॉडेल बसतील ह्या बजेटमध्ये. डिस्प्ले केवढा मोठा हवा त्यावरही किंमत ठरेल. जुन्या ओनिडाचे ३ हजार वजा करुन घे.

टिव्ही घेताना HD READY न घेता FULL HD असलेलाच घ्यावा. रेझोल्युशन चांगले मिळते थोडे बजेट वाढवल्यास २० हजाराच्या आत ३२ -३६ इंची सॅमसंग एलजी सोनी या कंपनींचा टिव्ही मिळू शकेल.
आता दिवाळी ऑफर मधे बरेच ऑप्शन्स येतील. क्रोमा , विजय सेल्स. अश्या दुकानातून चांगली सवलत मिळते.

ठीक आहे. सॅमसंग, सोनी किंवा एलजी घेते. Happy २० च्या आत बसेल तो Happy

खर तर ओनिडा ८ वर्षाचाच आहे, चांगला चालला आहे, .. असो. Happy

२० हजारात सोनी, सॅमसंग, एलजी चे ३२'' चे टीव्हीज नाही येणार बहुतेक. सोनीमध्ये बेसिक कनेक्टीव्हीटी (पोर्ट्स वगैरे) असते. पण सॅमसंग वगैरेमधे भरपूर पोर्ट्स असतात सगळ्याप्रकारच्या कनेक्शन्स करता.

एचडी टीव्ही घेणार असलात तर एचडी सेटटॉपही घ्या + दर महिन्याला तुम्ही जो चॅनल पॅक घेतला आहे त्यातले एच्डी चॅनल्स दिसण्याकरता "एचडी अ‍ॅक्सेस फी" ही भरा. नाहीतर हे एलईडी वगैरे पॅनल्स घेण्यात काही तसा राम नाही.

मोगा तो बाहेर रुम मधे राहणार्यास्नी ठिक आहे .
त्यात सुद्धा २०" ५००० कमीत कमी १५००आयबाल टिव्ही ट्यूनर , १५००₹ साऊंड सिस्टम ( मानीटर ला आवाज नसतो) १५००₹ डिश .१००० आदर्स ( लाईक वायर , स्टाबीलायजर) .
आणी एवढ करुन वायर्स च जालं तयार होईल व तुम्ही त्यात अडकुन पडाल Proud

सर्वात पैला फु.स. मंजी हा धागा 'माहिती हवी आहे' किंवा 'यंत्र आणि उपकरणे' असल्या कायतरी ग्रुपात हलवा.
गुलमोर-ललितलेकन वाचुन लैच गोंधळ हून र्हायला.

sony

टीव्ही ही गोष्ट काही दरवर्षी आपण घेत नाही. एकदाच घ्या पण चांगला घ्या (.Sony, Samsung, LG) दिवाळीत चांगली डील्स मिळतील. स्वस्त गोष्टी आणि महाग गोष्टी कारणामुळेच असतात. आणि एकदा एच डी टीव्ही घेतलात तर टाटा स्काय किंवा जे कोणी असतील त्यांचे एच डी पॅकेज घ्या. एकदा एच डी घेतलेत की परत साधी चॅनेल्स तुम्ही पाहणार नाही.
(टाटा स्काय चे मेगा एच डी पॅकेज वर्षाला २ टीव्ही साठी साधारण ११००० पडते.)
मोठे टीव्ही महाग आहेत हे बरोबर आहे पण ई एम आय वर मिळतात आणि हवतर इतर ठिकाणी थोडीशी काटकसर करु शकतोच की आपण उदा. वर्ष भर महिन्याला दोन ऐवजी एकदाच हॉटेलिंग करणे, सलमानचे किंवा फारा खानचे चित्रपट थेटरात न पाहणे..(नाहीतरी महिन्याभरात ते टीव्ही वर येतातच), नवा मोबाईल गरज नसेल तर न घेणे.

माझा फुकट सल्ला - चांगला मोठा एच डी टीव्ही घ्या. तो महाग असला तरी मिळणारा आनंद अमुल्य असेल.
दसर्‍याच्या शुभेच्छा!

टिव्ही घेताना, जास्तीत जास्त आठ दहा वर्षाचं प्लॅनिंग असावं. टेक्नॉलॉजी झपाट्याने बदलतेय. आठ दहा वर्षांनी नव्या टेक्नॉलॉजीचे टिव्ही घ्यावे वाटतील.
आताच अगदी मोठी investment केली की, परत आठ दहा वर्षांनी आपण तो सोडुन नवा घेउ शकु का हा विचार करावा.
हे करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की आपण आता टिव्ही घेतोय त्या टेक्नॉलॉजीचा आठ दहा वर्ष छान उपभोग घेता आला पाहिजे. असे त्यात फिचर्स हवेत, FHD, ports, sound quality इत्यादि.
या फिचर्स सोबतच आकारावरुन टिव्हीची किंमत ठरते.
तेव्हा आपण एकदा बजेट निश्चित केले की फिचर्सवर कॉम्प्रमाईज करुन मोठ्या आकाराच्या टिव्ही पेक्षा, अधिक वा सगळे फिचर्स असलेला साधारण आकाराचा (३२" च्या आसपास) टिव्ही घेणे योग्य असे माझे मत आहे.

