हेडऑफिसातुन आलेली सुचना वाचली अन खोतसाहेबांनी डोक्याला हात लावला. "काय नवीन खूळ काढतील भरवसा नाही"
"काय झालं हो साहेब?" कांबळेनी विचारलं.
"घे बाबा वाच तूच, माझी वाचण्यात काहि चुक तर नाहीना होते?" असं म्हणत खोतांनी कागद सरकवला, अन कांबळे वाचू लागला.
दोन पान हो\ति. पहील्या पानावर यंदाच्या दुश्काळामुळे असलेल्या पसिस्थितिबद्दल लिहिलेल होत, अन दुसर्या पानावर फक्त एक सुचनावजा विनंती होति - 'तरी सर्वांनी थोडी का होइना, पण शेपटी लावावी.'
कांबळेनी पुन्हा वाचलं, सगळेच चक्रावले. शेपटी लावायची कसली सुचना? कोणाला कही कळेना. शेवटी खोतसाहेब म्हणाले, "ज्यांना पाहीजे ते उद्या ऑफीसात शेपटी लावून या."
गाव तसं छोट होत., हा हा म्हणता गावभर बातमी पसरली, अन सगळीकडे चर्चा सुरु झाली. त्या ऑफीसातलि लोक उद्या काय करतात याचीच सर्वांना उत्सुकता लागली.
सकाळ झाली, अन आधी लोकांना जाधव दिसले. उगाच साहेबाचा कोप नको, असा विचार करुन त्यांनी पुठ्ठ्याची शेपटि चिकटवून घेतली होती. सायकलवरुन जाताना मधेच पुठ्ठा चाकात आला की कटकटकट आवाज यायचा. लोकांचि हसूनहसून मुरकुंडी वळली. तेवढ्यात दुसरीकडुन वाघमारे आले. त्यांनी शेपूट म्हणुन जाड सुतळी लावली होती. जाधवची पुठ्ठ्याची शेपुट बघुन ते स्वताची शेपटी विसरले अन खोखो हसू लागले. त्या नादात स्वताच्या शेपटीत पाय कसा आडकला ते त्यांनाहि कळल नाही अन ते धाडकन आपटले ते नेमके चिखलात. तेवढ्यात "वाचवा वाचवा" असा आवाज आला. लोकांना वाटलं वाघमारेच ओरडतायत पण ते तर गपगार पडून होते. आवाजाच्या दीशेने पाहिल तर लोकांना बगाडे पळत येताना दिसला. का पळतो पाहील तर त्याच्या मागे ४-५ माकडे! शेपूटवाला बगाडे बघून त्यांना भलती गंमत वाटत होती अन त्यांनी पाठलाग चालु केला. लोकांना हसु आवरेना अन पोरांनीतर कल्लाच केला.
सगळे कसेबसे ऑफीसला पोचले. खोत सगळ्यांचे साहेब असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या शेपटीला सोनेरी कागद लावला होता. सगळ्यात भारी शेपटि आपलीच हे बघुन ते हसले अन त्यांच्या तोंडातला सोन्याचा दात अन सोनेरी शेपुट एकाच वेळी चमकले.
तेवढ्यात एका हातात पत्रं अन दुसर्या हातात शेपुट सांभाळत करपे शिपाई आला. आता आज काय नवीन नोटीस या विचाराने सगळ्यांना घामच फुटला.
थरथरत्या हाताने खोतसाहेबांनी कागद हातात घेत्ला पण त्यांना वाचायचा धिर होइना. परत कांबळेलाच कागद वाचायला सांगितला.
कांबळे धिर एकवटून कसाबसा वाचू लागला - "कालच्या नोटीसबद्दल एक सुक्ष्म दुरुस्तीबाबत ही नोटीस आहे. कालच्या नोटिसींच्या कॉप्या बनवण्याआधि कच्चा मसूदा बनवला होता. मराठी टाइपरायटर बिघडल्यामुळे इंग्रजी टाइपरायटर वापरला. दुश्काळाचा सामना करण्यासाठी म्हणून सर्वांनी थोडीका होइना शेती लावावी अशी विनंति केलि होती. पण टायपिस्टने sheti ऐवजी चुकुन shepti टाइप केलं अन त्याचं मराठीत शेपटी छापलं गेलं. तरी चुकीबद्दल दिलगीर आहोत."
पत्र वाचुन हसावं का रडावं कळेना. जाधवतर संतापून म्हणाला, "दिवसभर निघू नये म्हणून भरपूर फेवीकॉल लावून शेपटी चिकटवलिय, आता घरी परत जातानापण शेपूट मिरवतच जाव लागणार, नानाची टांग त्या टाइपरायटरच्या!"
शेपटी बहाद्दर
Submitted by सचिन फुकटे on 16 October, 2015 - 10:17
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
शाळेत शिरगणती नावाचा लेख होता
शाळेत शिरगणती नावाचा लेख होता तो आठवला .
तिथे donkeys ऐवजी monkeys ची शिरगणती होती .
हाहाहा!!!!
हाहाहा!!!!
चित्र समोर उभे राहिले
चित्र समोर उभे राहिले
भारी आहे हे आम्हाला दहावीला
भारी आहे हे
आम्हाला दहावीला असले छोटे छोटे उपरोधात्मक / उपहासात्मक गोष्टी असायच्या पुस्तकात त्यात ही टाकता येईल .
आवडलेली आहेच!
(No subject)
लय भारी
लय भारी
(No subject)
शेपटीचा शाप!
शेपटीचा शाप!
मस्त !
मस्त !
(No subject)
कायतरी गफलत असावी हे
कायतरी गफलत असावी हे सुरुवातीलाच लक्षात आलं होत.
असा काहीसा शेवटच अपेक्षितच होता..
(No subject)
भारीये!
(No subject)
फुकटे हे काही एवढं खास
फुकटे हे काही एवढं खास नाही.....
तो चमत्कार आठवला...
(No subject)
(No subject)
मस्त
मस्त
(No subject)
भारी
भारी
(No subject)
(No subject)
धम्माल.
धम्माल.
भारी
भारी
(No subject)