चुकीला माफी नाही ..... दगडी चाळ !

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 October, 2015 - 18:20

एकेकाळी राम म्हटले की डोळ्यासमोर अरुण गोईल यायचा आणि सीता म्हटले की दिपिका. (पदुकोन नव्हे)
कृष्ण म्हटले की नितिश भारद्वाज आठवायचा आणि हनुमान म्हटले की दारा सिंग.
देवांना आपण फोटोतच पाहिले असल्याने त्यांचे नेमके असे रूप आपल्या डोळ्यासमोर नसते, त्यामुळे मालिका चित्रपटांमध्ये फेमस झालेले कलाकारच पटकन डोळ्यासमोर येतात.
पण तेच ‘मेरी कोम’ चित्रपटात प्रियांका चोप्रा कितीही मेरी कोम दिसत असली किंवा तिने कितीही उत्तमप्रकारे ती भुमिका वठवलेली असली, तरी मेरी कोम बोलताच खरीखुरी मेरी कोमच डोळ्यासमोर तरळते.
दगडी चाळीच्या डॅडींना मी बरेच वेळा प्रत्यक्ष पाहिले आहे, पण तरीही आज "दगडी चाळ" पाहिल्यावर माझी अशी स्थिती झाली की आता यापुढे मकरंद देशपांडेच डोळ्यासमोर येतील.

....... पण तरीही दगडी चाळ हा चित्रपट आहे अंकुश चौधरीचा !

सत्तार, उद्या नाशिक बाजा ठेवलाय. यायचे. नाचायचे. प्रसाद घ्यायचा. आणि कल्टी मारायची. .. असे साधे सोपे डायलॉग अंकुश चौधरी स्टाईल मध्ये जेव्हा सुरु होतात तेव्हाच आपल्याला समजते की हा ‘अंकुश चौधरी शो’ आहे.
२०१३ ला दुनियादारीत चमकल्यानंतर यावर्षी त्याचे क्लासमेट, डबल सीट... आणि आता हा दगडी चाळ! चौधरींचा अंकुश यंदा फॉर्मला आहे. जर तो तुम्हाला आवडत असेल, तर हा चित्रपट बघण्यासाठी हे एकमेव कारण पुरेसे आहे.
ईतर कोणाला ‘डॅडी आणि दगडी चाळ’ काय प्रकरण आहे हे माहीत नसेल, तर त्यांची उत्सुकता शमू शकते. ज्यांना हे प्रकरण माहीत असेल, त्यांच्या हाती फार काही विशेष लागणार नाही. कारण त्या जागी मुंबईतील कोणीही अ, ब, क डॉन दाखवला असता तरी चित्रपटावर काही फारसा फरक पडला नसता.

कथा एका ओळीत सांगायची झाल्यास, वास्तव मध्ये संजय दत्त जसा भाईगिरीच्या लाईनला खेचला जातो, साधारण त्याच प्रकारे इथे अंकुशवर ती वेळ येते. फरक ईतकाच की अंकुश किनार्‍याकडे पोहायचे प्रयत्न सोडत नाही. यात तो यशस्वी होतो की नाही हे चित्रपटातच बघा, पण तुम्हाला दोन सव्वादोन तास खुर्चीवर खिळवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी होतो. कारण चित्रपटात विनोद, रोमान्स, अ‍ॅक्शन सोबत सस्पेन्स आणि थोड्याफार डोक्यॅलिटीच्या क्लृप्त्या योजल्या आहेत ज्या आपल्या डोक्यातील किडा वळवळत ठेवतात.

मराठी चित्रपटांची तांत्रिक बाजू हल्ली फारच सुधारली आहे. इथेही त्या वाढलेल्या अपेक्षा सहज पुर्ण होतात.

संगीताबद्दल बोलायचे झाल्यास यात दोनच गाणी आहेत. त्या पैकी एका रोमांटीक गाण्याची लिंक मी खाली देतो.
https://www.youtube.com/watch?v=6zoKKPTzWUE
मुद्दाम देतोय कारण काल रात्री तीन साडेतीन वाजता मी हे गाणे यूट्यूब वर ऐकले आणि त्यावरूनच हा चित्रपट बघायचा निर्णय घेत लगोलग दोन तिकीटेही बूक केली. (चित्रपट दोघांनाही आवडला)

अंकुशच्या जोडीने यात पूजा सावंत आहे. दोघांची जोडी यात छान आणि हटके दिसलीय. तिला कपडेही फार छान दिलेत आणि ती यात वावरली सुद्धा अशी आहे की बरेचदा हिंदी चित्रपटातीलच हिरोईन वाटते. या चित्रपटापुरते बोलायचे झाल्यास मला तिच्यात मुग्धा गोडसे आणि प्रियांका चोप्रा यांचे हलकेसे मिश्रण दिसले. रोमान्स पलीकडे मात्र तिला फारसे काही काम नाही.

ईतर कलाकारांमध्ये कमलेश सावंत, म्हणजे द्रुश्यम मधील ईनस्पेकटर गायतोंडेने यात इनस्पेक्टर काळे बनत तशीच धमाल उडवलीय.