तसेच Sony Samsung LG हे एकदमात म्हटले जाते तरी Sony ची क्वालिटी त्यात उजवी आहे.

सोनी एनीटाइम..

आता घेत आहातच तर नुसता एचडी न घेता शक्य असेल आणि उपलब्ध असेल तर ४के घ्या.. म्हणजे परत लगेच २-३ वर्षात जुना नाही वाटणार... Happy

चॅनेल नाहीये घरी आणि नकोय पण. सोनी स्मार्ट बराच महाग आहे. एलजी,सोनी किंवा सॅमसंग चा विचार आहे.
४ के म्हण्जे काय? दुकानात मी स्मार्ट विचारला सोनीचा तर ४० च्या पुडे होता. नोनस्मार्ट ला काय म्हणावे ? सोनीच आवडतोय मला . नेटवर ब्राव्हो २० के च्या आत आहे. कालच्या दुकानात हा नव्हता. काही टीव्ही फकत ओनलाईनच मिळतात का? बायदवे मी काल पहिला स्मार्टफोन घेतला . सोनीचा ८९९०/- ला, दोन हजाराचे क्व्हर फ्री मिळाले. शिकून राहिले आता फोन वापरायला मुलीकडून. Happy

टिवी टेक्नाॅलांजी मध्ये सॅमसंग/एलजी यांनी सोनीला ४-५ वर्षांपुर्विच मागे टाकलेलं आहे. येत्या काळात सोनीने टिवी बनवायचं बंद केलं तर आश्चर्य वाटणार नाही.

रेग्यलर आणि स्मार्ट टिवीच्या किमतीत फार फरक असेल तर $३५ चं क्रोमकास्ट घ्या; स्वस्त आणि मस्त...

३२ इंची हवा आहे. सोनी ब्राव्हो १९९९०/- आहे बहुतेक.

सॅमसंग & एलजी फार महाग आहेत. बजेटच्या अगदीच बाहेर ..

मानव पृथ्वीकर आणि इतर
तुमच्या कडे indusrty data आहे का कि Sony ची क्वालिटी त्यात उजवी आहे. ??

सोनी स्वताची LCD panel बनवत नाही आणि कधीही नवती.
तसेच त्यांच्या TV डिविजन ला कुपाच तोटा होत असल्याने ती बंद होण्याचा धोका hi तज्ञ लोकांनी वर्तवला आहे .
तसेच भारतात कोणी सोनी ची सर्विस घेतली आहे का ? ,माझ्या पत्नीला तिच्या सोनी laptop च्या सर्विस चा अतिशय वाईट अनुभव आला होता.

आणि तरीही हे सर्वात महाग TV विकतात. त्यांची extended warentee ची किंमत काय ?

साम्सुंग चा पण अनुभव फार चांगला नाही

माझे म्हणणे आहे कि किमान ३ ते ५ वर्ष देणारा तव घ्या. extended warentee विकत घ्या. मग अगदी vu , videocon hi चालेल.

About Sony Business

http://www.bloomberg.com/news/articles/2015-10-07/sony-ceo-hirai-says-el...

Sony is targeting its highest profit since 1998 after posting net losses of more than $10.7 billion during the past five fiscal years because of rising competition in the TV and smartphone businesses and a weaker yen. It’s forecasting an operating income of 500 billion yen ($4.2 billion) in the year ending March 2018. Its shares are up 30 percent this year.

तुमच्या कडे indusrty data आहे का कि Sony ची क्वालिटी त्यात उजवी आहे. ?? >>> असा सर्व्हे करून सामान्य माणूस खरेदी करत असता तर असे धागे निघाले नसते. Happy वोरंटी वाढवून घेण्याचे सजेशन चांगले आहे. विचार करते. Happy

Sony ला शक्यतो सर्विसिंगची गरज पडत नाही असा अनुभव आहे.

Sonyच्या वस्तु महाग वाटतात पण quality च्या बाबतित नं १

ही कंपनी quality च्या बाबतित कधी तडजोड करत नाही असे म्हणतात.

