ती ?????

Submitted by नीलम बुचडे on 16 October, 2015 - 01:08

***** ती *****

ती एक आई
जीवन घडवणारी!
ती एक पत्नी
साथ देणारी !!
ती एक ज्योती
उज्जवल भविष्याप्रत नेणारी!
ती एक दिप्ती
अखंड तेवत राहणारी !!
ती एक कळी
उमलण्यासाठी आसुसणारी!
ती एक चांदणी
चमचमण्यासाठी धडपडणारी !!
ती एक शक्ती
सामर्थ्य प्रदान करणारी !
ती एक व्यक्ती
जगण्याचा अधिकार मागणारी!!
written by - Nilam Buchade.

Group content visibility: 
Public - accessible to all site users