आधी मला वाटलेले की या चित्रपटात दगडी चाळीचे उदात्तीकरण असेल, मात्र तसे काही नव्हते. त्यामुळे तसले काही डोक्यात ठेऊन चित्रपट बघायला जाऊ नका किंवा त्यामुळे चित्रपट न बघण्याचा निर्णय घेऊ नका.

वर उल्लेखल्याप्रमाणे अंकुश चौधरी आवडीचा असेल तर नक्की बघा. त्याने हल्ली जी स्टाईल पकडलीय ते पाहता असे वाटते की त्याला घेऊन अमिताभचे अ‍ॅक्शन चित्रपट मराठीत रिमेक करावेत. माझ्या हातात असते तर मी ‘दिवार’ बनवला असता. शशी कपूर कोणीही चालला असता, कारण या भावात एकहाती चित्रपट खेचायची ताकद आलीय.

असो,
हे निश्चितच चित्रपट परीक्षण नसून चित्रपट ओळख आहे, जी मी पाहिलेल्या आणि मला आवडलेल्या मराठी चित्रपटाबद्दल देतोच. त्यामुळे स्टार नाही देणार. पण फार अवास्तव अपेक्षा न ठेवता, ‘चला आज एक मराठी चित्रपट बघूया’ म्हणत बाहेर पडा, वेळ आणि पैसे वसूल नक्की होतील.
आमचे झाले Happy

dagadi chawl.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यावेळी असलेल्या ड्रेसच्या, स्कर्टसच्या, शुजच्यज, कानातले-गळ्यातले, बांगड्या, पिशव्या, पर्सेस च्या स्टाइल्स वेगळ्या होत्या. मला पण जाणवलं ते तिचे कपडे पाहताना.
इव्हन अंकुशचे टीशर्टचे ब्रँडस आणी कलर्स पण त्या काळापेक्षा खूप जास्त मॉडर्न वाटले.

अजून एक म्हणजे सिनेमा अंडरवर्ल्ड, दगडी चाळ असा असताना पहिल्यांदा जी डिसक्लेमर पाटी येते "या सिनेमातली पात्रे काल्पनीक इ.इ.इ " त्यात "छानशी गोष्ट" असं म्हणलंय.. अंडरवर्ल्ड रीलेटेड कथा 'छानशी' !!! Uhoh

रार +१
त्या काळात शॉर्ट बेल्ट पर्सेस,पॅच-वर्क लेदर पर्सेस ,ज्युट बॅग, चुडिदार सलवार-कमिझ, शिल्पा शेट्टिसार्ख्या जिन्स्,दोन लॉन्ग पोनी, फ्रन्ट फ्लिक्स केसाचे कापलेले, ब्ल्न्ट कट हेअरकट, हाफ अनारकली ड्रेसेस, ३/४ स्लिव्हज ब्लाउज-प्लेन सारी (काजोल स्टाइल) इन होते...इव्हन कलर्स सुद्धा, पिच्,पिन्क ,स्काय असे जास्त चलती होती.

एकंदरीत काळाबाबत मेहनत घेतली नाहीये. >> नुसती काळावरच नाही तर अजूनही बर्‍याच बाबतीत मेहनत चालली असती.. खास करून फायटींग सीन्सवर, स्टंट्सवर देखील Happy

मी बघितला आत्ताच. फॅशनबद्दल बर्‍याच लोकांनी वर म्हटलेच आहे . त्या स्मशानातल्या मारामारीच्या सीन मधे कसल्या चुका आहेत!! त्यात लाथ मारल्यावर अशी उडून पडणारी माणसं चक्क त्या उडण्याच्या इफेक्ट साठी कमरेला लावलेल्या दोर्‍यांसकट उडताना दिसतात!! आणि शेवट बर्‍यापैकी अ‍ॅब्रप्ट वाटला. की यूट्यूब वर तसा आहे माहित नाही. बाकी बराचसा प्रेडिक्टेबल सिनेमा .

@ ऋन्मेऽऽष

मुंबई अंडरवर्ल्ड वरिल पुस्तके
Black Friday (Penguin, 2001) by S Hussain Zaidi
Narcopolis (Faber, 2012) by Jeet Thayil
Mafia Queens of Mumbai (Westland Tranquebar Press, 2011) by S Hussain Zaidi and Jane Borges
Death in Mumbai (Random House, 2011) by Meenal Baghel
Dongri to Dubai (Roli, 2012) by S Hussain Zaidi

छान वाटला मलाही हा पिक्चर, फ़क्त एक गोष्ट फ़ारच जाणवली, फ्लॅश-बॅक दाखवताना दिग्दर्शक कमी पडला.
अंकुश चौधरी तर १ नं. मला आवडतोच तो. लव स्टोरी पण छान खुलवली आहे.
मकरंद देशपांडेच कामही वाखाण्याजोगं आहे.

पुस्तक सुचवणार्‍यांचे आभार

फ्लॅश-बॅक दाखवताना दिग्दर्शक कमी पडला. >> हो, हे मलाही वाटले. मुख्यत्वे सुरुवातीला चित्रपट जरा एकसंध वाटत नाही, पण नंतर पकड घेतो.

@ऋन्मेष
भायखळा ते बँकॉक ह्यात अरुण गवळी ( डॅडी ),छोटा राजन(नाना ) व अमर नाईक ह्या मराठी डाॅन बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
मस्त पुस्तक आहे जरुर वाचा. . . . .

Pages