>>$३५ चं क्रोमकास्ट घ्या >>> हे आणि काय? आमची कमाणी $ मधे नाही हो.<<

गुगलचं प्रॉडक्ट आहे, भारतातहि (मुंबईत तरी) मिळतं. वाय-फाय द्वारे टिवी प्रोग्रॅम्स्/मुवीज स्ट्रिमिंग करता येतात, स्मार्ट्फोन्/टॅब्लेट्स पेअर करुन त्यांच्या स्क्रीन्स टिवीवर मिरर करता येतात...

@हेमंत:
हा एक रिव्ह्यु बघा. हा दोन वर्षांपूर्वीचा आहे.
http://www.digitaltrends.com/home-theater/sony-vs-samsung-whose-tv-belon...

माझ्याकडे दोन SONY TV आहेत. एक सहा वर्षांपूर्वी घेतला आणि एक दोन वर्षांपूर्वी.
दोन वर्षांपूर्वी घेतला तेव्हा सुद्धा LG, SAMASUNG सोबत compare करुन बाजु बाजुला लावलेले डेमो बघुन मग निवडला. चांगलाच फरक जाणवत होता पिक्चर क्वालिटी, क्लॅरिटी मध्ये.
दोन्ही टिव्ही व्यवस्थित सुरु आहेत, अद्याप तरी कसलाही प्रॉब्लेम नाही.

आता दोन वर्षात फरक पडला असेलही SONY पेक्षा SAMSUNG ने बाजी मारली असेल.
अगदी अलिकडची मला माहिती नाहीय.

मी नुकताच सगळी कंपॅरिझन करून सोनी घेतला आहे.. सोनी इज एनीटाइम बेटर दॅन सॅमसंग.. Happy

त्यांचे नवीन मॉडेल्स येतच आहेत त्यामुळं ते टीव्ही बनवायचे बंद करतील याची इतक्या लगेच तरी शक्यता नाही

जाणकारांनो प्लीज मदत करा.
सध्या अव्हेलेबल असलेल्या ओलेड (एलजी ) आणि क्युलेड (सॅमसंग ) या टीव्ही मध्ये कोणता घ्यावा ?
५५ इंच साईझ घ्यायचा विचार आहे.
ओलेड च्या लाईफ बद्दल काय मत आहे ?

मी दसर्‍याच्या जरासं आधी सोनी कंपनीचा एल इ डी टीव्ही घेतला.
गेल्या महिन्याभरापासूनच मध्येच आवाज बंद पडायचे प्रकार घडताहेत. कधी टीव्ही चालत असताना मध्येच आवाज गेलाय, तर कधी ऑन केल्यावर. HDMI mode.
नेटसर्च केलं तर सोनीच्या टीव्हीबाबत वेगवेगळ्या देशांतल्या लोकांना ही समस्या आल्याचं दिसलं. सोल्यूशन सोपं आहे. टीही सिच ऑफ करून पॉवर ऑफ आणु अनप्लग करायचा आणि थोड्या वेळाने पुन्हा चालू करायचा.

कधी टीव्ही चालत असताना मध्येच आवाज गेलाय, तर कधी ऑन केल्यावर. HDMI mode.

सोनीबाबत असं व्हावं याचं नवल वाटतं.

भरत तुम्ही Android TV वापरत आहात का?

मी सोनीचा Android TV घ्यायच्या विचारात आहे. पण नेट वर त्याचे बरेच निगेटीव्ह रिव्यू आहेत.

इथे कोणी सोनीचा Android TV वापरला आहे का?

अनुभव कसा आहे?

टीव्ही स्लो होणे हँग होणे वगैरे अनुभव येत आहेत का?

स्मार्ट टीव्ही ऐवजी Android TV घेणे खरेच वर्थ आहे का?

आजकाल स्मार्ट टीव्ही (जास्तीचे पैसे देउन) वगैरे घेण्यापेक्षा साध्या टीव्हीला amazon firestick किंवा तत्सम इतर प्लगइन्स जोडून स्मार्ट बनवणे हा जास्त चांगला पर्याय वाटतो!

जागा असेल तर आणि मोठ्या टीवी ची आवड असेल तर व्यू कंपनीचा ५५" ४के एचडीआर एलईडी टीव्ही पाहा.
या कॉन्फिग चे सोनी/सॅमसंग चे टीव्हीज २लाख + किंमतीत येतील.

स्वरुप म्हणालेय तसं फायर टीव्ही स्टिक वगैरे पर्याय मस्त पडतात. अर्थात, जर ५०" च्या वरचे टीवी सेट्स पाहात असाल तर स्मार्ट टीवी बाय डिफॉल्ट येतात (टिव्हीत अ‍ॅप डालो करता येतात/प्रीइन्सटाल्ड असतात, वायफाय कनेक्ट करता येतं... इ.)