माझा गाव - वरवडे, ता. कणकवली

Submitted by नीलम बुचडे on 18 October, 2015 - 04:26

*****माझा गाव*****

हिरव्या डोंगराच्या
कुशीत विसावणारा !
खळखळणार्या नद्यांच्या,
काठावर वसणारा !!

मंदिरातील घंटानादातून,
चैतन्य फुलवणारा !
साग्रसंगीत पूजेच्या,
सुगंधात रमणारा !!

परंपरांची कास धरणारा,
रिवाजांचा मान ठेवणारा !
नव्या युगाचे स्वागत ,
उत्साहाने करणारा !!

निसर्गाचे उपकार मानणारा,
निसर्गाचा ठेवा जपणारा !
मुक्या जीव-जनावरांना,
प्रेमाने वाढवणारा !!

सत्याचा मान राखणारा,
अन्यायाला ठेचणारा !
आणि उदार मनाने,
क्षमा करणारा !!

स्वाभिमान जपणारा,
मान - सन्मान देणारा !
दुःखितांच्या वाटेवरही,
फुले पसरवणारा !!
*****----------******-------------
Written by - Nilam Buchade.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त... आवाडली कविता...
येयत र्‍हवा वरचेवर 'गजालि'वर... तर आमच्या लक्षात र्‍हवतलास...
Happy

असो...
@मोगा... नारायण राणेंचा गांव 'कांदळगाव' ना?...

धन्यवाद.. प्रसाद, अवि, अंजू, मोगा आणि विवेक देसाई.
मा. श्री. नारायण राणे यांच्या पूर्वजांचे गाव कांदळगाव, पण त्यांचे गाव वरवडेच आहे.